AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मेव्हणीने जीजाजींना सांगितला ‘तो’ त्रास, आखला भयानक प्लान, थेट पेट्रोल टाकून..

नवांशहरमध्ये एका किराणा व्यापाऱ्याची हत्या केली करण्यात आली आणि नंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याच्या शरीरावर पेट्रोल ओतून जाळून टाकले. मात्र हा खून कोणी केला ते उघडकीस आल्यावर सर्वांनाचा मोठा धक्का बसला.

मेव्हणीने जीजाजींना सांगितला 'तो' त्रास, आखला भयानक प्लान, थेट पेट्रोल टाकून..
क्राईम न्यूज
| Updated on: Dec 19, 2025 | 2:20 PM
Share

पंजाबच्या नवांशहर (शहीद भगत सिंह नगर) मध्ये एक खळबळजनक ब्लाईंड मर्डर झाला आणि अवघ्या 24 तासांत गुन्हेगारांचाही शोध लागला. या हत्याकांडात किराणा व्यापारी आणि नवांशहर व्यापार मंडळाचे व्हाईस प्रेसिडेंट रवि यांची फक्त निर्घृण हत्याच झाली नाही तर आरोपींनी कारवर पेट्रोल टाकून त्याचा मृतदेहही जाळण्याचा प्रयत्न केला. त्यांचे मारेकरी समोर आल्यावर सर्वांनाच धक्का बसला. रवि यांच्याच घरात काम करणारी महिला नोकर सोनम आणि तिचे जीजाजी सुरजीत सिंह उफर्फ जस्सी यांनीच हा खून केल्याचे स्पष्ट झाले.

आधी बेपत्ता, मग थेट खून ? नेमकं काय झालं ?

12 डिसेंबरच्या रात्री 9 पर्यंत रवी सोबती घरी परतले नाहीत तेव्हा कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली, कुठेसापडल्याने अखेर रवि यांचा मुलगा सुमित सोबती याने नवांशहरमधील शहर पोलिस ठाण्यात ही तक्रार नोंदवली. पोलिसांनी तात्काळ शोध सुरू करत रवी सोबती यांच्या मोबाईल फोनचं लोकेशन शोधलं, जो बालाचौर येथे दिसत होतं. नवांशहरच्या डीएसपींनी बालाचौर पोलिसांशी समन्वय साधून घटनास्थळी एक पथक पाठवले आणि ते रवि यांच्या कुटुंबासोबत तिथे गेले. मात्र तेथील दृश्य पाहून सर्वांना मोठा धक्का बसला. तेथे रवी सोबतीचा अर्धवट जळालेला मृतदेह त्यांच्या कारमध्ये आढळला. त्यांच्यामुलाच्या जबाबावरून, त्या रात्री खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि तपास सुरू करण्यात आला.

24 तासांत उघड झाला गुन्हा

या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून एसएसपी यांच्या देखरेखीखाली अनेक पथके तयार करण्यात आली ज्यात डीएसपी बालाचौर, डीएसपी नवांशहर, सीआयए स्टाफ आणि दोन्ही पोलिस ठाण्यांचे एसएचओ यांचा समावेश होता. तांत्रिक, वैज्ञानिक आणि ह्यूमन इंटेलिजन्सच्या आधारे तपास करत पोलिसांनी दुसऱ्याच दिवशी चार संशयितांना अटक केली. गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल देखील जप्त करण्यात आली. नंतर, प्रकरणात आरोप जोडले गेले. सुरजीत सिंह उर्फ जस्सी (जिजाजी), मनी पुत्र विनोद भगत, चरणजीत सिंह उर्फ मनी आणि  सोनम देवी, पत्नी लवकुश उर्फ लवदास अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

का केली हत्या ?

तपासात धक्कादायक माहिती उघड झाली. सोनम ही रवि सोबतीच्या घरी काम करायची. तिने तिचे जीजाजी सुरजीत सिंहला सांगितलं ती, रवि सोबती हा तिला त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकतोय आणि त्रास देतोय. घटनेच्या दोन दिवस आधी, सुरजीत सिंगने रवी सोबती यांना जाब विचारला, ज्यामुळे दोघांमध्ये भांडण झाले. रवी सोबतीने त्यांना घर रिकामे करण्याची धमकी दिली तसेच शिवीगाळही केल्याचा आरोप आहे. याच रागातून आणि बदल्याच्या भावनेतून हत्येचा प्लान आखला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरजित सिंगने त्याची मेहुणी सोनमला दुपारी महालहून घरी येण्यास सांगितले. रवी सोबती संध्याकाळी तिला घेण्यासाठी येत असे, तेव्हा , तो (सुरजित) त्यांना रेल्वे क्रॉसिंग-३ जवळील अंडरब्रिजखाली एका निर्जन ठिकाणी नेईल, असा प्लान आखला. योजनेनुसार त्यांनी तसंच केलं आणि साथीदारांच्या मदतीने त्याचा खून केला. यानंतर, हा अपघाती मृत्यू वाटावा यासाठी त्यांनी त्याचा मृतदेह बालाचौर येथे नेला आणि गाडीवर पेट्रोल ओतून आग लावण्यात आली. मात्र पोलिसांनी कसून तपास करत 24 तासांच्या आत गुन्हेगारांना अटक केली.

मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न.
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप.
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर.
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान.
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद.
ठाकरे सेना अन् मनसेच्या युतीची घोषणा कधी? पुढील आठवड्यात मोठी घडामोड
ठाकरे सेना अन् मनसेच्या युतीची घोषणा कधी? पुढील आठवड्यात मोठी घडामोड.
BMC साठी भाजपची टीम सज्ज, 20 जणांची समिती जाहीर; कोणा-कोणाचा सहभाग?
BMC साठी भाजपची टीम सज्ज, 20 जणांची समिती जाहीर; कोणा-कोणाचा सहभाग?.
कोकाटेंचं मंत्रिपद गेलं, राजीनामा मंजूर, अटकेसाठी पोलीस 3 तास लिलावतीत
कोकाटेंचं मंत्रिपद गेलं, राजीनामा मंजूर, अटकेसाठी पोलीस 3 तास लिलावतीत.
एपस्टिन कांडामुळं भारतात राजकीय उलथापालथ होणार,सामनातून सरकारवर निशाणा
एपस्टिन कांडामुळं भारतात राजकीय उलथापालथ होणार,सामनातून सरकारवर निशाणा.
...तर बीडमध्ये उपोषण करणार, सुप्रिया सुळे यांनी का दिला टोकाचा इशारा?
...तर बीडमध्ये उपोषण करणार, सुप्रिया सुळे यांनी का दिला टोकाचा इशारा?.