शटडाऊनचा कालावधी कमी करा, जलवाहिनी दुरुस्ती, रिमॉडेलिंग प्रकल्पाची कामे लवकर पूर्ण करा, खा. श्रीकांत शिंदेंचे निर्देश

| Updated on: Oct 26, 2021 | 9:17 AM

एमआयडीसीच्या मुख्य जलवाहिनी दुरुस्तीसाठी घेण्यात येणाऱ्या शटडाऊनचा कालावधी कमी करून एमआयडीसी व महापालिका प्रशासनाने समन्वय साधून येत्या मार्च अखेर दुरुस्ती व रिमॉडेलिंग प्रकल्पाची कामे जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

शटडाऊनचा कालावधी कमी करा, जलवाहिनी दुरुस्ती, रिमॉडेलिंग प्रकल्पाची कामे लवकर पूर्ण करा, खा. श्रीकांत शिंदेंचे निर्देश
ठाणे महापालिका बैठकीत खासदार श्रीकांत शिंदे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना
Follow us on

ठाणे : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या मुख्य जलवाहिनी दुरुस्तीसाठी घेण्यात येणाऱ्या शटडाऊनचा कालावधी कमी करून एमआयडीसी व महापालिका प्रशासनाने समन्वय साधून येत्या मार्च अखेर दुरुस्ती व रिमॉडेलिंग प्रकल्पाची कामे जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. दरम्यान दिवा-मुंब्रा परिसरात सुरू असलेल्या विविध कामांचा आज खासदार श्रीकांत शिंदे यांनी आढावा घेवून ही सर्व कामे वेळेत पूर्ण करण्यात यावीत तसेच दर आठवड्यानी झालेल्या कामाचा आढावा घेण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

ठाणे महापालिकेतील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व महापौर नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा, महापालिकेतील विविध खात्यांचे महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते.

शटडाऊनचा कालावधी कमी करा, जलवाहिनी दुरुस्ती लवकर करा

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या मुख्य जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरु टप्याटप्याने सुरु आहे. यासाठी घेण्यात येणाऱ्या नियोजित शटडाऊन नंतर वारंवार ब्रेक डाऊन झाल्यामुळे दिवा परिसरात अनियमीत पाणी पुरवठा होत आहे. याबाबत आज खासदार डॉ. शिंदे यांनी एमआयडीसीचे व महापालिका प्रशासन यांची समवेत बैठक घेवून संपूर्ण कामाचा आढावा घेतला.

यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी जलवाहिनी दुरुस्तीसाठी घेण्यात येणाऱ्या शटडाऊनचा कालावधी कमी करून दोन्ही विभागाने समन्वय साधून विविध ठिकाणी अर्धवट अवस्थेत असलेल्या पाईपलाईन दुरुस्तीची सर्व कामे येत्या मार्च अखेर काम पूर्ण करण्याचे निर्देश संबंधितांना दिले.

कामे रखडता कामा नये, जलदगतीने पूर्ण करा, श्रीकांत शिंदेंच्या अधिकाऱ्यांना सूचना

या बैठकीमध्ये खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिवा विभागातील इतर विविध कामांचा आढावा घेतला. यामध्ये दिवा-मुंब्रा रस्त्याचा डी.पी.आर तयार करणे, बांधून तयार असलेले जलकुंभ कार्यान्वित करणे आदी कामे तात्काळ करणेबाबत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. तसेच दिवा-शिळ रोड, दिवा-आगासन रोड, दिवा बायपास, दातिवली रस्ता, साबे रोड,रेल्वे ओव्हर ब्रीज आदी रस्त्यांची कामे जलदगतीने व्हावीत या दृष्टीने प्रशासनाने कार्यवाही करण्याचे निर्देशही खासदार डॉ. शिंदे यांनी दिले. तसेच या सर्व कामांचा आढावा घेण्यासाठी दर आठवड्याला बैठक घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत.

शहरातील दिवा परिसर महत्वाचा भाग असून या विभागाच्या सर्वांगीण विकासाबाबत सदर बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली व सर्व कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश महापौर नरेश म्हस्के व महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे मंजूर असणाऱ्या क्षमतेचा रीतसर पाणीपुरवठा ठाणे महापालिकेस करण्याच्या सूचनाही महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी संबंधित एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

(Reduce the shutdown period, repair the aqueduct, complete the remodeling project early order MP Shrikant shinde thane municipal Carporation Meeting )

हे ही वाचा :

आगामी महापालिका निवडणुका महाविकास आघाडी खरंच एकत्र लढणार? जयंत पाटील यांचं मोठं विधान

कल्याणमध्ये पोलिसांची पोलिसांवरच कारवाई, 100 पेक्षा जास्त पोलिसांना दंड