कल्याणमध्ये पोलिसांची पोलिसांवरच कारवाई, 100 पेक्षा जास्त पोलिसांना दंड

कल्याणमध्ये वाहतूक पोलिसांनी निष्पक्ष कारवाईचं पुन्हा एकदा दर्शन घडवून दिलं आहे. विशेष म्हणजे वाहतूक पोलिसांनी पोलिसांकडूनच बेशिस्तपणे नो पार्किंगमध्ये गाड्या लावण्याविरोधात कारवाई केली आहे.

कल्याणमध्ये पोलिसांची पोलिसांवरच कारवाई, 100 पेक्षा जास्त पोलिसांना दंड
Traffic Police
Follow us
| Updated on: Oct 25, 2021 | 7:45 PM

कल्याण : आपण वाहतूक पोलिसांना कारवाई करताना नेहमी पाहतो. मोठमोठ्या शहरांमध्ये, चौकांमध्ये नेहमी आपण वाहतूक कोंडी होताना पाहतो. त्यावेळी भर उन्हात, पावसात वाहतूक पोलीस आपली मौल्यवान कामगिरी बजावतात. त्यांच्या कामाचं कौतुक केलं जातंच. पण काहीवेळा वाहतूक पोलिसांकडून नियम मोडल्याप्रकरणी केल्या जाणाऱ्या कारवाईवर टीका केली जाते. पण कल्याणमध्ये वाहतूक पोलिसांनी निष्पक्ष कारवाईचं पुन्हा एकदा दर्शन घडवून दिलं आहे. विशेष म्हणजे वाहतूक पोलिसांनी पोलिसांकडूनच बेशिस्तपणे नो पार्किंगमध्ये गाड्या लावण्याविरोधात कारवाई केली आहे. त्यामुळे त्यांचं कौतुक केलं जात आहे.

कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात पोलिसांची कारवाई

कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात स्मार्ट सिटी प्रकल्पाचे काम सुरु आहे. नो पार्किंगचा फलक लावून सुद्धा या ठिकाणी गाड्या पार्क केल्या जात आहेत. विशेष म्हणजे यामध्ये पोलिसांच्या गाड्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. कल्याण वाहतूक पोलिसांनी पोलिसांच्या गाड्यांच्या विरोधात आज कारवाईचा बडगा उगारला आहे. 100 हून जास्त पोलिसांच्या गाड्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

कारवाई करताना पोलिसांपुढे पेच होता, पण…

कल्याण स्टेशन परिसरात स्मार्ट सिटी अंतर्गत विकासाचे काम सुरु आहे. या ठिकाणी वाहतूक कोंडी होते. ही वाहतूक कोंडी सोडविण्याचे काम वाहतूक पोलीस करीत असतात. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रिक्षा चालक आणि नो पार्किंगमध्ये बेशिस्तपणे उभ्या केलेल्या दुचाकीमुळे नाहक त्रास सहन करावा लागतो. विशेष म्हणजे नो पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या गाड्या पोलीस आणि वकिलांच्या गाड्या जास्त असतात. या गाड्यांच्या विरोधात कारवाई करताना पोलिसांसमोर पेच निर्माण होतो.

अखेर 100 हून अधिक पोलिसांच्या गाड्यांवर कारवाई

यासंदर्भात वारंवार तक्रारी केल्या जात होत्या. कल्याणच्या वाहतूक पोलिसांनी या बेशिस्त गाड्यांच्या पार्किंगवर कारवाईचा बडगा उगारला आहे. वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुखदेव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्टेशन परिसरात नो पार्किंग झोनमध्ये उभ्या असलेल्या गाड्यांच्या विरोधात मोठी कारवाई केली गेली. यामध्ये 100 हून अधिक पोलिसांच्या गाड्यांच्या विरोधात ई चलानच्या माध्यमातून कारवाई केली आहे. तसेच पोलिसांनी यापूढे गाड्या उभ्या करुन अडथळा निर्माण करु नये, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा :

नागपुरातील प्रसिद्ध नगरसेवकाच्या घरी धाडसी चोरी, घरातील नोकर झोपले असताना चोरट्यांनी 32 लाखांचे दागिने लांबवले

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.