AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कल्याणकर संजलची ‘उत्तुंग झेप’; अमेरिकेत खासगी अंतराळ यान बनवण्याच्या टीममध्ये पटकावले स्थान

येत्या 20 जुलैला 'ब्ल्यू ओरिजिन' कंपनीतर्फे 'न्यु शेफर्ड' हे खासगी यान जगप्रसिद्ध ब्रँड अमेझॉनचे संस्थापक आणि ब्ल्यू ओरिजिन कंपनीचे मालक जेफ बेझोस यांच्यासह काही मोजक्या पर्यटकांना घेऊन अंतराळात झेपावणार आहे.

कल्याणकर संजलची 'उत्तुंग झेप'; अमेरिकेत खासगी अंतराळ यान बनवण्याच्या टीममध्ये पटकावले स्थान
कल्याणकर संजलची 'उत्तुंग झेप'
| Edited By: | Updated on: Jul 16, 2021 | 12:45 AM
Share

कल्याण : अंतराळ क्षेत्राविषयी अधिकाधिक माहिती जाणून घेण्याकडे तरुण-तरुणींचा कल वाढला आहे. याच उत्सुकतेतून काही जण मग अंतराळ मोहिमांमध्ये सहभागी होण्याचा निर्धार करतात. कल्याणच्या तरुणीने असाच निर्धार करून चक्क अमेरिकेमध्ये महाराष्ट्राबरोबर भारताचे नाव उज्ज्वल केले आहे. संजल गावंडे असे या मराठमोळ्या तरुणीचे नाव असून तिने अमेरिकेमध्ये अंतराळात झेपावणारे ‘न्यू शेफर्ड’ हे खासगी यान बनवणाऱ्या टीममध्ये स्थान पटकावले आहे. ती कल्याण पूर्वेकडील रहिवाशी आहे. तिच्या या कामगिरीबद्दल तिचे सर्वच स्तरांतून भरभरून कौतुक केले जात आहे. (Sanjal Gawande’s Great success; A place in the private spacecraft team in the United States)

‘ब्ल्यू ओरिजिन’ या स्पेस कंपनीने अंतराळ सफरीची केली होती घोषणा

अमेरिकेमधील ‘ब्ल्यू ओरिजिन’ या स्पेस कंपनीने अंतराळ सफरीची घोषणा केली आहे. या अंतराळ सफरीमध्ये संजल गावंडेने स्वतःला सिद्ध केले आहे. येत्या 20 जुलैला ‘ब्ल्यू ओरिजिन’ कंपनीतर्फे ‘न्यु शेफर्ड’ हे खासगी यान जगप्रसिद्ध ब्रँड अमेझॉनचे संस्थापक आणि ब्ल्यू ओरिजिन कंपनीचे मालक जेफ बेझोस यांच्यासह काही मोजक्या पर्यटकांना घेऊन अंतराळात झेपावणार आहे. हे यान बनवणाऱ्या कंपनीच्या टीममध्ये संजलचा समावेश आहे. कल्याणकर संजलने इंजिनीअरीगचे शिक्षण पूर्ण केली आहे. त्यानंतर विविध परीक्षा देत तिने इथपर्यंतचा प्रवास पूर्ण करीत आता अंतराळ सफरीमध्ये झेप घेतली आहे. तिने कल्याण शहराची पताका थेट अंतराळात फडकवली आहे. तिच्या या यशामुळे कुटूंबियांमध्ये प्रचंड आनंदाचे वातावरण आहे. मुलीचे हे यश आपल्याला गगनात मावेनासा आनंद देत असल्याची प्रतिक्रिया संजलच्या आई-वडिलांनी दिली आहे.

कठिण परिस्थितीतून मिळवले यश

संजल ही कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरातील रहिवाशी. तिची आई सुरेखा गावंडे या एमटीएनएलच्या कर्मचारी, तर वडील अशोक गावंडे हे कल्याण डोंबिवली महापालिकेचे निवृत्त कर्मचारी आहेत. मुलीने अत्यंत अतिशय कठीण परिस्थितीत हे यश मिळवले आहे, असे संजलच्या आई सुरेखा गावंडे यांनी सांगितले. संजलला कल्पना चावला आणि सुनीता विलियम्स यांच्यासारखी अंतराळात भरारी घ्यायची आहे. हे तिचे स्वप्न आहे आणि ते ती पूर्ण करणार, असा विश्वास संजलच्या वडिलांनी व्यक्त केला आहे.

‘न्यू शेफर्ड’ नेमके काय आहे?

‘न्यू शेफर्ड’ हे खासगी यान आहे. अंतराळ क्षेत्रात ‘न्यू शेफर्ड’ अंतराळ सफरचे लाँचिंग म्हणजे एक मैलाचा दगड मानला जात आहे. या यानातून प्रवास करण्यासाठीची किंमत तब्बल 28 मिलियन डॉलर इतकी आहे. हे रॉकेट डिझाईन करणाऱ्या 10 जणांच्या टीममध्ये संजल गावंडेचा समावेश आहे. या कामगिरीतून तिने कल्याणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्याची कौतुकाची थाप तिच्या पाठीवर पडली आहे. (Sanjal Gawande’s Great success; A place in the private spacecraft team in the United States)

इतर बातम्या

लसींचे दोन डोस घेतलेल्यांना ‘आरटीपीसीआर’मधून सूट

NABARD Grade A Recruitment 2021: नाबार्डमध्ये सहाय्यक व्यवस्थापक आणि व्यवस्थापकांसाठीच्या 165 पदांवर भरती, आजच अर्ज करा

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.