Kalyan Shivsena : टिका करणाऱ्यांकडे दाखविण्यासारखे काहीच नाही, भाजप आमदारांच्या टिकेवर शिवसेनेचा पलटवार

भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी काल मुंबईत पत्रकार परिषद घेऊन डोंबिवलीच्या विकासाचे मारेकरी एकनाथ शिंदेच असा आरोप केला होता. तसेच डोंबिवलीती 30 रस्ते रद्द करण्याचे काम पालकमंत्र्यांनी केली असे सांगितले होते. त्यांनी त्या आशयाचा बॅनरही डोंबिवली शहरात लावला होता. या टिकेला उत्तर देण्यासाठी आज डोंबिवली शहर शाखेत शिवसेनेच्या वतीने पत्रकार परिषद घेण्या आली.

Kalyan Shivsena : टिका करणाऱ्यांकडे दाखविण्यासारखे काहीच नाही, भाजप आमदारांच्या टिकेवर शिवसेनेचा पलटवार
टिका करणाऱ्यांकडे दाखविण्यासारखे काहीच नाही, भाजप आमदारांच्या टिकेवर शिवसेनेचा पलटवार
| Edited By: | Updated on: Feb 24, 2022 | 9:22 PM

कल्याण : भाजपचे आमदार रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्याकडे दाखविण्यासारखे काही एक उरले नाही. त्यांचे कर्म लपविण्यासठी ते दुसऱ्यांवर टीका करीत सुटले आहेत. त्यामुळे ते टीका करीत आहे. त्यांच्या टीकेला काही महत्व नाही. कल्याण डोंबिवलीचे तारणहार पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आहेत. पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) हे विकास पुरुष आहेत. डोंबिवलीची जनता त्यांना दाखवेल त्यांनी काय केले आणि पालकमंत्र्यांनी काय केले असा पलटवार शिवसेना पत्रकार परिषद घेऊन भाजपा आमदार रवींद्र चव्हाण यांच्या वर केला आहे. (Shiv Sena criticizes BJP MLA Ravindra Chavan over road works)

भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी काल मुंबईत पत्रकार परिषद घेऊन डोंबिवलीच्या विकासाचे मारेकरी एकनाथ शिंदेच असा आरोप केला होता. तसेच डोंबिवलीती 30 रस्ते रद्द करण्याचे काम पालकमंत्र्यांनी केली असे सांगितले होते. त्यांनी त्या आशयाचा बॅनरही डोंबिवली शहरात लावला होता. या टिकेला उत्तर देण्यासाठी आज डोंबिवली शहर शाखेत शिवसेनेच्या वतीने पत्रकार परिषद घेण्या आली. शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, युवासेना पदाधिकारी दीपेश म्हात्रे, ज्येष्ठ माजी नगरसेवक रमेश म्हात्रे, तात्या माने यावेळी उपस्थित होते.

त्या रस्त्याचा केवळ डीपीआर तयार केला होता – दीपेश म्हात्रे

यावेळी युवा सेना जिल्हाधिकारी दिपेश म्हात्रे यांनी आमदार चव्हाण यांच्या टिकेवर पलटवार केला आहे. दीपेश म्हात्रे यांनी सांगितले की, ज्या रस्त्यांची कामे रद्द करण्यात आल्याचे ते सांगत आहे, त्या रस्त्याचा केवळ डीपीआर तयार करण्यात आला होता. हा डीपीआर जून जुलै 2019 मध्ये तयार केला होता. त्याला मंजुरी दिली गेली नव्हती. त्यांनी मंजुरी मिळाल्याचे दाखवावे. जाहिर लाईव्ह कार्यक्रमात यावे आणि सांगावे असे सांगून आमदार चव्हाण यांना शिवसेनेने खुले आव्हान दिले आहे.

भाजप आमदार वैफल्यग्रस्त झालेत : रमेश म्हात्रे

कोविड काळात पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे हे रस्त्यावर उतरले होते. पालकमंत्र्यांना आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना दोन वेळा कोरोनाची लागण झाली. त्यांनी महापालिकेस कोरोना निवारण्याकरीता निधी दिली. मात्र भाजप आमदार हे त्यांच्या कोकणातील गावी जाऊन बसले होते. पालकमंत्री आणि खासदारांच्या विकास कामांमुळे तै वैफल्यग्रस्त झाले आाहे. त्यातून ते अशा प्रकारची टीका करीत आहे. विरोधकांकडून टिका झाली म्हणजे सत्ताधारी योग्य प्रकारे काम करीत असल्याचे हे द्योतक आहे, असे माजी ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी सांगितले. (Shiv Sena criticizes BJP MLA Ravindra Chavan over road works)

इतर बातम्या

Maratha Reservation : खासदार संभाजीराजे छत्रपतींचं 26 फेब्रुवारीला आमरण उपोषण, ‘वर्षा’ बंगल्यावर मराठा आरक्षण उपसमितीची खलबतं

मलिकांचा राजीनामा मागण्याचा भाजपला नैतिक अधिकार नाही, थोरातांचा हल्लाबोल; सुडाचं राजकारण सुरु, चव्हाणांचा आरोप