Shrikant Shinde : विरोधकांना काही बोलू द्या, आपण कामातून बोलतो; खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा विरोधकांना टोला

| Updated on: Feb 27, 2022 | 8:10 PM

कल्याण डोंबिवलीत एक मोठे असे संत सावळाराम महाराजांचे स्मारक व्हावे अशी मागणी केली. येणाऱ्या काळात महापालिकेच्या माध्यमातून स्मारकासाठी पाच एकरपेक्षा जास्त जागा मिळाली. तर त्या ठिकाणी संत सावळाराम महाराजांचे भव्य स्मारक उभे केले जाईल. त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करुन दिला असे त्यांनी सांगितले.

Shrikant Shinde : विरोधकांना काही बोलू द्या, आपण कामातून बोलतो; खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा विरोधकांना टोला
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे
Follow us on

कल्याण : विरोधकांना काय बोलायचे आहे ते बोलू द्या. आपण आपल्या कामामधून जे बोलतोय ते लोकांर्पयत पोहचतेय असा टोला शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी टिका करणाऱ्या विरोधकांना लगावला आहे. काही दिवसांपासून भाजप आमदार रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) हे शिवसेना खासदारांसह पालकमंत्र्यांच्या विरोधात आक्रमक आहेत. कल्याण पश्चिमेतील यशवंतराव चव्हाण मैदानात युवा सेनेचे सह सचिव योगेश निमसे यांच्यातर्फे राज्यस्तरीय भव्य फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात खासदार शिंदे यांच्यासह आमदार विश्वनाथ भोईर, केडीएमसीचे माजी नगरसेवक निलेश शिंदे, रवी पाटील, महेश गायकवाड हे उपस्थित होते. (Shiv Sena MP Dr. Reply to opponents who criticize Shrikant Shinde)

यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले की, प्रत्येक शहरात फुटबॉलचे स्वतंत्र मैदान असले पाहिजे. जेणे करून खेळाडूंना चांगला खेळ खेळता येतील. त्यासाठी प्रयत्न केले जातील. आता माती मैदानावर फुटबॉल खेळला जात आहे. येणाऱ्या काळात टर्फ असेल. कुठे आर्टिर्फिशनल असेल कुठे नॅचरल असेल. जिल्ह्यात फुटबॉल खेळासाठी चांगले इन्फ्रास्ट्रक्चर उभे केला जाईल.

केडीएमसी संत सावळाराम महाराजांचे मोठे स्मारक होणार

कल्याण डोंबिवली हे सांस्कृतिक शहर आहे. त्याचबरोबर संत सावळाराम महाराजांना मानणारा मोठा वर्ग आहे. तो या भागात राहतो. सगळी वारकरी माझ्याकडे आले होते. कल्याण डोंबिवलीत एक मोठे असे संत सावळाराम महाराजांचे स्मारक व्हावे अशी मागणी केली. येणाऱ्या काळात महापालिकेच्या माध्यमातून स्मारकासाठी पाच एकरपेक्षा जास्त जागा मिळाली. तर त्या ठिकाणी संत सावळाराम महाराजांचे भव्य स्मारक उभे केले जाईल. त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करुन दिला असे त्यांनी सांगितले.

कामाने विरोधकांना उत्तर देऊ, खासदार शिंदे यांचा टोला

आपला मेसेज हा आपल्या कामातूनच आहे. उद्धव ठाकरे हे जेव्हापासून मुख्यमंत्री झाले. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते आले. तेव्हापासून कल्याण डोंबिवलीसह एमएमआर रिजनला मोठा निधी आणण्यात यशस्वी झालो. पूर्ण विभागात विकास कामे सुरु आहेत. रस्ते, फ्लायओव्हरची कामे सुरु आहेत. येणाऱ्या काळात विकास कामासाठी आणखी कसा जास्त निधी येईल. यावर माझा जास्त भर असेल. विरोधकांना काय बोलायचे आहे ते बोलू द्या. आपण आपल्या कामामधून जे बोलतोय ते लोकांर्पयत पोहचतेय असा टोला शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी टिका करणाऱ्या विरोधकांना लगावला आहे. (Shiv Sena MP Dr. Reply to opponents who criticize Shrikant Shinde)

इतर बातम्या

‘एक रुपया जरी खाल्ला असेल तर धैर्यवर्धन पुंडकरांच्या घरासमोर हात कलम करेन!’ आरोप फेटाळत बच्चू कडूंचा पलटवार

हिंम्मत असेल तर उस्मानाबादेत फिरून दाखवा, राणा जगजीत सिंह यांचा मंत्र्यांना इशार