AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिंम्मत असेल तर उस्मानाबादेत फिरून दाखवा, राणा जगजीत सिंह यांचा मंत्र्यांना इशार

छत्रपती संभाजीराजे उपोषणाला (Chatrapati Sambhajiraje Hunger Strike)  बसल्याने पुन्हा राज्यभर आंदोलन उभा राहाताना पाहायला मिळतंय. भाजपही (Bjp) या आंदोलनात संभाजीराजेंना पाठिंबा देत उतरले आहे.

हिंम्मत असेल तर उस्मानाबादेत फिरून दाखवा, राणा जगजीत सिंह यांचा मंत्र्यांना इशार
राणा जगजीत सिंह यांचा राजेंना पाठिंबा
| Edited By: | Updated on: Feb 27, 2022 | 7:37 PM
Share

उस्मानाबाद : गेल्या काही दिवसात शांत झालेला मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा पुन्हा चांगलाच तापला आहे. आता छत्रपती संभाजीराजे उपोषणाला (Chatrapati Sambhajiraje Hunger Strike)  बसल्याने पुन्हा राज्यभर आंदोलन उभा राहाताना पाहायला मिळतंय. भाजपही (Bjp) या आंदोलनात संभाजीराजेंना पाठिंबा देत उतरले आहे. उद्या उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व गावात ग्रामपंचायती समोर तर शहरात तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. तसेच मागण्या मान्य होईपर्यत मंत्र्यांना जिल्हा प्रवेश बंदी करण्याचा इशारा तुळजापूरचे आमदार राणा जगजित सिंह पाटील यांनी दिला आहे. ठाकरे सरकार प्रत्येक अर्थाने गद्दार निघाले असून, आश्वासने पाळली नाहीत. राज्य सरकारमधील मंत्र्यांची हिम्मत असेल तर त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यात येऊन दाखवावे, जिल्ह्यात आलात तर प्रचंड रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा पाटील यांनी दिला.सत्ताधारी, लोकप्रतिनिधी यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे बैठक लावावी असेही ते म्हणाले.

आरक्षाच्या मागणीने पुन्हा जोर धरला

छत्रपती संभाजी राजे यांच्या मराठा आरक्षणाच्या मागणीला व आमरण उपोषण आंदोलनाला उस्मानाबाद जिल्ह्यात वाढता पाठिंबा मिळत आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा आरक्षण व समाजाच्या इतर मागण्या राज्य सरकारकडे केल्या होत्या. परंतू त्या पुर्ण न झाल्याने खासदार छ्त्रपती संभाजीराजे उपोषणास बसले आहेत. त्यांच्या समर्थनार्थ भाजपा आमदार राणा जगजित सिंह पाटील यांनी तुळजापुरात लाक्षणिक उपोषण केले. अनेक भाजप नेते या आंदोलनात उतरले आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. काही दिवसात हे आंदोलन आणखी व्यापक होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्र्यांशी बैठक आयोजित करावी

उस्मानाबाद जिल्ह्यात सर्व ग्रामपंचायत कार्यालय , जिल्हाधिकारी , उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करून उद्या दुपारी पुन्हा पुढील आंदोलनाची दिशा व रणनीती ठरवू असे पाटील म्हणाले आहेत. तसेच सत्ताधारी आमदार , खासदारांनी पक्षीय बाबी बाजूला ठेवून जबाबदारी स्वीकारावी असे आवाहनही त्यांनी केले आहे. मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांची बैठक लावावी, त्यानंतर चर्चेतून मार्ग निघू शकतो असेही मत त्यांनी व्यक्त केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. अशातच संभाजीराजे उपोषणाला बसल्याने भाजप आणखी आक्रमकतेने राज्य सरकारवर हल्लाबोल करत आहे.

‘मातोश्री’चं नाव दिल्ली ठेवण्याचा विचार दिसतो! सदाभाऊ खोतांचा आदित्य ठाकरेंना जोरदार टोला

Video : आधी अलिशान “महिंद्रा थार”, मग बैलगाड्याचा कासरा, भरणे मामांच्या डबल ड्राईव्हिंगची हवा

वीज पुरवठा खंडित प्रकरणची उच्चस्तरीय चौकशी, ऊर्जामंत्री अॅक्शन मोडमध्ये

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.