AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी विशेष व्याख्यानमालेचे आयोजन

ठाणे महानगरपालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या निर्देशानुसार ठाणे शहरातील केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता ''व्यक्तिमत्व विकास'' या विषयाबाबत ठाण्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी व्ही.एन.शिंदे यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आलेले होते.

चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी विशेष व्याख्यानमालेचे आयोजन
चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी विशेष व्याख्यानमालेचे आयोजन
| Edited By: | Updated on: Mar 10, 2022 | 6:51 PM
Share

ठाणे : व्यक्तिमत्व विकास म्हणजे माणसाचा सर्वांगीण विकास असून यामध्ये शारीरिक व मानसिक सदृढता महत्त्वाची आहे. व्यक्तिमत्व विकासात नेतृत्वगुण, एकात्मता व बंधुभाव हे सर्वात महत्त्वाचे घटक असून स्पर्धा परीक्षे (Competitive Exam)चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्व विकासावर विशेष भर द्यावा, असे मत उप प्रादेशिक परिवहन अधिकारी व्ही.एन.शिंदे यांनी व्यक्त केले. ठाणे महानगरपालिका संचलित चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थे (Chintamanrao Deshmukh Administrative Training Institute)च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विशेष व्याख्यानमालेत ते बोलत होते. या व्याख्यानमालेस शहरातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. (Special lecture series organized by Chintamanrao Deshmukh Administrative Training Institute)

व्यक्तिमत्व विकासबाबत विशेष व्याख्यानाचे आयोजन

ठाणे महानगरपालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या निर्देशानुसार ठाणे शहरातील केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता ”व्यक्तिमत्व विकास” या विषयाबाबत ठाण्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी व्ही.एन.शिंदे यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आलेले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी युध्दकाळात अंमलात आणलेल्या अनेक युक्त्या, गनिमीकावा, दूरदृष्टिकोन, सकारात्मकपणा अशा अनेक गोष्टींचा प्रामुख्याने विचार केल्यास, आपण आपला व्यक्तिमत्व विकास करू शकतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या युध्दकौशल्याचा दूरदृष्टिकोन अंमलात आणून आपण चांगले यश संपादन करु शकतो तसेच आपला व्यक्तिमत्व विकास चांगल्या प्रकारे करू शकतो, असे व्ही.एन.शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.

व्ही.एन. शिंदे यांचा प्रबोधन रत्न पुरस्कार देऊन सत्कार

उप प्रादेशिक परिवहन अधिकारी शिंदे हे नांदेड जिल्हाचे सुपूत्र असून, ते एक उत्तम वक्ता, अध्यात्मवादी, योग अभ्यासक व उत्तम लेखक आहेत. “प्रवास स्वप्नपूर्तीचा” या बेस्ट सेलर पुस्तकाचे ते लेखक आहेत. तसेच महात्मा जोतिबा फुले शिक्षक परिषद आयोजित शिर्डी येथील कार्यक्रमात त्यांना “प्रबोधन रत्न” पुरस्कार देवून त्यांना गौरविण्यात आलेले आहे. सदर कार्यक्रमाला वरिष्ठ पोलिस निरीक्षक (गुन्हे अन्वेषण) अनिल देशमुख आणि व नौपाडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय धुमाळ यांनी देखील विद्यार्थ्यांशी संवाद साधून मार्गदर्शन केले. (Special lecture series organized by Chintamanrao Deshmukh Administrative Training Institute)

इतर बातम्या

पोलिसाच्या डोक्यात घातला दगड, भांडणाऱ्यांना समज देतानाचा प्रकार, पोलीस असुरक्षित तर लोकांचं काय?

Video | बाटलीत डिझेल दिले नाही म्हणून पेट्रोलपंप कर्मचाऱ्याला मारहाण; पेव्हर ब्लॉक डोक्यात घातला

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.