AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pradeep Purnekar: प्रदीप पुर्णेकर हत्येप्रकरणातील तो टल्ली कोण? तपासात नाव समोर, अजून एका आरोपीचा सुगावा लागला, मोठी अपडेट काय?

Pradeep Purnekar Death Case: ठाण्यातील मानपाडा परिसरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पुर्णेकर यांची मंगळवारी रात्री निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणातील एक मुख्य संशयित टल्ली याचे नाव सतत पुढे येत आहे. तपासात आता या टल्लीचे खरे नाव समोर आले आहे. काय आहे अपडेट?

Pradeep Purnekar: प्रदीप पुर्णेकर हत्येप्रकरणातील तो टल्ली कोण? तपासात नाव समोर, अजून एका आरोपीचा सुगावा लागला, मोठी अपडेट काय?
प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरण
| Updated on: Oct 03, 2026 | 9:12 AM
Share

ठाण्यातील मानपाडा परिसरात ठाकरे सेनेचे विभागप्रमुख प्रदीप पुर्णेकर यांचा मंगळवारी कार्यालयात घुसून निर्घृण खून करण्यात आला होता. या हत्या प्रकरणाच्या तपासाला आता वेग आला आहे. या प्रकरणातील आरोपी प्रदीप उर्फ पप्या शिंदे याच्यानंतर निखिल यादव, नितेश पवार यांच्यानंतर आणखी दोन संशयितांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. ठाणे गुन्हे शाखेने प्रकरणात पप्या शिंदेची कार आणि हत्येत वापरलेल्या दोन दुचाकी जप्त केली आहे. तर आरोपी पप्या शिंदे याच्या आईने संशय व्यक्त केलेला टल्लीची ओळख पटवण्यात यश आले आहे. तपासात त्याचे नावही समोर आले आहे. यामुळे या हत्याप्रकरणात पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागण्याची शक्यता आहे.

१०० हून अधिक CCTVची तपासणी

ठाणे पूर्णेकर हत्या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू आहे. खंडणी गुन्हे शाखेकडून परिसरातील १०० हून अधिक CCTVची तपासणी, दुकानदार, नातेवाईक आणि मित्रांची चौकशी करत साक्ष नोंदवल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. हत्येचा मुख्य सूत्रधाराचा सुगावा लावण्यासाठी १०० हून अधिक CCTV फुटेजची पोलिसांकडून तपासणी करण्यात आली. हत्येचे स्थळ परिसरातील दुकानदार, व्यापारी , आणि प्रत्यक्षदर्शींची कसून चौकशी करण्यात आली आहे. नातेवाईक आणि जवळच्या मित्रांचे जबाब नोंदवले गेले आहेत. संशयितांचीही चौकशी सुरू आहे.

आतापर्यंत तिघांना अटक

हत्येमागील आर्थिक, राजकीय आणि वैयक्तिक वादाच्या सर्व बाजू तपासल्या जात आहे. या हत्येप्रकरणात पप्या शिंदे, निखिल यादव आणि नितेश पवार या तिघांना अटक करण्यात आली आहे. निखिल यादव आणि नितेश पवार यांना ८ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आणखी काही आरोपींचा शोध सुरू आहे. ते हाती लागल्यावर या प्रकरणाच उलगडा होईल.

तो टल्ली कोण?

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात टल्ली नावाच्या व्यक्तीचा सातत्याने उल्लेख होत होता. पप्या शिंदे याच्या आईने सुद्धा टीव्ही 9 मराठीशी बोलताना या खूनामागे तो टल्ली असल्याचा आरोप केला होता. आता पोलीस तपासात त्या टल्लीचे खरे नाव समोर आले आहे. पोलीस संतोष कनोजिया उर्फ टल्लीसह आणखी एका संशयिताचा शोध घेत आहे. याप्रकरणात ९ विशेष पथकांकडून तपास करण्यात येत आहे. दरम्यान पप्या शिंदेची कार आणि हत्येत वापरलेल्या दोन दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे. CCTV, तांत्रिक विश्लेषण , आरोपी आणि साक्षीदारांच्या जबाबातून हत्येचा कट उलगडण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.

Follow Us
आज भारत-पाकिस्तानमध्ये फायनल सामन्याचा थरार; अय्यरच्या नेतृत्वाखाली...
IND vs PAK Asian Games Final : आज भारत-पाकिस्तानमध्ये फायनल सामन्याचा थरार; श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारत करणार का गोल्डन कामगिरी?
मागण्या मान्य असतानाही रोहित पवारांचं आंदोलन का?; सरकारचा थेट सवाल....
Rohit Pawar : MPSC : मागण्या मान्य असतानाही रोहित पवारांचं आंदोलन का?; सरकारचा थेट सवाल तर, MPSCवर मोठे निर्णय कोणते?
येडेश्वरी खवा सेंटरला FDAचा मोठा दणका; 125 किलो खवा जप्त, परवाना थेट..
Dharashiv : येडेश्वरी खवा सेंटरला FDAचा मोठा दणका; 125 किलो खवा जप्त अन्, परवाना थेट...
मी पुन्हा येईन म्हणत अभिजित दिपकेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना डिवचलं....
tv9 Marathi Special Report : Abhijeet Dipke : मी पुन्हा येईन म्हणत अभिजित दिपकेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना डिवचलं; CJPच्या आंदोलनात नेमकं काय घडलं?
तारीख ठरली, ज्ञानेश कुमारांनी राजीनामा दिला नाही तर....
Abhijeet Dipke : तारीख ठरली, ज्ञानेश कुमारांनी राजीनामा दिला नाही तर पुन्हा दिल्लीत आंदोलन भडकणार?; अभिजीत दिपकेंचा थेट इशारा
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...