ठाणे मनपाची धडक कारवाई सुरुच, दिवा, वर्तक नगरमधील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त

| Updated on: Jul 03, 2021 | 11:34 PM

ठाणे महापालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाईची मोहिम सुरु असून आज दिवा प्रभाग समितीमधील वाढीव अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले.

ठाणे मनपाची धडक कारवाई सुरुच, दिवा, वर्तक नगरमधील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त
unauthorized constructions in Diva
Follow us on

ठाणे : ठाणे महापालिकेच्या वतीने गेल्या काही दिवसांपासून प्रभाग समितीनिहाय अनधिकृत बांधकामांवर कारवाईची धडक मोहीम सुरु आहे. याचदरम्यान आज दिवा प्रभाग समिती व वर्तकनगर प्रभाग समितीमधील वाढीव अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. सदरची कारवाई ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशान्वये करण्यात आली. (Thane Municipal Corporation cracks down on unauthorized constructions in Diva and Vartak Nagar)

या कारवाईतंर्गत दिवा प्रभाग समिती येथील मुंब्रादेवी कॉलनी येथील 3 मजली इमारतीतील 4 थ्या मजल्याचे वाढीव अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले. तसेच वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रांतर्गत पोखरण रोड क्र. 1, उपवन इंडस्ट्रीज प्लॉट न. 206 येथील रवी अच्युत पुजारी यांच्या 32 × 52 चौ. फूट मोजमाप असलेल्या जागेवर विटांची भिंत व लोखंडी अँगलची उभारणी करून अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते. सदरचे बांधकाम आज जेसीबी मशीनच्या साहाय्याने निष्कासित करण्यात आले.

सदर निष्कासनाची कारवाई अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाचे उप आयुक्त अशोक बुरपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त महेश आहेर व सहाय्यक आयुक्त प्रणाली घोंगे यांनी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि पोलीस यांच्या साहाय्याने पार पाडली. या कारवाईतंर्गत काल (2 जुलै) दिवा प्रभाग समिती येथील एनआरनगर तळ अधिक 3 मजली इमारतीतील 4 थ्या मजल्याचे वाढीव अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले होते.

दोन दिवसात 13 अनधिकृत बांधकामांवर हातोडा

ठाणे महापालिका आयुक्त (Thane Municipal Commissioner) डॉ. विपिन शर्मा यांनी शहरातील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर 27 आणि 28 जून अशा दोन दिवसात माजिवडा – मानपाडा प्रभाग समिती आणि कळवा प्रभाग समितीमधील एकूण 13 अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. दरम्यान यापुढेही सर्व प्रभाग समितीमध्ये अनधिकृत बांधकामावर कारवाई सुरूच ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.

या कारवाईतंर्गत कासारवडवली येथील 8 अनधिकृत दुकान गाळे आणि 1 खोलीचे बांधकाम निष्कासित करण्यात आले. तर बाळकूम येथील इमारतीमध्ये 3 अनधिकृत वाढीव बांधकाम निष्कासित करण्यात आले. तसेच कळवा प्रभाग समितीमधील 1 बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले. सदर निष्कासनाची कारवाई अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाचे उप आयुक्त अशोक बुरपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त डॉ. अनुराधा बाबर आणि सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे यांनी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि पोलीस यांच्या साहाय्याने पूर्ण केली.

इत बातम्या

अंबरनाथ पालिकेची मोठी मोहीम, रस्ता मोकळा करण्यासाठी 14 टपऱ्या, अनधिकृत दुकांनावर केली कारवाई

‘गणेशोत्सवावरील निर्बंध उठवा, अन्यथा पालिका मुख्यालयासमोर महाआरती करु’

आरारारा… खतरनाक!!! Cylinder Man सागर जाधवला प्रवीण तरडेंकडून चित्रपटात संधीचं आश्वासन