Thane : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव! ठाण्यात मॅरेथॉन स्पर्धा आणि बाईक रॅलीचं आयोजन

Thane : शहरातील बाईक, स्कूटर, इलेक्ट्रिक स्कूटर, असे कोणतेही वाहन घेऊन अधिकाधिक नागरिकांनी या रॅलीत सहभागी व्हावे असे आवाहन 'ठाणे महानगरपालिका व उत्सव75' ठाणे समितीने केले आहे.

Thane : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव! ठाण्यात मॅरेथॉन स्पर्धा आणि बाईक रॅलीचं आयोजन
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव! ठाण्यात मॅरेथॉन स्पर्धा आणि बाईक रॅलीचं आयोजन Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 08, 2022 | 7:15 PM

ठाणे : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ठाणे महानगरपालिका (thane corporation) व ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेच्या सहकार्याने 14 ऑगस्ट रोजी 10 कि.मीच्या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदरची मॅरेथॉन स्पर्धा (marathon competition) ही ठाणे महापालिका भवन येथून सुरू होवून त्याच ठिकाणी समाप्त होणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवीनिमित्त आयोजित केलेल्या या मॅरेथॉन स्पर्धेत नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन ठाणे (thane) महापालिकेने केले आहे. या स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी आज महापालिकेच्यानरेंद्र बल्लाळ सभागृहत येथे अतिरिक्त आयुक्त 2 संजय हेरवाडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीला (उपायुक्त) क्रीडा अधिकारी मीनल पालांडे, वाहतूक पोलीस अधिकारी, पोलीस अधिकारी, ठाणे जिल्हा ॲथलेटिक संघटनेचे सचिव अशोक आहेर, प्रमोद कुलकणी आदी पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत स्पर्धेचे नियोजन करण्यासंदर्भात सर्व संबंधितांना सूचना देण्यात आल्या.

ठाणे जिल्हास्तरावर होणाऱ्या या मॅरेथॉन स्पर्धेसाठी पुरूष (वयोगट 18 वरील खुला गट), महिला (16 वर्षावरील खुटा गट) असे दोन गट असणार आहेत. या स्पर्धेची सुरूवात ठाणे महानगरपालिका मुख्यालयापासून होणार असून नितिन कंपनी, सर्व्हिस रोड, कोरम मॉल, वर्तकनगर, शिवाईनगर, उपवान तलाव, बिरसा मुंडा चौक, उन्नती गार्डन, शिवाईनगर येथून पुन्हा त्याच मार्गावरुन महापालिका मुख्यालय येथे समाप्त होणार आहे.

हे सुद्धा वाचा

घसघशीत बक्षिसे

या स्पर्धेतील पुरूष व महिला या दोन्ही गटातील विजेत्या प्रथम क्रमांकास रुपये 15000/-, द्वितीय रु. 12000/- तृतीय रु 10000/- चतुर्थ रु. 7000/- पाचवे रु. 5000 अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्‌या या मॅरेथॉन स्पर्धेस जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. तसेच ठाणे महानगरपालिकेच्या मॅरेथॉन स्पर्धेच्यावेळी ठाणे पोलीसांची मॅरेथॉन सुद्धा ठाणे महापालिका भवन येथून सुरू होवून याच ठिकाणी समाप्त होणार आहे.

बाईक रॅलीही पार पडणार

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ठाणे महापालिकेच्या सहकार्याने शहरात ‘उत्सव 75 ठाणे’ साजरा होत आहे. या उत्सवानिमित्त स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत शेकडो बायकर्स एक संदेश घेऊन मोठी यात्रा करणार आहेत. ‘वाहन चालवताना बाळगण्याची सुरक्षितता’ असा विषय घेऊन हे बायकर्स सकाळी 6 वाजता कल्पतरू पार्कसाईड, ढोकाळी इथून निघून शहरातील 4 ऐतिहासिक तलावांच्या बाजूने सफर करत दादा कोंडके अॅम्पीथिएटर पर्यंत येणार असून तिथेच या रॅलीच्या सांगता होईल.

अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे

शहरातील बाईक, स्कूटर, इलेक्ट्रिक स्कूटर, असे कोणतेही वाहन घेऊन अधिकाधिक नागरिकांनी या रॅलीत सहभागी व्हावे असे आवाहन ‘ठाणे महानगरपालिका व उत्सव75’ ठाणे समितीने केले आहे. या अनोख्या बाईक रॅलीचे आयोजन R4C म्हणजे ‘राईड फॉर कॉज’ या संस्थेने केले आहे. बाईक रॅलीत सहभागी होण्यासाठी राजीव शहा 9820186977 निकिता राहाळकर 9930009066 यांना या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन समिती तर्फे करण्यात आले आहे.

Non Stop LIVE Update
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.