Eknath Shinde Shivsena : आर्श्चयकारक, ठाकरे विरोधातील आंदोलनाकडे ठाण्यातील एकनाथ शिंदेंच्या शिवसेना नगरसेवकांनी फिरवली पाठ

Eknath Shinde Shivsena : ठाण्याच्या राजकारणात सध्या प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाचा मुद्दा तापला आहे. मागच्या दोन-तीन दिवसांपासून शिवसेनेच्या माजी महापौर,नगरसेविका मीनाक्षी शिंदे आणि पती राजेंद्र शिंदे या दोघांच्या अटकेच्या मागणीसाठी पूर्णेकर कुटुंबीय सातत्याने आंदोलनं करत आहे.

Eknath Shinde Shivsena : आर्श्चयकारक, ठाकरे विरोधातील आंदोलनाकडे ठाण्यातील एकनाथ शिंदेंच्या शिवसेना नगरसेवकांनी फिरवली पाठ
Eknath Shinde-Uddhav Thackeray
| Updated on: Oct 30, 2026 | 12:28 PM

ठाण्याच्या राजकारणात सध्या प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाचा मुद्दा तापला आहे. मागच्या दोन-तीन दिवसांपासून शिवसेनेच्या माजी महापौर,नगरसेविका मीनाक्षी शिंदे आणि पती राजेंद्र शिंदे या दोघांच्या अटकेच्या मागणीसाठी पूर्णेकर कुटुंबीय सातत्याने आंदोलनं करत आहे. पूर्णेकर कुटुंबीयांनी मिनाक्षी शिंदे यांच्या अटकेच्या मागणीसाठी नौपाडा पोलीस ठाण्यात ठिय्या दिला होता. काल टेंभीनाका परिसरामध्ये दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आमने-सामने आले. त्याआधी आमदार आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी पूर्णेकर कुटुंबीयांची भेट घेतली. पोलिस आयुक्तांचीही भेट घेतली. त्यापूर्वी माजी खासदार राजन विचारे यांनीही पोलिस आयुक्तांची भेट घेतली होती. दरम्यान आता एक माहिती समोर आली आहे.

काल ठाकरेंविरोधातील टेंभी नाक्यावरील आंदोलनाला शिंदे यांच्या शिवसेनेचे काही नगरसेवकांनी दांडी मारली. ठाण्यातल्या शिवसेनेच्याच नगरसेवकांनी आंदोलनाकडे पाठ फिरवली. एकनाथ शिंदेंसाठी येऊ, मीनाक्षी शिंदेंसाठी नाही अशी नगरसेवकांनी भूमिका घेतली. आंदोलनात सहभागी झालेले नगरसेवक कल्याण-डोंबिवलीचे होते. मीनाक्षी शिंदे राजीनामा प्रकरणावरून शिवसेनेत नाराजी आहे. आंदोलनात सहभागी झालेले नगरसेवक ठाण्यासह कल्याण-डोंबिवलीचे होते. प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाला आता महिना होऊन गेलाय. काही जणांना अटक सुद्धा झाली आहे. मिनाक्षी शिंदेंचे पती राजेंद्र शिंदे यांची चौकशी सुद्धा झाली आहे.

Loading...

ठाण्यात राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणात तापलं

प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरणात शिंदे गटाच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी त्यांच्या महिला आघाडी पदाचा राजीनामा दिल्या नंतर लवकरच मीनाक्षी शिंदे माध्यमांसमोर सविस्तर बोलणार आहेत. प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरणात काल ठाकरेंची शिवसेना यांनी पोलीस आयुक्तालय गाठत पत्रकार परिषद घेतली. मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांना अटक करण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे शिंदेंची शिवसेना यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला विरोध दर्शवण्यासाठी रस्त्यावरती उतरून आंदोलन केलं होतं. ठाण्यात राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणात तापलं होतं.

ठाण्यामध्ये विरोधकांची एकजूट

ठाकरे शिवसेनेचे ठाणे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणानंतर ठाण्यामध्ये विरोधकांची एकजूट झाली आहे. मनसेनेही ठाकरेसेनेला पाठिंबा दिला आहे.यापूर्वीही एका मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us