Shahapur Drowned : शहापूरमध्ये मायलेकी खदानीत बुडाल्या; मुलीचा मृत्यू, आईला वाचवण्यात यश

| Updated on: May 29, 2022 | 10:14 PM

हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथील पवार कुटुंब मोलमजुरीसाठी ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील कसारा सावरवाडी येथे आले होते. आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास वर्षा पवार या कपडे धुण्यासाठी खदानीत गेल्या होत्या. त्यांच्यासोबत त्यांची 9 वर्षाची मुलगीही कपडे धुण्यासाठी खदानीत गेली होती.

Shahapur Drowned : शहापूरमध्ये मायलेकी खदानीत बुडाल्या; मुलीचा मृत्यू, आईला वाचवण्यात यश
शहापूरमध्ये मायलेकी खदानीत बुडाल्या
Image Credit source: TV9
Follow us on

शहापूर : कपडे धुण्यासाठी गेले असता खदानीत बुडून (Drowned) मायलेकी बुडाल्याची दुर्दैवी घटना शहापूर तालुक्यातील कसारा सावरवाडी येथे घडली आहे. या दुर्घटने (Incident)त 9 वर्षीय मुलीचा बुडून मृत्यू (Death) झाला आहे. तर आईला वाचवण्यास यश आले आहे. आईला उपचारासाठी शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वर्षा ज्ञानेश्वर पवार असे वाचवण्यात आलेल्या आईचे नाव आहे. मुलीच्या मृत्यूमुळे पवार कुटुंबियांसह कसारा सावरवाडी गावावर शोककळा पसरली आहे. मुलीच्या अशा अकस्मात जाण्याने पवार कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुलीच्या मृत्यूप्रकरणी शहापूर पोलिसात अपघाची मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मुलीला वाचवण्यासाठी आईने पाण्यात उडी घेतली

हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथील पवार कुटुंब मोलमजुरीसाठी ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील कसारा सावरवाडी येथे आले होते. आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास वर्षा पवार या कपडे धुण्यासाठी खदानीत गेल्या होत्या. त्यांच्यासोबत त्यांची 9 वर्षाची मुलगीही कपडे धुण्यासाठी खदानीत गेली होती. कपडे धुत असतानाच वर्षा यांची 9 वर्षाच्या मुलीचा पाय घसरला आणि खदानीत पडली. मुलीला बुडताना पाहून तिला वाचवण्यासाठी आईनेही पाण्यात उडी मारली. यावेळी आईने आरडाओरडा केल्याने पाड्यातील लोकांनी आवाज ऐकून खडानीकडे धाव घेतली. लोकांनी मायलेकीला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र दुर्दैवाने तोपर्यंत खूप उशीर झाला आणि मुलीचा मृत्यू झाला. मात्र आईला वाचवण्यास लोकांना यश आले. खदानीत बाहेर काढत तात्काळ आईला उपचारासाठी शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल नेण्यात आले. सध्या वर्षा पवार यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (The girl drowned in a mine in Shahapur, her mother was rescued)

हे सुद्धा वाचा