VIDEO : चालत्या रेल्वेतून उतरताना तोल जाऊन गाडीखाली आल्याने प्रवाशाचा मृत्यू, घटना सीसीटीव्हीत कैद

प्रदीप भंगाळे हे कल्याण डोंबिवली महापालिकेत कंत्राटदार होते. ते कल्याणमधील मंगल व्हॅली येथे कुटुंबासोबत राहतात. ते काही कामानिमित्त त्यांच्या गावी जळगावला गेले होते. आज दुपारी ते मेल एक्सप्रेस गाडीने कल्याणला परतले. फलाट क्रमांक 5 वर ते गाडीतून उतरत असताना त्यांचा तोल गेला आणि ते चालत्या गाडीखाली आले.

VIDEO : चालत्या रेल्वेतून उतरताना तोल जाऊन गाडीखाली आल्याने प्रवाशाचा मृत्यू, घटना सीसीटीव्हीत कैद
चालत्या रेल्वेतून उतरताना तोल जाऊन गाडीखाली आल्याने प्रवाशाचा मृत्यू
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Apr 07, 2022 | 8:59 PM

कल्याण : चालत्या ट्रेनमधून उतरताना तोल जाऊन गाडीखाली आल्याने एका कंत्राटदाराचा मृत्यू (Death) झाल्याची घटना आज दुपारी कल्याण रेल्वे स्थानकात घडली. प्रदीप भंगाळे असे मृत्यूमुखी पडलेल्या कंत्राटदाराचे नाव आहे. ही घटना कल्याण रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही (CCTV)त कॅमेऱ्यात कैद झाली आहे. भंगाळे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. चालत्या गाडीतून प्रवाशांनी उतरू नये असे आवाहन आणि सूचना रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे स्थानकात केल्या जातात. मात्र प्रवाशांकडून या सूचना पाळण्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळेच ही घटना घडली आहे. (The passenger died after falling off the train while getting off the moving train)

चालत्या गाडीतून उतरताना घडला अपघात

प्रदीप भंगाळे हे कल्याण डोंबिवली महापालिकेत कंत्राटदार होते. ते कल्याणमधील मंगल व्हॅली येथे कुटुंबासोबत राहतात. ते काही कामानिमित्त त्यांच्या गावी जळगावला गेले होते. आज दुपारी ते मेल एक्सप्रेस गाडीने कल्याणला परतले. फलाट क्रमांक 5 वर ते गाडीतून उतरत असताना त्यांचा तोल गेला आणि ते चालत्या गाडीखाली आले. फलाट आणि गाडीच्या मध्ये सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबियाना त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. त्यांचा मृतदेह महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. चालत्या गाडीतून उतरताना ही घटना घडली असल्याचे सांगण्यात येत आहे. तर गाडी थांबली होती. गाडी अचानक सुरु झाल्याने ही घटना घडली असल्याचे काही जणांकडून सांगण्यात आले. (The passenger died after falling off the train while getting off the moving train)

इतर बातम्या

पत्नीचा उपचारादरम्यान मृ्त्यू झाल्यानं पतीचा डॉक्टरवर प्राणघातक हल्ला! राजगुरुनगरमधील रुग्णालयात नातलगांची तोडफोड

VIDEO : बुलढाण्यात क्षुल्लक कारणावरून दुकान चालकावर जीवघेणा हल्ला, घटना cctvमध्ये कैद