Badlapur Youth Collapse : बदलापूरमध्ये चंदेरी गडावरून पडलेल्या तरुणाला सुखरूप वाचवलं, तब्बल 22 तासांनंतर रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण

बदलापूरजवळच्या चंदेरी गडावर बुधवारी मुंबईतील मुलुंडहून 7 जण ट्रेकिंगसाठी आले होते. यापैकी विराज म्हस्के हा 22 वर्षीय तरुण गुहेजवळून पाय घसरून दरीत कोसळला. त्याला वाचवण्यासाठी बदलापूरची नेचर एक्सप्लोरर रेस्क्यू टीम योगेश साखरे यांच्या नेतृत्त्वाखाली गडावर पोहोचली. मात्र विराज हा दरीत कोसळल्याने आणि त्याचा पाय फ्रॅक्चर झाला होता. त्यामुळं त्याला तिथून बाहेर काढणं आव्हानात्मक काम होतं.

Badlapur Youth Collapse : बदलापूरमध्ये चंदेरी गडावरून पडलेल्या तरुणाला सुखरूप वाचवलं, तब्बल 22 तासांनंतर रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण
चंदेरी गडावरून पडलेल्या तरुणाला सुखरूप वाचवलं
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: May 05, 2022 | 9:10 PM

बदलापूर : बदलापूरच्या चंदेरी गडावरून एक 22 वर्षीय तरुण (Youth) दरीत कोसळल्याची घटना बुधवारी दुपारी घडली होती. या तरुणाला तब्बल 22 तास चाललेल्या रेस्क्यू ऑपरेशन (Rescue Operation)नंतर सुखरूप वाचवण्यात आलंय. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विराज म्हस्के (22) असे या तरुणाचे नाव आहे. दरीत कोसळल्यामुळे तरुणाचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. बदलापूरच्या नेचर एक्सप्लोरर रेस्क्यू टीमने रेस्क्यू ऑपरेशन राबवत विराजला वाचवले. विराजला बेस कॅम्पला आणताच डॉक्टर क्षितिजा आणि श्रद्धा यांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार केले आणि त्याला पुढच्या उपचारांसाठी मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केलं. (The youth who fell from Chanderi fort was rescued after 22 hours)

मुलुंडहून 7 जण ट्रेकिंगसाठी चंदेरी गडावर गेले होते

बदलापूरजवळच्या चंदेरी गडावर बुधवारी मुंबईतील मुलुंडहून 7 जण ट्रेकिंगसाठी आले होते. यापैकी विराज म्हस्के हा 22 वर्षीय तरुण गुहेजवळून पाय घसरून दरीत कोसळला. त्याला वाचवण्यासाठी बदलापूरची नेचर एक्सप्लोरर रेस्क्यू टीम योगेश साखरे यांच्या नेतृत्त्वाखाली गडावर पोहोचली. मात्र विराज हा दरीत कोसळल्याने आणि त्याचा पाय फ्रॅक्चर झाला होता. त्यामुळं त्याला तिथून बाहेर काढणं आव्हानात्मक काम होतं. त्यामुळं त्याला बेस कॅम्पच्या चिंचवली गावात आणण्यासाठी तब्बल 22 तास रेस्क्यू ऑपरेशन करावं लागलं. यानंतर चिंचवली गावातून त्याला 108 रुग्णवाहिकेनं उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात आणि तिथून खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं.

पोलिस आणि प्रशासनाने समन्वय राखत तरुणाला सुखरुप वाचवले

या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये चिंचवली गावातील ग्रामस्थ, पोलीस पाटील, बदलापूर ग्रामीण पोलीस आणि स्थानिक प्रशासन यांनीही समन्वय राखत काम केलं. त्यामुळं विराज म्हस्के याला सुखरूप चंदेरी गडावरून खाली आणण्यात यश आलं. सध्या चंदेरी गडावर जाणाऱ्या ट्रेकर्सची संख्या वाढली आहे. मात्र अनेकदा नवखे किंवा हौशी ट्रेकर्स यांच्यासोबत एखादा अपघात घडणे, वाट चुकणे असे प्रकार घडत असतात. त्यात चंदेरी गड हा अतिशय कठीण असल्यानं बेस कॅम्पच्या गावातून गाईड घेऊन मगच गडावर जावे, असे प्रशासनाने आवाहन केले आहे. (The youth who fell from Chanderi fort was rescued after 22 hours)