AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मंत्रालय मुंबईत हवं की अहमदाबादला; उद्धव ठाकरे यांचा रोखठोक सवाल

ठाण्यातील गडकरी रंगायतन सभागृहात उद्धव ठाकरे यांनी आपल्यात भाषणामधून महायुती सरकावर निशाणा साधला. यावेळी उद्धव ठाकरेंनी मंत्रालय मुंबईत हवं की अहमदाबादला असा रोखठोक सवाल केला.

मंत्रालय मुंबईत हवं की अहमदाबादला; उद्धव ठाकरे यांचा रोखठोक सवाल
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Aug 10, 2024 | 10:14 PM
Share

तुम्हाला राज्याचं मंत्रालय मुंबईत हवं की अहमदाबादमध्ये. राज्याचा कारभार मुंबईतून चालला पाहिजे की दिल्ली का अहमदाबाद मधून? लोकसभेची निवडणूक होती. देशाच्या लोकशाहीचा गळा घोटणारी होती. त्यांचं शेपटावर निभावलं. आपण अटोक्यात आणलं. ते मनमानी करू शकत नाही. आता हे लोक गाडले पाहिजे. आता आपली महाराष्ट्र द्वेष्ट्यांविरोधात होणार आहे. महाराष्ट्राला भिकेला लावू पाहत आहेत, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला.

आता क्लस्टर योजना आणत आहे. चांगली गोष्ट आहे. घर दिली पाहिजे. पण कंत्राटदारांना ठरवून टेंडर दिले जात आहेत. ठरावीक लोकच टेंडर भरली जात आहे. ठरलेल्या कंत्राटदारांनाच काम दिले जाते. ही ठाणे पालिकेची परिस्थिती आहे. ठाणे महापालिकेला कर्जाचे डोहाळे लागले आहेत. कुठे गेले पैसे? कुणी केले कर्जबाजारी? सर्वत्र खड्डे पाडले आहेत. तीन महिने थांबा. तुमचा मित्र परिवार उघडा पाडल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला वाटतं तुम्ही घोटाळा केला आमचं लक्ष नाही. आमचं लक्ष राहणार आहे. महापालिकेत जे अधिकारी आहेत. त्यांना जनतेचं प्रेम आहे. ते माहिती देत असतात. जरा निवडणूक होऊन जाऊ द्या, बघा काय करतो, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

सर्वांच्या यात्रा सुरू आहेत. काल दिल्लीत गेलो. तिथं लोकं भेटली. सर्व जातीपातीचे लोक भेटतात. मुस्लिम, बौद्ध, पारसी ख्रिश्चन आले. सर्व म्हणतात कोरोना काळात तुम्ही जे काम केलं ते विसरू शकत नाही. मी एकट्याने केलं नाही. तुम्ही सर्व होते त्यामुळे महाराष्ट्र वाचला. आपण गंगेत प्रेतं वाहू दिली नाही. त्यांना वाचवलं. ही कामं लोकांना सांगा. निवडणुकीत कुणी वेडवाकडं बोललं की आपण त्यांना उत्तर देत असतो आणि कामं सांगायला जातो,  असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

आम्हाला भीक नको. आम्हाला कष्टाचा पैसा पाहिजे असं शेतकरी म्हणतोय. आमचा हक्क मारून टाकला जात आहे. कोपराला गूळ लावला जात आहे. गुजरातला प्रकल्प जात होते. तेव्हा मिंधे म्हणाले, काळजी करू नका मोदी मोठा प्रकल्प देणार आहे. कुठे आहे प्रकल्प? दिला? असा सवालही उद्धव ठाकरेंनी केला.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना