Ulhasnagar Crime : उल्हासनगरात गावगुंडांची लष्करी जवानाला मारहाण, कोयता आणि कटरने जवानावर केला हल्ला

सागर मोरे हे जवान मूळचे उल्हासनगरचे असून ते भारतीय सैन्यात कार्यरत आहेत. सध्या ते 15 दिवसांची सुट्टी घेऊन घरी आले आहेत. रविवारी रात्री साडेबाराच्या सुमारास ते घरी परतत होते. यावेळी त्यांच्याच परिसरात राहणाऱ्या तीन ते चार गावगुंडांनी त्यांच्यावर कोयता आणि कटरने हल्ला चढवला. गुंड एवढ्यावरच थांबले नाहीत, त्यांनी गाड्यांचीही तोडफोड केली.

Ulhasnagar Crime : उल्हासनगरात गावगुंडांची लष्करी जवानाला मारहाण, कोयता आणि कटरने जवानावर केला हल्ला
मालाडमध्ये दिराकडून वहिनीची हत्या
Image Credit source: TV9
निनाद करमरकर

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jun 28, 2022 | 1:49 AM

उल्हासनगर : उल्हासनगरात सुट्टीवर आलेल्या लष्करी जवाना (Soldier)ला गावगुंडांनी मारहाण (Beating) करत कोयता आणि कटरने हल्ला (Attack) चढवल्याची संतापजनक घटना घडली आहे. याप्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. सागर मोरे असे मारहाण करण्यात जवानाचे नाव आहे. चाळीत झालेल्या किरकोळ भांडणातून गुंडांनी मोरे यांच्यावर हल्ला केला. यावेळी मोरे यांचा मित्राने त्यांना वाचवले. गुंडांनी गाड्यांची तोडफोडही केली. दोघेही गुंड सराईत गुन्हेगार आहेत. उल्हासनगरात गावगुंडांची दहशत वाढत असून, गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी ठोस पाऊल उचलण्याची आवश्यकता आहे.

किरकोळ वादातून जवानाला मारहाण

सागर मोरे हे जवान मूळचे उल्हासनगरचे असून ते भारतीय सैन्यात कार्यरत आहेत. सध्या ते 15 दिवसांची सुट्टी घेऊन घरी आले आहेत. रविवारी रात्री साडेबाराच्या सुमारास ते घरी परतत होते. यावेळी त्यांच्याच परिसरात राहणाऱ्या तीन ते चार गावगुंडांनी त्यांच्यावर कोयता आणि कटरने हल्ला चढवला. गुंड एवढ्यावरच थांबले नाहीत, त्यांनी गाड्यांचीही तोडफोड केली. यावेळी सागर यांच्या मित्राने त्यांना वाचवलं. चाळीत झालेल्या किरकोळ भांडणातून या भागातील सराईत गुन्हेगार विकी वानखेडे आणि त्याच्या साथीदारांनी हा हल्ला केल्याची माहिती स्थानिकांनी दिली. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन आरोपींना बेड्या ठोकल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली आहे. (Village goons beat up a soldier for a minor reason in Ulhasnagar)

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें