अरे बापरे, हे काय? भर उन्हात दुचाकीवर बसून तरुण-तरुणीची अंघोळ, भन्नाट VIDEO व्हायरल

सोशल मीडियावर एका तरुणाचे भन्नाट व्हिडीओ व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये तरुणाने गरमीपासून दिलासा मिळावा यासाठी भन्नाट कल्पना शोधून काढल्या आहेत. त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

अरे बापरे, हे काय? भर उन्हात दुचाकीवर बसून तरुण-तरुणीची अंघोळ, भन्नाट VIDEO व्हायरल
चालत्या गाडीवर अंघोळ करणाऱ्या रील्स स्टारचा माफीनामा
Follow us
| Updated on: May 16, 2023 | 6:53 PM

उल्हासनगर (ठाणे) : सोशल मीडियावर कोणताही व्हिडीओ लाखो लोकांपर्यंत पोहोचतो. खरंतर सोशल मीडियामुळे आपल्या देशात असलेल्या क्रिएटीव्ह लोकांविषयी माहिती जगाला मिळाली. अनेक कलाकार, होतकरु, मेहनती तरुण या निमित्ताने पुढे आले. विशेष म्हणजे अनेक जण अतिशय भन्नाट असे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअरही करत असतात. त्यामुळे ते प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. सोशल मीडियावर सध्या अशाच प्रकारचा एक भन्नाट व्हिडीओ प्रचंड व्हायरल होताना दिसतोय. हा व्हिडीओ गरमीवर आधारीत आहे. गरमीमुळे सर्वसामान्य माणूस हैराण झालाय. त्यामुळे यापासून सुटका मिळवण्यासाठी व्हिडीओतला तरुण काय-काय पर्याय अवलंबतो हे या व्हिडीओत विनोदी माध्यमातून दाखवण्यात आलं आहे.

मुंबईला लागून असलेल्या उल्हासनगर, अंबरनाथ शहरांमध्ये सध्या उन्हाचा मोठा तडाखा पाहायला मिळतोय. तापमान चाळीशीच्या घरात गेलेलं असताना या गर्मीवर उपाय म्हणून एका तरुणानं केवळ गंमत म्हणून तयार केलेले काही व्हिडीओ तुफान व्हायरल होतायत. आदर्श शुक्ला या इन्स्टाग्राम प्रोफाईलवरून हे व्हिडीओ अपलोड करण्यात आले आहेत.

हे सुद्धा वाचा

पहिल्या व्हिडीओत नेमकं काय?

या व्हिडिओत एक तरुण आणि तरुणी उल्हासनगरच्या रस्त्यावर पाण्याने भरलेली बादली आणि मग्गा घेऊन स्कुटरवर फिरताना दिसतायत. यात मागे बसलेली तरुणी चक्क चालत्या गाडीवर तरुणाच्या आणि स्वतःच्या अंगावर पाणी ओतून घेत गर्मीपासून दिलासा मिळवण्याचा प्रयत्न करताना दिसतायत.

दुसऱ्या व्हिडीओत नेमकं काय?

दुसऱ्या एका व्हिडिओत हाच तरुण गाडीच्या सीटवर बर्फाची लादी ठेवून त्यावर बसून गाडी चालवताना दिसतोय. उन्हाळ्याच्या दिवसात गाडीची सीट प्रचंड तापलेली असते. त्यामुळं अनेकदा दुचाकीचालकांना चटके सोसावे लागतात. त्यावर उपाय म्हणून हा तरुण सीटवर बर्फाची लादी ठेवून त्यावर बसताना दिसतोय.

तिसऱ्या व्हिडीओत नेमकं काय?

तिसऱ्या एका व्हिडिओत हाच तरुण गाडी धुवायला गेल्यावर गाडीसोबतच स्वतःवर देखील पाणी मारून घेतोय आणि गर्मीपासून वाचण्याचा प्रयत्न करतोय, असं दाखवण्यात आलंय. हे व्हिडीओ सध्या इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सऍपवर तुफान व्हायरल झाले आहेत. सध्याच्या परिस्थितीला ते अगदी जुळत असल्यानं लोकही या तरुणाच्या कल्पकतेचं कौतुक करत आहेत.

संबंधित व्हिडीओ हे सोशल मीडियावर तुफान व्हायरलही होत आहेत. अनेकजण या व्हिडीओवर भन्नाट प्रतिक्रिया देखील देत आहेत. तरुणाने गरमीवर अतिशय रामबाण उपाय शोधून काढल्याची भावना अनेकांकडून व्हिडीओ पाहिल्यानंतर व्यक्त केल्या जात आहे. अनेकांकडून व्हिडीओ आपल्या मित्रांसोबत शेअर केले जात आहेत. त्यामुळे संबंधित व्हिडीओ चांगलेच व्हायरलही होत आहेत.

धनंजय मुंडे यांचं सुरेश धस अन् मनोज जरांगे पाटलांना खुलं आव्हान
धनंजय मुंडे यांचं सुरेश धस अन् मनोज जरांगे पाटलांना खुलं आव्हान.
पालकमंत्रीपदावरून शिवसेना नाराज? एकनाथ शिंदे पुन्हा दरे गावी?
पालकमंत्रीपदावरून शिवसेना नाराज? एकनाथ शिंदे पुन्हा दरे गावी?.
G-Pay नं पेमेंट अन् सुगावा, मध्यरात्री सैफच्या आरोपीला ठोकल्या बेड्या
G-Pay नं पेमेंट अन् सुगावा, मध्यरात्री सैफच्या आरोपीला ठोकल्या बेड्या.
पहाटेचा शपथविधी एक षडयंत्र, धनंजय मुंडे यांचा नेमका कोणाकडे इशारा?
पहाटेचा शपथविधी एक षडयंत्र, धनंजय मुंडे यांचा नेमका कोणाकडे इशारा?.
प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात अग्नितांडव, आगीत 100 हून तंबू जळून खाक
प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात अग्नितांडव, आगीत 100 हून तंबू जळून खाक.
'मीच दादांना पालकमंत्रीपद घेण्याची विनंती केली, कारण..' - धनंजयय मुंडे
'मीच दादांना पालकमंत्रीपद घेण्याची विनंती केली, कारण..' - धनंजयय मुंडे.
'मी दादांना सांगितलं होतं की..',पहाटेच्या शपथविधीवरून मुंडेंचं वक्तव्य
'मी दादांना सांगितलं होतं की..',पहाटेच्या शपथविधीवरून मुंडेंचं वक्तव्य.
धनंजय मुंडेंना सरपंच हत्या प्रकरण भोवलं? बीड पालकमंत्रीपदाचा पत्ता कट
धनंजय मुंडेंना सरपंच हत्या प्रकरण भोवलं? बीड पालकमंत्रीपदाचा पत्ता कट.
'हीच आमची इच्छा होती..', बीडच्या पालकमंत्रीपदावर काय म्हणाले सुरेश धस?
'हीच आमची इच्छा होती..', बीडच्या पालकमंत्रीपदावर काय म्हणाले सुरेश धस?.
सैफच्या हल्लेखोराला बेड्या; बघा आरोपीच्या अटकेचा थरार, कसा घेतला शोध?
सैफच्या हल्लेखोराला बेड्या; बघा आरोपीच्या अटकेचा थरार, कसा घेतला शोध?.