पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के, घरांना तडे

पालघर : पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या तीन महिन्यांपासून वारंवार भूकंपाचे धक्के बसत आहे. नोव्हेंबर महिन्यापासून आजपर्यंत जवळजवळ 2.5 रिश्टर स्केल ते 3.0 रिश्टर स्केलपर्यंत 10 भूकंपाचे धक्के बसल्याची नोंद झाली आहे. तर वारंवार असंख्य सौम्य धक्क्याने गावं रोजच हादरत आहे. रविवारी 20 जानेवारीला असाच पुन्हा भूकंपाचा धक्का ग्रामस्थांनी अनुभवला आहे. या भूकंपाची तीव्रता 3.6 रिश्टर स्केल …

पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के, घरांना तडे

पालघर : पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या तीन महिन्यांपासून वारंवार भूकंपाचे धक्के बसत आहे. नोव्हेंबर महिन्यापासून आजपर्यंत जवळजवळ 2.5 रिश्टर स्केल ते 3.0 रिश्टर स्केलपर्यंत 10 भूकंपाचे धक्के बसल्याची नोंद झाली आहे. तर वारंवार असंख्य सौम्य धक्क्याने गावं रोजच हादरत आहे. रविवारी 20 जानेवारीला असाच पुन्हा भूकंपाचा धक्का ग्रामस्थांनी अनुभवला आहे. या भूकंपाची तीव्रता 3.6 रिश्टर स्केल असल्याने पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी, तालुक्यासह गुजरात राज्यातील उंबरगाव, संजाण, केंद्रशासित प्रदेशातील सिल्वासापर्यंत धक्के जाणवल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे.

11 नोव्हेंबर 3.2 रिश्टर स्केल, 24 नोव्हेंबर 3.3 रिश्टर स्केल, 1 डिसेंबर 3.1 आणि 2.9 रिश्टर स्केलचे लागोपाठ दोन धक्के, 4 डिसेंबर 3.2 रिश्टर स्केल, 7 डिसेंबर 2.9 रिश्टर स्केल, 10 डिसेंबर 2.8 आणि 2.7 लागोपाठ दोन भूकंपाचे धक्के बसले आहेत. त्यानंतर 29 डिसेंबर 2018 रोजी, 20 जानेवारी 2019 रोजी 6.39 मिनिटांनी 3.6 रिश्टर  स्केल भूकंपाचा जोरदार धक्का बसताच नागरिक पुन्हा दहशतीच्या छाये खाली आले आहेत. 3.6 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का बसण्याला काही तास उलटत नाही तोच 8.59 मिनिटांनी पुन्हा 3 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का जाणवल्यानंतर भूकंपाचा केंद्र बिंदू असलेल्या धुंदलवाडी गावातील एकच खळबळ उडाली होती.

वारंवार बसणाऱ्या भूकंपाने अनेकांच्या घरांना मोठं मोठे तडे जाऊन भिंतींना चिऱ्या पडल्या, तर काही घरातील भिंतीच्या सिमेंट बांधकामाचे प्लास्टर मटेरियल खाली पडले आणि घराच्या पत्र्यांनाही चिरा पडल्या, विशेष म्हणजे येथील बांधकाम सौम्य अथवा अधिक रिश्टर स्केल भूकंपाचा धक्काही पचवू शकणारी नसल्याने अनेक घरांच्या भिंती तकलादू, कमकुवत झाल्या आहेत, कधी रात्री अपरात्री भूकंपाचा धक्का 4 रिश्टर स्केलपर्यंत भूकंपाचा धक्का आला, तर ह्या भिंती पत्त्याचा घरा प्रमाणे कोसळतील अशी भीती परिसरातील ग्रामस्थांमध्ये आहे. त्यामुळे अनेक कुटुंब घराच्याबाहेर रात्र काढत आहेत, रात्री भुगर्भातून जोरात आवाज होतो आणि होणाऱ्या धरणीकंपाने ग्रामस्थांना घराच्या ओसरीवर किंवा वाडीत रात्र कुडकुडत झोपावं लागत आहे.

परिसरातील आश्रम शाळेत तर भूकंपाच्या भीतीने विद्यार्थी संख्या घटली. परंतु तरीही काही विद्यार्थी अद्यापही शिक्षणातून भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आश्रम शाळेत राहून शिक्षण घेत आहेत, मात्र रात्रंदिवस होणाऱ्या भूकंपाच्या धक्क्याने वसतिगृहाबाहेर मंडप टाकून उभारलेल्या निवारा शेडमध्ये ऐन थंडीच्या मौसमात कुडकुडत रात्र घालवून निवारा शेड खालीच शिक्षणाचे धडे गिरवावे लागत आहे. विद्यार्थ्यांप्रमाणेच गावातील ग्रामस्थांनी घराच्याबाहेर झोपडी उभारून जीवाच्या आकांताने निवारा उभारला आहे, तर काही मोकळ्या, मिळेल त्याजागी अंथरूण टाकून रात्रीचा जीवघेणा निवारा शोधत आहेत. दिवसा घराबाहेर आणि रात्रीही घराबाहेर अशी अवस्था असलेल्या भूकंप प्रवण क्षेत्रात नागरिकापासून अबाल वृद्धांसह महिला लहान मुलांना घेऊन घराबाहेर झोपत आहेत, तर घरातील तरुण,पुरुष मंडळी घराबाहेर जेवणाचा आस्वाद घेत जागता पहारा देत रस्त्यावर रात्र घालवत आहेत.

प्रशासनाकडून भूकंप मापन यंत्र बसवण्यापलीकडे कुठलेही पाऊल उचलले गेले नसल्याने भूकंपाच्या रिश्टर स्केलमध्ये किंचित वाढ झाल्यानंतर तीन महिन्यापासून भूकंपाचे धक्के सोसत दहशतीच्या छाये खाली असलेल्या नागरिकांना साधा निवारा शेडही प्रशासनाकडून करून देण्यात आली नाही. यामुळे ग्रामस्थ संताप व्यक्त करत आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *