AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पालिकेचा अजब कारभार! …पैसे न भरल्यास मिळकत जप्त करण्याची नोटिस, माजी नगरसेवकच गोंधळात

कुठल्याही सर्वसामान्य नागरिकासोबत नाही तर चक्क लोकप्रतिनिधीसोबतच अशी घटना घडल्याने नाशिकमध्ये हा चर्चेचा विषय ठरतोय.

पालिकेचा अजब कारभार! ...पैसे न भरल्यास मिळकत जप्त करण्याची नोटिस, माजी नगरसेवकच गोंधळात
Image Credit source: Google
| Updated on: Jan 03, 2023 | 2:55 PM
Share

नाशिक : सर्वसामान्य व्यक्तीला पालिकेच्या अजब कारभाराचा फटका बसलेलं आपण सर्वांनी अनेकदा पाहिलं आहे. पण थेट माजी नगरसेवकालाच पालिकेचा अजब कारभारचा अनुभव आल्याने नाशिकमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. कुठलीही मालमत्ता नसतांना लाखों रुपयांचे बिलाची नोटिस पालिकेकडून माजी नगरसेवकाला बजावण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा होऊ लागली आहे. पालिकेच्या या अजब कारभाराची संपूर्ण पालिका वर्तुळातही आज दिवसभर चर्चा होत आहे. नाशिकमधील उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक भागवत आरोटे यांना बजावलेली एक नोटीस सध्या वादग्रस्त ठरते आहे. नाशिक महापालिकेकडून सध्या करवसुलीची मोहीम हाती घेण्यात आली असून थकबाकीदारांना नोटीस बजावली जातीय. त्याच दरम्यान भागवत आरोटे यांना जबावण्यात आलेली नोटिस नाशिकमध्ये पालिकेचा कारभार कसा सुरू आहे हे सांगण्यासाठी पुरेशी आहे.

नाशिक शहरातील अंबड गाव चुंचाळे परिसरात माजी नगरसेवक भागवत आरोटे यांचा बंगला आहे. त्यांच्या या बंगल्यावर कुठल्याही प्रकारचे मोबाईल टॉवर नाही. मात्र असं असतांना देखिल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाने त्यांना तब्बल 13 लाख 25 हजार 808 रुपये रकमेची नोटिस बजावली आहे.

विशेष म्हणजे पैसे न भरल्यास थेट मिळकत जप्त करण्याचा यामध्ये इशारा देण्यात आला आहे त्यामुळे पालिकेच्या नोटिसीचे हसू होत आहे.

दरम्यान या संपूर्ण प्रकारामुळे माजी नगरसेवक भागवत आरोटे यांच्यासह त्यांच्या कुटुंबाला चांगलाच धक्का बसलाय आहे.

संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे आरोटे यांनी विचारणा केली असता त्यांना याबाबत कुठलीही माहिती नसून आरोटे यांना समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. माजी नगरसेववक आरोटे यांनी याबाबत थेट पालिकेचे आयुक्त डॉ. चंद्रकांत पूलकुंडवार यांच्याकडे या प्रकरणाची चौकशी करून कारवाईची मागणी करणार आहे.

कुठल्याही सर्वसामान्य नागरिकासोबत नाही तर चक्क लोकप्रतिनिधीसोबतच अशी घटना घडल्याने नाशिकमध्ये हा चर्चेचा विषय ठरतोय.

विशेष म्हणजे ज्या विभागातून ही नोटिस काढण्यात आली आहे, त्या विभागातील अधिकारी यावर कुठलीही माहिती देत नाहीये, त्यामुळे हा प्रकार नेमका काय आहे हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....