चौथी मुंबई वाढवणजवळ वसवू,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मुंबईचा कायापालट केला जाणार आहे, सध्या मुंबई आणि एमएमआरमध्ये विविध प्रकल्पाचे काम वेगाने सुरु आहेत. मुंबईच्या वाढवण बंदराजवळ एक विमानतळ उभारला जाणार आहे. चौथी मुंबई वाढवण येथे उभारली जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

चौथी मुंबई वाढवणजवळ वसवू,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
devendra fadnavis
| Updated on: Mar 05, 2025 | 4:54 PM

मुंबईच्या विकास करण्यासाठी मुंबई आणि एमएमआर रिजनमध्ये मोठे महत्वाचे प्रकल्पांना सुरुवात झाली आहे. मुंबई आणि एमएमआर रिजनमध्ये दोन तीन प्रोजेक्ट महत्त्वाचे आहेत.सवांद्रे ते वर्सोवा सी लिंक सुरू आहे. नंतर वर्सोवा ते मढ आणि वर्सोवा पासून भाईंदरपर्यंत एक सिलिंक जाणार आहे. आणि मढचा सिलिंक विरारपर्यंत जाईल. मुंबईतील ६० टक्के ट्रॅफिक ही वेस्टर्नला आहे. हे सिलिंक एकदा सुरू झाले तर वेस्टर्न एक्सप्रेसची ट्रॅफिक डायव्हर्ट होईल.आता विरारला जायचं असेल तीन ते चार तास लागतात हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हे अंतर अवघे २५ मिनिटांवर येईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्या मनी नाईन फायनान्शियल फ्रिडम समिटमध्ये बोलताना सांगितले.

ते पुढे म्हणाले की एक मल्टिमॉडल कोरिडोअर पण तयार करत आहोत. विरार ते अलिबाग पर्यंतचा, त्यामुळे एक लूप तयार करत आहे. मुंबईला एक प्रकाराचा सर्क्युलर रोड मिळणार आहे. त्यासोबत एक महत्त्वाचा प्रकल्प आहे तो म्हणजे वाढवण बंदर. नवीन पोर्ट तयार करत आहोत. मॅरिटाईम ताकद निर्माण होणार आहे. जीएनपीटी पोर्ट हे आपल्या देशातील ६५ टक्के कंटेनर ट्रॅफिक हँडल करते. वाढवण बंदर हे जेएनपीटी पेक्षा तीनपट मोठी आहे. आता जगातील सर्वात मोठी व्हेसल वाढवण बंदरला येईल. त्यासोबतच आम्ही त्या पोर्टसोबत एक एअरपोर्ट तयार करणार आहोत. तिथेच बुलेट ट्रेन आहे. तिसरी मुंबई अटल सेतूजवळ होईल. पण चौथी मुंबई ही वाढवण बंदराजवळ होणार आहे असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

उत्तर महाराष्ट्र दुष्काळमुक्त करु

आम्ही राज्यात अनोखा शक्तीपीठ महामार्ग बनवत आहोत. राज्याचा चेहरा बदलण्यासाठी नदीजोड प्रकल्प करत आहोत. विदर्भातील सात जिल्ह्यांना दुष्काळ मुक्त केलं जाणार आहे. समुद्रात जाणारं ५४ टीएमसी पाणी रिव्हर लिंकद्वारे गोदावरीत आणणार आहोत. त्यामुळे मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र दुष्काळमुक्त होणार आहे असेही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. टीव्ही ९ मराठीचे व्यवस्थापकीय संपादक उमेश कुमावत आणि TV9 भारतवर्ष डिप्टी एग्जिक्यूटिव प्रोड्यूसर गौरव अग्रवाल यांनी मुंबईतील ताजमध्ये झालेल्या तिसऱ्या मनी नाईन फायनान्शियल फ्रिडम समिटमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलते केले.