AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! रक्षाबंधनापूर्वीच लाडक्या बहिणींना धक्का? सरकारचा मोठा निर्णय

ज्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे, आता या योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

मोठी बातमी! रक्षाबंधनापूर्वीच लाडक्या बहिणींना धक्का? सरकारचा मोठा निर्णय
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 06, 2025 | 3:56 PM
Share

ज्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांच्या आत आहे, अशा कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत मिळावी, या उद्देशानं सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. ही एक सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला दीज हजार रुपये जमा करण्यात येतात. मात्र आता सरकार या योजनेबाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे, त्यामुळे रक्षाबंधनापूर्वीच लाडक्या बहिणींना मोठा धक्का बसू शकतो.

लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू करण्यात आली होती, तेव्हा या योजनेसंदर्भात काही निकष तयार करण्यात आले होते. ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे, त्याच कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आला होता, तसेच ज्या महिलांचं वय 65 वर्षांपेक्षा जास्त आहे, अशा महिलांना या योजनेतून वगळण्यात आलं होतं.  मात्र या निकषात न बरणाऱ्या देखील काही महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं आहे, ज्या महिलांचं वय हे 65 वर्षांपेक्षा जास्त आहे, अशा महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं आहे, तसेच ज्या महिलांकडे सरकारी नोकरी आहेत, त्यातील काही महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतला आहे. एवढंच काय तर चक्क 14 हजार पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतला आहे, ही योजना फक्त महिलांसाठी असून देखील चुकीच्या पद्धतीनं या योजनेचा लाभ घेतला गेल्याचं समोर आलं आहे.

आता या संदर्भात मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेत ज्यांनी फसवणूक केली त्यांच्यावर सरकार कारवाई करण्याच्या तयारीमध्ये आहे. लाडकी बहीण योजने अंतर्गत अनधिकृत लाभ घेतलेल्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार 15 दिवसांच्या आत जिल्हाधिकाऱ्यांकडून खात्यांची माहिती मागवण्यात आली आहे, या मध्ये ज्या महिला दोषी आढळतील, त्यांच्याकडून संपूर्ण रक्कम वसूल केली जाण्याची शक्यता आहे, तसेच संबंधितांवर गुन्हे देखील दाखल केले जाऊ शकतात, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

Follow Us
माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपके
Exclusive | माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपकेने सांगितलं जंतर-मंतरवर पहिल्या दिवशी काय घडलं?
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; देवस्थानात...
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; पाणी देवस्थानात शिरल्यानंतरही भक्तिभावाने महाआरती
भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात, नवी माहिती...
Ashok Kharat | भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात...नेमकी नवी माहिती काय?
धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले, तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने...
Rain Update | धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले तरी... तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने विसर्ग सुरु
मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन...; साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
Ameet Satam on Raj Thackeray | मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन म्हणत...; अमित साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
Raj Thackeray | NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच...
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच... भाजपच्या बड्या नेत्याने सांगितली खदखद
सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
Sada Sarvankar On Raj Thackeray | 18 कोटींच्या चोरीचा दावा चुकीचा?; सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
Abhijeet Dipake | अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही...
Sonam Wangchuk | आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही; सरकारला सोनम वांगचुक यांचा थेट इशारा