AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्याची भीती तोच इशारा, प्रशासनाकडून मोठा इशारा, 10 जिल्ह्यांवर संकट, पुढील 7 तासात..

राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून सतत बदल होताना दिसत आहे. कुठे उष्णता तर कुठे पाऊस अशी स्थिती आहे. त्यामध्येच हवामान विभागाने नुकताच अत्यंत मोठा इशारा दिला. आज राज्यावर दुहेरी संकट आहे.

ज्याची भीती तोच इशारा, प्रशासनाकडून मोठा इशारा, 10 जिल्ह्यांवर संकट, पुढील 7 तासात..
Weather
| Updated on: May 17, 2026 | 7:15 AM
Share

राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून मोठा बदल होताना दिसतोय. कुठे पाऊस तर कुठे उष्णता अशी स्थिती आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. मराठवाडा, विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. यासोबतच मराठवाड्यातील दक्षिणेकडील भागात वादळी वाऱ्यासह पाऊस येण्याची शक्यता आहे. पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला. देशातील अनेक राज्यात आज अवकाळी पावसाचा मोठा इशारा देण्यात आला. अमरावती येथे देशातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. अमरावती येथे 45.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. अकोला, वर्धा, नागपूर येथीलही 45 अंश सेल्सिअसच्या पुढे तापमानाची नोंद झाली. आज वर्धा, नागपूर, अकोला, अमरावती या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा मोठा इशारा देण्यात आला. धाराशिव, लातूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, रत्नागिरी येथे पावसाचा इशारा देत येलो अलर्ट जारी करण्यात आला.

दुपारच्यावेळी उष्णता अधिक तीव्र होणार आहे. यादरम्यानच नागरिकांनी दुपारी 12 ते 4 घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले. गेल्या आठवडाभरापासून उष्णतेच्या झळा सहन करणाऱ्या अकोलेकरांना गेल्या दोन दिवसांपासून काहीसा दिलासा मिळाला. अकोल्याचे तापमान मागील चार दिवसांपूर्वी 45.9 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून तापमानात किंचित घट झाली.

अकोल्याचे कमाल तापमान 45.4 अंश सेल्सियस इतके नोंदवण्यात आले आहे. तर उष्णतेची तीव्रता अद्याप कायम असली तरी तापमानात झालेल्या या किरकोळ घटीमुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, हवामान विभागाने 12 मे ते 18 मे दरम्यान तापमान 45 अंशांच्या वर राहण्याचा अंदाज वर्तवला होता.

धुळे जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट पसरलेली असून साधारणात 31 मे पर्यंत तीव्र उन्हाळा कायम रहाणार आहे. सध्या धुळे जिल्ह्याते तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत कायम राहणार असल्याने पांझरा नदी पात्र कोरडे पडले आहे. त्यामुळे पांझरा काठावरील गावांच्या पाणी योजना कोरड्या पडू लागल्या आहेत. जळगाव जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या गिरणा धरणातील पाणीसाठा आता झपाट्याने कमी होत आहे.

सध्या गिरणा धरणामध्ये केवळ 32 टक्के जलसाठा शिल्लक राहिला असून, वाढत्या उन्हामुळे पाण्याचे बाष्पीभवनही वेगाने होत आहे. विशेष म्हणजे जळगाव जिल्ह्यातील अर्ध्याहून अधिक भागाचा पाणीपुरवठा आणि शेती व्यवस्था ही गिरणा धरणावरच अवलंबून आहे. त्यामुळे आगामी काळात पावसाला उशीर झाल्यास पाणीटंचाईची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाकडून पाण्याचे काटकसरीने नियोजन करण्यावर भर दिला जात असून, नागरिकांनीही पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Follow Us
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा
तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; MPSC विद्यार्थ्यांचं
MPSC Protest Pune : तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; तिरडी यात्रेतून MPSC विद्यार्थ्यांचं पुण्यात सरकारविरोधात जोरदार आंदोलन
इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video : इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; शिरूरच्या कार्यक्रमातील VIDEO सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं काय घडलं?
महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार
Mahayuti : महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; पुणे शिक्षक मतदारसंघात चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार?
महाराष्ट्रात १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात
Drought : महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट गडद; १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात; सरकारचा मोठा निर्णय काय?