AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रात्र वैऱ्याची, आकाशात भीतीदायक काळोखा, ताशी 70 किमी वेगाने येतंय संकट, थेट..

देशासह राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून सतत बदल होताना दिसत आहे. त्यामध्येच आता संपूर्ण देशावर मोठं संकट आहे. चक्रीवादळाचा मोठा इशारा देण्यात आला. ज्याने एकच खळबळ उडाली. भारतीय हवामान विभागाकडून अलर्ट जारी करण्यात आला.

रात्र वैऱ्याची, आकाशात भीतीदायक काळोखा, ताशी 70 किमी वेगाने येतंय संकट, थेट..
Cyclone rain
| Updated on: May 16, 2026 | 1:25 PM
Share

भारतावर मोठं संकट गोंगावत आहे. मोठे आवाहन उभे आहे. नैऋत्य मोसमी पावसाचे लवकर आगमन होत असतानाच चक्रीवादळ धडकणार आहे. अत्यंत मोठा इशारा देण्यात आला. 26 मे रोजी केरळमध्ये नैऋत्य मान्सून दाखल होण्याचा अंदाज आहे. आयएमडीनुसार, पुढील 24 तासांत मान्सूनला दक्षिण बंगालच्या उपसागराच्या काही भागांमध्ये अंदमान आणि निकोबार बेटांमध्ये पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल होत आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील आठवड्यात जवळपास राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि चक्रीवादळ येऊ शकते. यादरम्यान तब्बल ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेशमध्ये मोठे थैमान पावसाचा घातले. जवळपास 100 लोकांचा जीव या चक्रीवादळात गेला. निसर्गाचा मोठा हाहाकार बघायला मिळाला. त्यामध्येच आता पुन्हा एकदा भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिला.

तीन ते चार दिवसात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. केरळ, पुदुचेरी, तामिळनाडू, कर्नाटक या भागात अलर्ट जारी करण्यात आला. यासोबतच उत्तर प्रदेश, झारखंड, बिहार, आणि पश्चिम बंगालमध्येही पाऊस होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रातही पाऊस होण्याचा अंदाज आहे. यादरम्यान मोठ्या प्रमाणात वादळ सुटेल.

वायव्य भारतात जम्मू आणि काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश येथे मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. राजस्थान, पंजाब आण हरियाणाच्या काही भागांमध्ये ताशी 50 ते 70 किलोमीटर वेगाच्या वाऱ्यासह धुळीची वादळे येण्याची शक्यता आहे. सध्याची हवामानाची परिस्थिती बघता पुढील काही तास देशाकरिता अत्यंत भयंकर असणार आहेत. अनेक भागात हे वादळ रात्री धडकण्याची शक्यता आहे.

पश्चिम राजस्थानसाठी धुळीच्या वादळाचा इशारा देण्यात आला आहे. ईशान्य भारतात, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराममध्ये पुढील काही दिवस मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. दक्षिण आसाममध्ये अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील काही दिवस पाऊस राहण्याचा अंदाज आहे. देशावर निसर्गाचे मोठे संकट उभे आहे. उत्तर प्रदेशमध्ये मोठा हाहाकार पावसाने आणि चक्रीवादळाने माजवला.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात