महादेव मुंडे हत्या प्रकरणात आता पोलिसांचा मोठा निर्णय, बीडमध्ये घडामोडींना वेग

महादेव मुंडे हत्या प्रकरणात मोठी बातमी समोर येत आहे, महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.  तपासासाठी पथकं रवाना झाल्याची माहिती. समोर येत आहे.

महादेव मुंडे हत्या प्रकरणात आता पोलिसांचा मोठा निर्णय, बीडमध्ये घडामोडींना वेग
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 16, 2025 | 7:22 PM

महादेव मुंडे हत्या प्रकरणात मोठी बातमी समोर येत आहे, महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.  तपासासाठी पथकं रवाना झाल्याची माहिती. समोर येत आहे.  मुंडे कुटुंबाने सकाळी आत्मदहनाचा प्रयत्न केला होता,  तर ज्ञानेश्वरी मुंडे यांनी औषध प्राशन केलं होतं, त्यांच्यावर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणात आता नव्यांदा तपासी अधिकारी बदलले असून या हत्या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख बंटेवाड यांनी दिली आहे.

आज सकाळीच मुंडे कुटुंबाने पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या समोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता. महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी औषध प्राशन केल्याने त्यांच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या सर्व घडामोडीनंतर पोलीस अधीक्षकांनी महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास आता स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे. यामुळे तपासाला गती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर तपास वर्ग होताच तपासाला सुरुवात झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या संदर्भातील तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकं परळीकडे रवाना झाले आहेत.

दरम्यान बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आज सकाळी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आपल्या पतीच्या हत्येतील आरोपींना अटक करावं या मागणीसाठी विष प्राशान केलं होतं, त्यांच्यावर सध्या बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महादेव मुंडे हत्या प्रकरणात यापुर्वी धक्कादायक खुलासे करणारे वाल्मीक कराडचे जुने सहकारी विजयसिंह बांगर यांनी जिल्हा रुग्णालयामध्ये जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी मीडियाशी बोलताना त्यांनी आज पुन्हा एकदा धक्कादायक खुलासा केला असून महादेव मुंडे हत्या प्रकरणात वाल्मिक कराडसह त्याच्या मुलाचा आणि गोट्या गितेचा हाथ असून गोट्या गिते हा सायको किलर आहे. त्याला तात्काळ पोलिसांनी ताब्यात घेतलं पाहिजे, असं विजयसिंह बांगर यांनी म्हटलं आहे.