AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Board SSC Results Date : विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपली, दहावीचा निकाल उद्या लागणार!

Maharashtra Board SSC exam Results 2022 date : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल 2022 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या दि. 17 जून 2022 रोजी दु. 1:00 वा.ऑनलाईन जाहीर होईल.

Maharashtra Board SSC Results Date  : विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपली, दहावीचा निकाल उद्या लागणार!
शाळकरी विद्यार्थी
| Edited By: | Updated on: Jun 16, 2022 | 2:34 PM
Share

मुंबई: दहावीच्या निकालाची प्रतीक्षा संपलीय. उद्या दुपारी 1 वाजता दहावीचा निकाल (SSC Results) लागणार आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra Board 10th Results) मार्च-एप्रिल 2022 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या दि. 17 जून,2022 रोजी दु. 1:00 वा.ऑनलाईन जाहीर होईल, अशा पद्धतीचं ट्विट क्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केलं आहे.

वर्षा गायकवाड यांचं ट्विट

आता पालक आणि विद्यार्थ्यांची दहावीच्या निकालाची प्रतीक्षा संपली आहे. दहावीच्या निकालावर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी बारावीचा निकाल दुसऱ्या आठवड्यात आणि दहावीचा जूनच्या शेवटच्या आठवड्यात लागेल असं सांगितलं होतं. निकाल पाहण्यासाठी स्वतःचा रोल नंबर आणि आईचं नाव अशी माहिती विद्यार्थ्यांकडे असावी. महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल पाहण्यासाठी तुम्हाला एक सोप्पी गोष्ट करायची आहे. बारावीप्रमाणे दहावीचा देखील निकाल तुम्हाला आमच्या TV9 मराठीच्या वेबसाईटवर पाहायला मिळणार आहे. तुम्हाला निकालाची घोषणा झाल्यावर TV9 मराठीच्या वेबसाईटवर करिअर सेक्शनमध्ये कुठेही ही लिंक सहज उपलब्ध होणार आहे किंवा तुम्ही इथे क्लिक करून सुद्धा तुमचा दहावीचा निकाल सहज मिळवू शकता.

रिझल्ट चेक करताना काय महत्त्वाच्या बाबी

संपूर्ण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी सीट नंबर वेगवेगळे आहेत हे लक्षात घ्या. सीट नंबर आणि आईचं नाव या दोन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी सीट नंबर काही कारणाने चुकला तर आईच्या नावाने रिझल्ट चेक करता येणार आहे आईचं नाव काही कारणानं चुकलं किंवा अजून काही गडबड झाली तरी सीट नंबरने सुद्धा रिझल्ट चेक करता येणार आहे महाराष्ट्र बोर्ड 10वी निकाल वेबसाईट

दहावीचा निकाल एक क्लिकवर पाहा

दहावीचा निकाल लागला रे लागला की तुम्ही लगेच TV9 मराठीच्या वेबसाईटला भेट द्या आमच्या करिअर विभागात महाराष्ट्र बोर्ड 10वी निकाल 2022 च्या कोणत्याही बातमीवर क्लिक करा आमच्या होम पेजवर यायचं,तिथे असणाऱ्या महाराष्ट्र बोर्ड 10वी निकालाच्या लिंकवर क्लिक करूनही तुम्ही थेट निकाल पाहू शकता आपला रोल नंबर आणि इतर माहिती भरा यानंतर सबमिटवर क्किक केल्यानंतर निकाल तुमच्या समोर असेल डाऊनलोड ऑप्शनवर क्लिक करा आणि निकाल डाऊनलोड करा. प्रिंट ऑप्शनवर क्लिक करा, निकालाची प्रिंट काढून घ्या आणि पुढील वापरासाठी जवळ ठेवा.

गेल्या वर्षीचा निकाल

परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना किमान 35 टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. गेल्यावर्षी दहावीचा म्हणजेच महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल 16 जुलै रोजी जाहीर झाला होता.2021 च्या दहावी परीक्षेत साधारण 15.74 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. परीक्षेत एकूण 99.95 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदाही परीक्षेचा निकाल चांगला लागेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?.
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?.
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा.
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?.
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?.