AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SSC 10th Result 2022 : उद्या दहावीचा रिझल्ट, निकाल कुठे पाहाल?; संपूर्ण माहिती एका क्लिकवर

SSC Result 2022 Maharashtra Board : या परीक्षेत विद्यार्थ्यांना ज्यादा वेळ देण्यात आला होता. 70 ते 100 गुणांच्या प्रश्नपत्रिकेसाठी 30 मिनिटे अधिकचा वेळ देण्यात आला होता. तर 40 ते 60 गुणांच्या प्रश्नपत्रिकेसाठी 15 मिनिटे अधिक देण्यात आली होती.

SSC 10th Result 2022 : उद्या दहावीचा रिझल्ट, निकाल कुठे पाहाल?; संपूर्ण माहिती एका क्लिकवर
CBSE Compartment 2 ResultsImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 17, 2022 | 11:35 AM
Share

मुंबई: इयत्ता बारावीचा निकाल लागल्यानंतर इयत्ता दहावीच्या  (SSC Results)  निकालाची प्रतिक्षाही अखेर संपली आहे. उद्या दुपारी 1 वाजता दहावीचा निकाल ऑनलाईन जाहीर होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना घर बसल्या आपल्या मोबाईलवर, संगणकावर किंवा लॅपटॉपवर निकाल पाहता येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल 2022 मध्ये (Maharashtra Board 10th Results) ही परीक्षा घेण्यात आली होती. इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 8 लाख 89 हजार 584 विद्यार्थी तर 7 लाख 49 हजार 487 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा फैसला उद्या होणार आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी ही माहिती दिली आहे. गायकवाड यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची निकालाची प्रतिक्षा अखेर संपली आहे.

कुठे पाहाल निकाल

tv9marathi.com

https://www.mahahsscboard.in/

www.mahresult.nic.in

www.sscresult.mkcl.org

www.maharashtraeducation.com

www.mahresult.nic.in

21 हजार परीक्षा केंद्रातून होती परीक्षा

कोरोना संकटानंतर प्रथमच दहावीच्या विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षा दिली. त्यासाठी 21 हजार 384 परीक्षा केंद्रे होती. यात 5 हजार 50 परीक्षा केंद्रे मुख्य होती. तर 16 हजार 344 ही उपकेंद्रे होती.

16 लाख विद्यार्थी

इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 16 लाख 38 हजार 172 मुलांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 8 लाख 89 हजार 584 विद्यार्थी तर 7 लाख 49 हजार 487 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.

विद्यार्थ्यांना ज्यादा वेळ दिला

दरम्यान, या परीक्षेत विद्यार्थ्यांना ज्यादा वेळ देण्यात आला होता. 70 ते 100 गुणांच्या प्रश्नपत्रिकेसाठी 30 मिनिटे अधिकचा वेळ देण्यात आला होता. तर 40 ते 60 गुणांच्या प्रश्नपत्रिकेसाठी 15 मिनिटे अधिक देण्यात आली होती. परीक्षा केंद्रात गैरप्रकार होऊ नये म्हणून चित्रीकरण करण्यात आले होते. या शिवाय भरारी पथके आमि महिलांची विशेष पथकेही तैनात करण्यात आली होती. विद्यार्थ्यांचा ताणतणाव घालवण्यासाठी समूपदेशकही तैनात ठेवण्यात आले होते.

आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?.
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका.
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?.