AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar Plane Crash : अजित पवारांच्या विमान अपघाताच्या चौकशी संदर्भात मोठी घोषणा, किती सदस्यीस टीम बनवली? तपास कसा होणार?

Ajit Pawar Plane Crash : भीषण विमान अपघाताने काल अजित पवारांना आपल्यापासून हिरावलं. ही घटना महाराष्ट्रातील जनतेसाठी मोठा धक्का आहे. आता या विमान अपघाताच्या चौकशी संदर्भात मोठी घोषणा झाली आहे.

Ajit Pawar Plane Crash : अजित पवारांच्या विमान अपघाताच्या चौकशी संदर्भात मोठी घोषणा, किती सदस्यीस टीम बनवली? तपास कसा होणार?
Ajit Pawar learjet 45
| Updated on: Jan 29, 2026 | 1:47 PM
Share

बारामती विमानतळाजवळ काल झालेल्या भीषण विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाला. ही घटना महाराष्ट्रासाठी मोठा धक्का आहे. या हवाई अपघाताच्या चौकशीसाठी केंद्रीय हवाई उड्डयाण मंत्रालयाने तीन सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. AAIB टीमसह डीजीसीएचं तीन सदस्यीय पथक कालच अपघात स्थळी पोहोचलं असं मंत्रालयाकडून स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे. अजित पवार लिअरजेट 45 विमानातून प्रवास करत होते. AAIB च्या डायरेक्ट जनरल यांनीही अपघात स्थळी जाऊन पाहणी केली. अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅकबॉक्स सापडला असून तपास प्रगतीपथावर आहे असं केंद्रीय हवाई उड्डयाण खात्याने एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे. संपूर्ण म्हणजे विस्तृत, पारदर्शक आणि कालमर्यादेत तपासाला सर्वोच्च प्राथमिकता असल्याचं मंत्रालयाने म्हटलं आहे.

कॉकपीट व्हॉइस रेकॉर्डर आणि फ्लाइड डाटा रेकॉर्डरला ब्लॅक बॉक्स म्हणतात. तो सापडला आहे. विमानात शेवटच्या क्षणी नेमकं काय घडलं? त्याची माहिती मिळवण्यासाठी ब्लॅक बॉक्समधून मिळणाऱ्या माहितीच विश्लेषण केलं जाईल, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. कारण त्यातूनच अपघात कसा झाला? काय चुकलं? त्याचा निष्कर्ष काढता येईल.

तपासकर्त्यांचा मुख्य फोकस कशावर?

विस्तृत, पारदर्शक आणि काल मर्यादेतील तपासाला आमचं प्राधान्य आहे, असं मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. AAIB नियम 2025 मधील रुल 5 आणि 11 नुसार तपास सुरु झाला आहे. आखून दिलेल्या SOP नुसारच हा तपास होणार आहे. दृश्यमानतेची स्थिती, वैमानिकाचा निर्णय आणि बारामतीमध्ये असलेल्या ऑपरेशनल मर्यादा यावर तपासकर्त्यांचा सध्या मुख्य फोकस आहे, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. नियंत्रणात नसलेली धावपट्टी हा चौकशीचा महत्वाचा भाग आहे. लँडिंगच्या दुसऱ्या प्रयत्नात विमान कोसळलं.

फॉरेन्सिक प्रक्रिया सुरु केली

AAIB ची एक्सपर्ट टीम बुधवारी संध्याकाळी अपघातस्थळी दाखल झाली. त्यांनी फॉरेन्सिक प्रक्रिया सुरु केली. ढिगारा ताब्यात घेणं, महत्वाचे पुरावे गोळा करणं या अंगांनी तपास सुरु केला आहे. एअरफ्रेम, इंजिन लॉगबुक, देखभालीचा रेकॉर्ड, तपासणी इतिहास, विमानातील कागदपत्र याची विमान कंपनीकडे मागणी केली आहे. क्रू चे क्वालिफिकेशन, प्रमाणपत्र याची सुद्धा तपासकर्त्यांनी मागणी केली आहे.

नियोजनाच्या बाबतीत अजित दादांचा हात कोणीही धरु शकत नाही: अंकूश काकडे
नियोजनाच्या बाबतीत अजित दादांचा हात कोणीही धरु शकत नाही: अंकूश काकडे.
क्रू मेंबर पिंकी माळी यांचा मृत्यू; स्थानिकांची सरकारकडे 'ही' मागणी
क्रू मेंबर पिंकी माळी यांचा मृत्यू; स्थानिकांची सरकारकडे 'ही' मागणी.
अंत्यसंस्कारानंतर कार्यकर्त्यांचा टाहो; पार्थ, जय पवारांनी जोडले हात
अंत्यसंस्कारानंतर कार्यकर्त्यांचा टाहो; पार्थ, जय पवारांनी जोडले हात.
अजितदादा पर्व संपले... तडफदार आणि झंझावाती नेतृत्व अनंतात विलीन
अजितदादा पर्व संपले... तडफदार आणि झंझावाती नेतृत्व अनंतात विलीन.
अजित पवार पंचतत्वात विलीन, दोन्ही मुलांकडून मुखाग्नी
अजित पवार पंचतत्वात विलीन, दोन्ही मुलांकडून मुखाग्नी.
नितीन गडकरी यांनी घेतलं अजितदादांच्या पार्थिवाचं अखेरचं दर्शन
नितीन गडकरी यांनी घेतलं अजितदादांच्या पार्थिवाचं अखेरचं दर्शन.
केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी घेतलं अजित पवारांचं अंत्यदर्शन
केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी घेतलं अजित पवारांचं अंत्यदर्शन.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार.
अजितदादांना अखेरचा निरोप देतांना प्रतिभा पवारांना अश्रु अनावर
अजितदादांना अखेरचा निरोप देतांना प्रतिभा पवारांना अश्रु अनावर.
अजित पवारांवर थोड्याच वेळात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार
अजित पवारांवर थोड्याच वेळात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार.