AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवार यांच्या विमानाचा अपघात… 11 नंबरचं कनेक्शन काय? मोठी बातमी पुढे, शेवटच्या क्षणी…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताने सर्वांनाच मोठा धक्का बसला. राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली. कधीही भरून न निघणारे नुकसान झाले. आता या अपघाताबद्दल मोठी माहिती पुढे येत आहे.

अजित पवार यांच्या विमानाचा अपघात... 11 नंबरचं कनेक्शन काय? मोठी बातमी पुढे, शेवटच्या क्षणी...
Ajit Pawar plane accident
| Updated on: Jan 29, 2026 | 2:19 PM
Share

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा काल विमान अपघातात दुर्देवी मृत्यू झाला. मुंबईहून सकाळी 8.10 ला अजित पवारांचे विमान बारामतीच्या दिशेने निघाले आणि 8.45 ला रडारवरून विमान गायब झाले. त्यापूर्वी पायलटने ATC सोबत संपर्क साधला होता. व्हिजिबिलीटी कमी असल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र, धावपट्टीच्या अगदी जवळ अजित पवारांच्या विमानाचा मोठा अपघात झाला. अजित पवार यांच्यासोबत विमानातील 5 जणांचा मृत्यू झाला. अजित पवार यांच्या विमान अपघाताची चाैकशी केली जाणार असून कालच केंद्रीय पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. या विमान अपघाताचे काही व्हिडीओही व्हायरल होत आहेत. अचानक विमान एका बाजूला झुकल्याचे काही व्हिडीओंमध्ये स्पष्ट दिसत आहे. अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात अहमदाबादहून उड्डाण घेतल्यानंतर काही सेकंदात झाला. त्यावेळी या भीषण अपघातातून फक्त एकच प्रवासी वाचला..

11 नंबर सीट असलेला एक प्रवासी अहमदाबादच्या विमान अपघातातून वाचला. त्यावेळीपासून विमानातील सर्वात सुरक्षित सीट हे 11 नंबरचे असल्याचे सांगितले जातंय. मात्र, अजित पवार यांच्या विमान अपघातात 11 A नंबरनेच घात केल्याचे स्पष्ट आहे. अजित पवार यांचे मुंबईहून बारामतीला निघालेले विमान बारामतीच्या धावपट्टी 11 वर उतरणार होते, तशी परवानगी देण्यात आली होती.

मात्र, धावपट्टीच्या लगत असलेल्या शेतात विमान कोसळले. बारामती विमानतळावरील 11 नंबरची धावपट्टी उंचावर आहे. ज्यामुळे येथे विमान उतरवणे म्हणजे मोठे आव्हान असते. खडकाळ भागावरील हा टेबलटॉप रनवे आहे. याच 11 नंबरच्या धावपट्टीने घात केला. ज्यावेळी हा अपघात झाला होता, त्यावेळी व्हिजिबिलीटी कमी असल्याचेही सांगितले जात आहे. पायलटने ATC ला याबाबत माहितीही दिली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, पायलटने एक चक्कर मारली होती, त्यानंतर अचानक विमान वेगाने खाली येताना दिसत आहे. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगितले जात आहे, तसा प्राथमिक अंदाज आहे. अजित पवार यांच्या विमानाच्या पायलटचा प्रचंड मोठा अनुभव होता. मात्र, अजित पवार यांच्या विमान अपघाताने देशभरात मोठी खळबळ उडाली. अजित पवार यांचे निधन झाले, यावर अजूनही कोणाला विश्वास बसत नाही.

दादांसारखा नेता जाणं महाराष्ट्राची हानी - हर्षवर्धन सपकाळ
दादांसारखा नेता जाणं महाराष्ट्राची हानी - हर्षवर्धन सपकाळ.
नियोजनाच्या बाबतीत अजित दादांचा हात कोणीही धरु शकत नाही: अंकूश काकडे
नियोजनाच्या बाबतीत अजित दादांचा हात कोणीही धरु शकत नाही: अंकूश काकडे.
क्रू मेंबर पिंकी माळी यांचा मृत्यू; स्थानिकांची सरकारकडे 'ही' मागणी
क्रू मेंबर पिंकी माळी यांचा मृत्यू; स्थानिकांची सरकारकडे 'ही' मागणी.
अंत्यसंस्कारानंतर कार्यकर्त्यांचा टाहो; पार्थ, जय पवारांनी जोडले हात
अंत्यसंस्कारानंतर कार्यकर्त्यांचा टाहो; पार्थ, जय पवारांनी जोडले हात.
अजितदादा पर्व संपले... तडफदार आणि झंझावाती नेतृत्व अनंतात विलीन
अजितदादा पर्व संपले... तडफदार आणि झंझावाती नेतृत्व अनंतात विलीन.
अजित पवार पंचतत्वात विलीन, दोन्ही मुलांकडून मुखाग्नी
अजित पवार पंचतत्वात विलीन, दोन्ही मुलांकडून मुखाग्नी.
नितीन गडकरी यांनी घेतलं अजितदादांच्या पार्थिवाचं अखेरचं दर्शन
नितीन गडकरी यांनी घेतलं अजितदादांच्या पार्थिवाचं अखेरचं दर्शन.
केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी घेतलं अजित पवारांचं अंत्यदर्शन
केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी घेतलं अजित पवारांचं अंत्यदर्शन.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार.
अजितदादांना अखेरचा निरोप देतांना प्रतिभा पवारांना अश्रु अनावर
अजितदादांना अखेरचा निरोप देतांना प्रतिभा पवारांना अश्रु अनावर.