येथे एका विद्यार्थ्यासाठी भरते शाळा, एकच शिक्षक आणि एकच विद्यार्थी

| Updated on: Jan 23, 2023 | 12:25 PM

तुम्ही जपानाच्या एका विद्यार्थीनीसाठी जपानचे रेल्वेप्रशासन संपूर्ण रेल्वेगाडी चालवित असल्याचे ऐकले असेल परंतू महाराष्ट्राच्या एका खेडेगावात एका विद्यार्थासाठी शाळेची घंटा वाजते. शाळेत रोज सकाळी राष्ट्रगीत होते आणि एका विद्यार्थ्यासाठी वर्ग भरतो.

येथे एका विद्यार्थ्यासाठी भरते शाळा, एकच शिक्षक आणि एकच विद्यार्थी
vashim
Image Credit source: socialmedia
Follow us on

मुंबई : शिक्षणाच्या प्रसारापासून एकही मूल वंचित राहू नये असे सरकारचे धोरण असते. त्याचे तंतोतंत पालन एका शाळेत होत आहे. येथे अवघ्या एका मुलासाठी शाळा भरत आहे, विद्यार्थी एक आणि शिक्षकही एकच, शाळेची घंटा एका मुलासाठी वाजते. शिक्षणाची गोडी असेल तर एका विद्यार्थ्यालाही शिक्षक शिकवायला तयार होत असतात हे याचे उदाहरण आहे. संपूर्ण गावात एकच शाळा असून येथे एकच शिक्षक आणि एकच विद्यार्थी आहे.

शिक्षणाच्या लाभापासून एक मुल वंचित राहू नये असे कोणत्याही लोककल्याणकारी सरकारचे धोरण असते. महाराष्ट्राच्या वाशिम जिल्ह्यातील गणेशपूर या गावात एक जिल्हा परिषदेची शाळा भरते. त्या शाळेत केवळ विद्यार्थी येत असतो. या एका विद्यार्थ्यासाठीच ही शाळा भरविली जात असते. या शाळेच्या एकमेव विद्यार्थ्याचे नाव कार्तिक असून तो आपला शाळेत नियमित जाऊन शिक्षण घेत आहे.

वाशिम जिल्ह्याचे छोटे खेडे असलेल्या गणेशपूर गावाची लोकसंख्या केवळ दीडशे ते दोनशे आहे. या गावातील जिल्हा परिषदेतील या १ ते ४ थी चे वर्ग भरणाऱ्या या अनोख्या शाळेची चर्चा सध्या सर्वत्र आहे. कारण पहीली ते चौथीचे वर्ग जरी असले तरी विद्यार्थी मात्र एकच आहे. या विद्यार्थ्याला शिकवण्यासाठी एक शिक्षक येत असतात.

शिक्षणाची गोडी असेल तर एका विद्यार्थ्यालाही शिक्षक शिकवायला तयार होत असतात हे याचे उदाहरण आहे. कार्तिक तिसऱ्या इयत्तेत शिकत असून त्याचे शिक्षक त्याला शिकविण्यासाठी 12 किमीचे अंतर प्रवास करीत येतात. हे दोघेजण राष्ट्रगीत म्हणून सुरूवात करतात. त्यानंतर वर्ग सुरू होतो. या मुलाचे शिक्षक किशोर मानकर संपूर्ण शाळेत त्यांचा कार्तिक हा एकटा विद्यार्थी असूनही त्याला अभ्यासाचे धडे देतात. त्यांना यात कसलाही कंटाळा किंवा वावगे वाटत नाही. संपूर्ण गावात एकच शाळा आणि येथे शिक्षक आणि विद्यार्थी एकच आहेत.