…तर मुंबईतील हे तीन आमदार नगरसेवकपदाचंही मानधन घेतात

| Updated on: Jul 26, 2021 | 5:13 PM

आमदार बनलेल्या पराग शाह, रईस शेख, दिलीप लांडे हे नगरसेवक पालिकेचे मानधनसुद्धा घेत असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस चिटणीस खात्याने दिली आहे.

...तर मुंबईतील हे तीन आमदार नगरसेवकपदाचंही मानधन घेतात
Parag Shah, MLA Raees Sheikh
Follow us on

मुंबई : राज्यात अनेक नगरसेवक आता आमदार झालेले आहेत. परंतु नगरसेवक झालेल्या अनेक आमदारांकडे अद्यापही संबंधित भागाचं नगरसेवकपद कायम आहे, अशी माहिती आता समोर आलीय. तसेच मुंबई महापालिका प्रशासनात नगरसेवक असलेल्या लोकप्रतिनिधी यांनी आमदार आणि खासदार बनल्यानंतर एकाच सभागृहाचे मानधन घेणे नैतिकदृष्ट्या अपेक्षित आहे. परंतु आमदार बनलेल्या पराग शाह, रईस शेख, दिलीप लांडे हे नगरसेवक पालिकेचे मानधनसुद्धा घेत असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस चिटणीस खात्याने दिली आहे.

तर आमदार रईस शेख, पराग शहा आणि दिलीप लांडे मानधन घेतात

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस चिटणीस खात्याकडे माहिती मागितली होती, सद्यस्थितीत जे नगरसेवक आमदार आणि खासदार झाले, त्याची माहिती देताना नाव, वेतन आणि भत्ता अशी एकूण रक्कम घेत नसल्यास त्याची माहिती देण्यात यावी. खासदार मनोज कोटक आणि आमदार रमेश कोरगावकर मानधन घेत नाहीत, तर आमदार रईस शेख, पराग शहा आणि दिलीप लांडे यांस दरमहा रु. 25,000/- मानधनासाठी आणि महापालिकेच्या प्रत्येक सभेकरिता रु. 150/- भत्त्यासाठी अशा केवळ चार सभांकरिता दिले जाते, असंही चिटणीस खात्याने अनिल गलगली यांना सांगितले.

त्यांच्या नगरसेवकपदांचे राजीनामे घेणे आवश्यक होते

अनिल गलगली यांच्या मते राजकीय पक्षाने जे नगरसेवक आमदार आणि खासदार बनले आहे, त्या ठिकाणी राजीनामे घेणे आवश्यक होते. पण दुर्दैवाने कोठल्याही राजकीय पक्षाने निर्णय घेतला नाही. अशा परिस्थितीत कमीत कमी मानधन न घेण्याची सूचना करणे आवश्यक होते.

संबंधित बातम्या

‘कर्जबुडव्या कारखान्यांना पायघड्या, संकटग्रस्त सामान्यांची मात्र उपेक्षा’, भाजपचा ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा

अश्लील चित्रपट रॅकेटचे धागेदोरे थेट उत्तर प्रदेशपर्यंत, राज कुंद्राची कंपनी महिलेच्या बँक खात्यात कोट्यवधी पैसे का पाठवायची?

These three MLAs from Mumbai also take honorarium for the post of corporator