ही काँग्रेस पक्षासाठी धोक्याची घंटा; बच्चू कडू यांनी सांगितलं

| Updated on: Feb 09, 2023 | 10:56 PM

पक्ष प्रवेश आणि न्यायालयामुळे मंत्र्यांची तारीख वर तारीख येत आहे. पुढील 15 दिवसांत अधिवेशनाच्या आधी मोठ्या प्रमाणावर पक्ष प्रवेश होईल, अशी अपेक्षा बच्चू कडू यांनी व्यक्त केली.

ही काँग्रेस पक्षासाठी धोक्याची घंटा; बच्चू कडू यांनी सांगितलं
बच्चू कडू
Follow us on

अमरावती : काँग्रेसमध्ये (Congress) पक्षफुटीचं वातावरण असल्याचं मत प्रहारचे आमदार बच्चू कडू (Bachu Kadu) यांनी म्हंटलंय. काँग्रेससोबत लोकं जुळायला तयार आहेत. मात्र, ते फुटत आहेत, असंही बच्चू कडू यांनी म्हटंलय. बच्चू कडू म्हणाले, आधीचं महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष हा पाचव्या क्रमांकावर गेला. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पदयात्रा काढली. पण, त्यानंतर काँग्रेसमध्ये फुटीचं वातावरण आहे. महाराष्ट्रातून यात्रा गेली. त्याचे परिणाम चांगले आले पाहिजे होते. पण, पक्षफुटीचे रिझल्ट येत आहेत. हे फार चुकीचं आहे. काँग्रेस पक्षाला चिंतन करण्याची गरज आहे. राहुल गांधी यात्रा काढतात. महाराष्ट्रातून जातात. वातावरण ढवळून निघते. सामान्य लोकं जुळायला तयार असतात. पण, नेते मात्र फुटतात. ही निश्चितच काँग्रेस पक्षासाठी धोक्याची घंटा असल्याचंही बच्चू कडू यांनी सांगितलं.

या आमदारांचा पक्ष प्रवेश होणार?

ठाकरे गट वगळता दुसऱ्या पक्षातील 10-15 आमदारांचा पक्ष प्रवेश होऊ शकतो. असा दावा आमदार बच्चू कडू यांनी केला. 20-25 आमदार जरी इकडे तिकडे झाले तरी सरकार मजबुतीने पूर्ण काळ पूर्ण करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पक्ष प्रवेश आणि न्यायालयामुळे मंत्र्यांची तारीख वर तारीख येत आहे. पुढील 15 दिवसांत अधिवेशनाच्या आधी मोठ्या प्रमाणावर पक्ष प्रवेश होईल, अशी अपेक्षा बच्चू कडू यांनी व्यक्त केली.

सरकार जाण्याचं कारण नाही. सरकार बहुमतात नाही. तर अतिबहुमतात आहे. काही आमदार इडके-तिकडे झाले तरी सरकार मजबुतीनं उभ राहील. इतर पक्षातील काही जणांना पक्षप्रवेश होऊ शकतो, अशी शक्यताही बच्चू कडू यांनी व्यक्त केली. १० ते १५ आमदारांचा अधिवेशनापूर्वी पक्षप्रवेश होईल, अशी शक्यताही बच्चू कडू यांनी व्यक्त केली.

आदित्य ठाकरे यांना सुनावलं

आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना बच्चू कडू म्हणाले, आव्हान देणे हे पोचट झालं आहे. या आव्हानांना काही अर्थ नाही. हा बालीशपणा आहे. जेव्हा विधानसभा निवडणूक होईल तेव्हा आव्हान दिले पाहिजे.

तुम्हाला एवढीच हौस असेल तर शिंदे साहेबांच्या मतदारसंघात जाऊन तुम्ही लढा. तुम्ही माझ्या घरी या मी तुम्हाला दाखवून देईल. याला काही अर्थ नसतो, असंही बच्चू कडू यांनी आदित्य ठाकरे यांनी सुनावलं.