हा तर ‘गांजा काळे’, अभिजित बिचुकले यांनी केलं मनसे नेत्याचं नवं नामकरण

| Updated on: Jan 21, 2023 | 5:59 PM

मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी एका कार्यक्रमात बोलताना शिवसेना नेते संजय राऊत आणि बिग बॉस फेम अभिनेता अभिजित बिचुकले यांच्यावर टीका केली होती. त्यावरून अभिजित बिचुकले यांनी काळे यांचं नवं नामकरण केलं आहे.

हा तर गांजा काळे, अभिजित बिचुकले यांनी केलं मनसे नेत्याचं नवं नामकरण
mns gajanna kale
Image Credit source: TV9 NETWORK
Follow us on

पुणे : राज्यात दोनच माणसे अशी आहेत की त्यांना वाटतं आपूनच भगवान है. ते म्हणजे संजय राऊत ( sanjay raut )  आणि अभिजित बिचुकले ( abhijit bichukale) हे दोघेही गांजा ओढतात अशी टीका मनसे प्रवक्ते गजानन काळे ( ( mns gajanan kale ) यांनी केली होती. त्यावरून अभिजित बिचुकले यांनी गजानन काळे यांच्यावर कडक शब्दात टीका केली आहे. काय नावं त्याचं? त्या माणसाचं नाव काय? अच्छा! गजानन काळे. त्याला आज अभिजित बिचुकले नाव देतोय. राज ठाकरे आमचे बंधू आहेत. राज ठाकरे ( raj thackarey ) तुम्हाला सांगतो तुमचा जो कोण पदाधिकारी आहे. त्याचं नाव आजपासुन आहे, गांजा काळे… गजा काळे नाही… तुझं नाव मी आजपासून देतो आहे. हे संपूर्ण महाराष्ट्राने लक्षात ठेवा. राज ठाकरे यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचे नाव आहे गांजा काळे असे सांगत अभिजित बिचुकले यांनी संताप व्यक्त केला आहे.

गांजा काळे, तू काय म्हणतो संजय राऊत आणि मला काय म्हणतो? चल ठीक हाय की तुमचं आणि संजय राऊतांच काही वैर असेल. तू काय म्हणतो अभिजित बिचुकले गांजा ओढतो? तुझ्या सातशे पिढयांना तरी माहित आहे का की अभिजित बिचुकलेची औकात काय आहे? अभिजित बिचुकलेची जात, धर्म महाराष्ट्राच्या नावात आहे. तुला गमंत सांगतो राज दादा आहे माझा. सातारा माझं घर आहे. पण तुझ्या घरासमोर येऊन तुला फरफटत उचलून नेईन आणि राज ठाकरेसमोर कृष्णकुंज बंगल्यावर तुझे कानफाड फोडींन, असा सणसणीत इशारा अभिजित बिचुकले यांनी दिला.

हे सुद्धा वाचा

माझी अवलाद कुणाची आहे ते तुला माहित नाही अजून, शिवाजी महाराज यांचा वारसा आहे मी. लक्षात ठेव भाषा नीट वापर. संजय राऊत यांच्या चपलेजवळ उभी राहण्याची तुझी लायकी नाही. गांजा ओढून काढला का तुला? तुझ्या रक्तात गांजा आहे का? असे सवाल करत तुझा बाप आहे राज ठाकरे म्हणून उड्या मारू नको. तुझा काका इथे आहे. राज दादा अशा कार्यकर्त्यांना पक्षात ठेवू नका. माझ्याशी पंगा महागात पडेल. ज्या दिवशी राज दादा आणि आमचे एकमेकांचे काय होईल ते आमचे आम्ही पाहून घेऊ. पण, राज ठाकरे माझा भाऊ आहे, असा शब्दात अभिजित बिचुकले यांनी गजानन काळे यांना समज दिली आहे.