धाराशिवमध्ये दोन विविध घटनांत पाण्यात बुडून तीन बालकांचा मृत्यू ,गावावर शोककळा

मूरुमच्या गणेश नगरमध्ये दोघे मित्र दुपारच्या वेळी खेळत खेळत खड्ड्याजवळ गेले आणि पोहण्याच्या हेतूने पाण्यात उतरले होते.. तर दुसऱ्या घटनेत माडज येथे एक मुलगा शेततळ्यात पाय घसरुन पडल्याने बुडाल्याचे म्हटले जात आहे.

धाराशिवमध्ये दोन विविध घटनांत पाण्यात बुडून तीन बालकांचा मृत्यू ,गावावर शोककळा
| Updated on: Jun 03, 2025 | 11:07 PM

धाराशिवच्या उमरगा तालुक्यात दोन विविध घटनात पावसाची मजा करायला गेलेल्या तीन बालकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.येथील मुरुम परिसरातील गणेश नगरात पाण्याने भरलेल्या खडड्यात बुडून दोन लहान मुलांचा मृत्यू झाला तर माडज येथे एका बालकाचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून पंचक्रोशीत अवकळा पसरली आहे.

धाराशिवच्या उमरगा तालुक्यात दोन विविध घटनात तीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे . उमरगा तालुक्याती मुरुम परिसरात गणेश नगरमध्ये पाण्याने भरलेल्या खड्ड्यात दोन बालक उतरले होते, त्यात त्यांचा मृत्यू झाला तर तर माडज येथे एका बालकाचा पाय घसरुन तो शेततळ्यात पडल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

उमरगा तालुक्यातील मुरुम येथे पाण्याने भरलेल्या खड्ड्यात दोन मित्र पोहायला गेले होते. मुरुम शहराजवळील गणेश नगर ग्रामपंचायत हद्दीत महामुनी फ्लॉटिंगच्या मागील बाजूस असलेल्या एका खड्ड्यात हे दोन मित्र उतरले होते,मात्र त्यांचा बुडून मृत्यू झाला आहे, तर दुसरीकडे उमरगा तालुक्यातील माडज येथे एका दहा वर्षाच्या मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

गावावर शोककळा

मुरुमच्या गणेश नगर येथे अमित बाळू राठोड (वय ११, इयत्ता पाचवी) आणि सुरज अर्जुन पवार (वय १२, इयत्ता सहावी) तर माडज येथे शेततळ्यात बुडून अनिकेत दशरथ खटके( वय १० वर्ष ) अशी मृत मुलांची नावे आहेत.मूरुमच्या गणेशनगरमध्ये दोघे मित्र दुपारच्या वेळी खेळत खेळत खड्ड्याजवळ गेले आणि पोहण्याच्या हेतूने पाण्यात उतरले होते.तर दुसऱ्या घटनेत माडज येथे एक मुलगा शेततळ्यात पाय घसरुन पडल्याने बुडाल्याचे म्हटले जात आहे. तिघांना ग्रामस्तांनी रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.