AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tomato Flu | देशात टोमॅटो फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ, 2 दिवस ताप, त्वचेवर लाल फोडं, काय आहेत लक्षणं,औषध अन् बचावाचे उपाय? केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना जारी!

Tomato Flue हा व्हायरल आजार असून यामुळे शरीरावर टोमॅटोसारखे चट्टे किंवा फोड येतात. ताप, त्वचेवर व्रण, सांधेदुखी, थकवा, घसा दुखणे ही सामान्य लक्षणं आहेत. केंद्र सरकारने एका अहवालात टोमॅटो फ्लूचे लक्षण आणि उपायांविषयी सविस्तर सांगितलंय.

Tomato Flu | देशात टोमॅटो फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ, 2 दिवस ताप, त्वचेवर लाल फोडं, काय आहेत लक्षणं,औषध अन् बचावाचे उपाय? केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना जारी!
टोमॅटो फ्लूची लक्षणं Image Credit source: social media
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Aug 24, 2022 | 10:41 AM
Share

मुंबईः भारतात टोमॅटो फ्लू (Tomato Flu) या आजाराच्या रुग्णांमध्ये वेगाने वाढ होतेय. फक्त केरळमध्ये (Kerala) या आजाराचे 82 रुग्ण आढळले आहेत. केरळनंतर कर्नाटक, तमिळनाडू, ओडिशातही हे रुग्ण आढळून आलेत. विशेषतः लहान मुलं या फ्लूला जास्त बळी पडत आहेत. मुलांमधील हा हँड फुट माउथ डिसीज (Hand Foot Mouth disease) असेही म्हटले जातेय. वारंवार होणारे हवामान बदल आणि पावसाळ्यातील संभाव्य धोके लक्षात घेता, केंद्र सरकारने या आजारासंबंधी एक मार्गदर्शक सूची जारी केली आहे. यात टोमॅटो फ्लूची लक्षणं नेमकी काय आहेत, हा आजार होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची तसेच आजार झाल्यानंतर त्यावर काय उपाय करायचे, आजाराचा फैलाव रोखण्यासाठी काय खबरदारी घ्यावी, यासंबंधीच्या सूचना यात देण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांमधील महत्त्वाची माहिती काय आहे ते पाहुयात-

टोमॅटो फ्लू नेमका काय?

टोमटो फ्लू हा व्हायरल आजार असून यात प्रामुख्याने शरीरावर टोमॅटोच्या रंगाचे लाल फोड येतात. आजाराची इतर लक्षणे साधारण व्हायरल इंफेक्शनसारखी असतात. यात ताप, शरीरावर रॅशेस, सांधेदुखी, थकवा, घशात खवखव आदींचा समावेश आहे. आजाराचा संसर्ग झाल्यास आधी थोडा ताप येतो. मग घसा दुखतो. तापेचे दोन-तीन दिवस झाल्यानंतर शरीरावर लाल रंगाचे डॉट्स दिसू लागतात. त्यानंतर त्याचे मोठे फोड होतात. प्रामुख्याने तोंडात, जिभेवर किंवा हिरड्यांवर हे फोड येतात.

संसर्ग झाल्यास काय करावे?

  • – 5 ते 6 दिवस स्वतःला विलग ठेवावे. जेणेकरून हा आजार पसरणार नाही.
  • – आपल्या आजू-बाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. संसर्ग झालेल्या मुलांसोबत इतरांना खेळू न देणे. एकमेकांच्या खेळण्या वापरू नये.
  • – फोडांना हात लावू नये. चुकून स्पर्श केल्यास तत्काळ हात धुवून टाकावेत.
  • – संसर्ग झालेल्या मुलाचे कपडे, भांडी वेगळी ठेवावी.
  • – पुरेसा आराम केल्यास लवकर जखमा भरून निघतात.

संसर्ग झाला हे कसे कळेल?

– रेस्पिरेटरी सँपल्सद्वारे या आजाराचा संसर्ग कळून येतो. आजाराची लक्षणे जाणवल्यास 48 तासांच्या आतच श्वसनाचे नमूने देता येतील. – फेसल सँपल्स अर्थात मल नमून्यांद्वारेही या आजाराची तपासणी होते. पण हे सँपल्सदेखील 48 तासांच्या आतच घेणे आवश्यक आहे.

ठराविक औषध नाही…

टोमॅटो फ्लू झाल्यास कोणतेही ठराविक औषध दिले जात नाही. व्हायरल आजारांसाठी जी औषधं देतात, तीच सध्या तरी डॉक्टरांमार्फत दिली जात आहेत. आतापर्यंत 10 वर्षांच्या खालील मुलांमध्ये हा आजार सर्वाधिक आढळला आहे. त्यामुळे बालकांच्या सुरक्षेची चिंता सध्या देशाला सतावतेय.

आजार कसा पसरतो?

केंद्र सरकारने अहवालात दिलेल्या माहितीनुसार, टोमॅटो फ्लू होण्यामागील नेमके कारण काय ठरते, यावरही शास्त्रज्ञ रिसर्च करत आहेत. मात्र हे व्हायरल आजाराचेच एक स्वरुप मानले जात आहे. डेंग्यू किंवा चिकनगुनियाचा हा एक साइट इफेक्ट आहे, असे काहींचे मत आहे. शास्त्रज्ञांच्या मते, एका विषाणूद्वारे हा आजार पसरतो, मात्र तो विषाणू नेमका काय आहे, हे अद्याप कळू शकलेले नाही.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच