नशीब बलवत्तर ! सहलीसाठी निघालेल्या बसचा अपघात…24 मुलींसह चालक जखमी

इचलकरंजी येथून सहलीसाठी निघालेल्या बसला पहाटेच्या वेळी अपघात झाला आहे. पुलावरुन बस खाली उतरली गेली आहे. यामध्ये 3 मुलींसह चालक आणि पाच कर्मचारी जखमी आहे.

नशीब बलवत्तर ! सहलीसाठी निघालेल्या बसचा अपघात...24 मुलींसह चालक जखमी
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Dec 31, 2022 | 11:10 AM

नावीद पठाण, टीव्ही 9 मराठी, बारामती : बारामती मार्गे फलटणच्या दिशेने जाणाऱ्या एका खाजगी बसचा अपघात झाला आहे. सहलीला जाणाऱ्या बसचा अपघात पहाटेच्या वेळेला झाला आहे. यामध्ये विशेष बाब म्हणजे जीवित हाणी कुठलीही झाली नसून 3 मुली आणि काही शाळेचे कर्मचारी आणि चालक जखमी झाले आहे. समोरून येणारे वाहन चुकवत असतांना हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पाहुणेवाडी गावाजवळ हा अपघात घडला असून घटनेची माहीती मिळताच पोलीस कर्मचारी दाखल झाले होते. त्यांनी तात्काळ रुग्णवाहिका बोलावून बारामती येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. शिर्डीवरुण इचलकरंजीला परतीचा प्रवास करत असलेल्या बसला अपघात झाला आहे. खाजगी बसला झालेल्या अपघात तीन मुली गंभीर जखमी आहेत. या अपघातात माळेगाव पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी तात्काळ मदत केली असून बसला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.

पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास सहलीसाठी निघालेल्या बसचा अपघात झाला आहे. समोरील वाहन चुकवत असतांना बस थेट पुलावरुन खाली गेल्याची माहिती समोर येत आहे.

शनिवारी पहाटे हा अपघात झाला असून यामध्ये इचलकरंजी येथील खाजगी क्लासेसच्या मुलींची ही सहल काढण्यात आली होती.

हे सुद्धा वाचा

अरुंद रस्ता असतांना समोरील वाहन चुकवत असल्याने हा अपघात झाला असावा अशी माहिती येत असून पाच कर्मचारी आणि तीन मुलींसह चालक यामध्ये जखमी असून इतर 24 मुली सुखरूप आहे.

औरंगाबाद, दौलताबाद, वेरूळ, शिर्डी, शनी-शिंगणापूर असा प्रवास करून ही बस फलटणच्या दिशेने येत होती, त्या दरम्यान बारामती रोडवर हा अपघात झाला आहे.

यशोदा ट्रॅव्हल्सची ही बस सागर क्लासने बूक केलेली होती, सहल पूर्ण करून माघारी येत असतांना हा अपघात झाला आहे. थोडक्यात हा झाला असून मोठी दुर्घटना टळली आहे.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.