निवडणूक आयोगाविरोधातील गर्जना मोर्चानंतर ठाकरे बंधूंच्या अडचणी वाढल्या, मोठा झटका

आज ठाकरे बंधूंच्या वतीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबईत गर्जना मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चाला इतरही पक्षांनी पाठिंबा दिला होता. त्यानंतर आता मोठी बातमी समोर आली आहे.

निवडणूक आयोगाविरोधातील गर्जना मोर्चानंतर ठाकरे बंधूंच्या अडचणी वाढल्या, मोठा झटका
Uddhav Thackeray
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 04, 2026 | 3:22 PM

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आता वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधी पक्षांकडून ज्ञानेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहे. विरोधी पक्षांकडून सातत्याने ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. दोन ऑक्टोबर रोजी कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये मोठा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये वेगवेगळ्या राज्यातून आलेले जेन झी सहभागी झाले होते. दरम्यान त्यानंतर आता आज शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या वतीने ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मोठा मोर्चा काढण्यात आला आहे. शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या वतीने यावेळी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.  शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या वतीने काढण्यात आलेल्या या गर्जना मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासह इतरही विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला आहे.

दरम्यान त्यानंतर आता मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार  ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चाला परवानगीच नव्हती. मुंबईतील आझाद मैदान वगळता कुठेही या मोर्चाला परवानगी नव्हती, त्यामुळे आता ठाकरे बंधूंच्या मोर्चाच्या आयोजकांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत.  बेकायदेशीरपणे जमाव जमवणे या कलमांतर्गत गुन्हा दाखल होणार आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Loading...

 उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल 

दरम्यान यावेळी बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोग आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे.  मोर्चासाठी जनसागर उसळला आहे, आमच्यासोबत अनेक राजकीय पक्ष आले, त्या सर्वांना धन्यवाद, हा लढा आपल्या स्वातंत्र्याचा आहे. मोदीजी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी मेक इन इंडियाची घोषणा केली होती, परंतु यात तुम्ही जर हुकूमशाह बनत असाल तर ती हुकूमशाही आम्ही गाडून टाकू, भारतामधून जवळपास 13 कोटी लोकांची नावं मतदार यादीमधून वगळण्यात आलं आहे. आयुक्तांच्या नेमणूकीवर आक्षेप आहे, राष्ट्रपतीची निवडणूक होते मग आयुक्ताची निवडणूक का होत नाही? असा सवालही यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us