तुषार भोसलेंवर तुळजाभवानी मंदिर संस्थान मेहरबान! तर जिल्हाधिकाऱ्यांचे कारवाईचे आदेश

| Updated on: Oct 07, 2021 | 2:47 PM

भाजप अध्यात्मिक आघडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांच्यावर गुन्हा नोंद करून कारवाई करण्याचे आदेश उस्मानाबाद जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले आहेत. नियम सर्वांना सारखे आहेत. नियमभंग केला असेल तर कारवाई केली जाईल, असे सांगत कौस्तुभ दिवेगावकर यांनी उपविभागीय अधिकारी डॉ. योगेश खरमाटे यांना कारवाईचे आदेश दिले.

तुषार भोसलेंवर तुळजाभवानी मंदिर संस्थान मेहरबान! तर जिल्हाधिकाऱ्यांचे कारवाईचे आदेश
तुषार भोसलेंकडून तुळजाभवानीचे दर्शन
Follow us on

उस्मानाबाद : आजपासून तुळजाभवानीच्या नवरात्रौत्सवाला सुरुवात झाली आहे. या काळात उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमावली जाहीर केलीय. मात्र, भाजप आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांच्यावर तुळजाभवानी मंदिर संस्थान आज मेहेरबान झाल्याचे पाहायला मिळाले. भाविकांना मंदिरात सांयकाळी 6 नंतर प्रवेश असल्याचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आदेश काढले होते. मात्र, पास न काढताच भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी सहपरिवार तुळजाभवानीचे दर्शन घेतले. (Tushar Bhosle will be charged in the case of entering the Tulja Bhavani temple without a pass)

सामान्य भाविक प्रवेश द्वारावर दर्शनाच्या प्रतिक्षेत, तर तुषार भोसले सहकुटुंब मंदिरात अशी स्तिथी होती. तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात भोसले यांचे विनामास्क फोटो सेशनही केली. मात्र, त्यांना साधं कुणी हटकलही नाही. दुसरीकडे ऑनलाइन बुकिंगनंतरच सायंकाळी 6 नंतर भक्तांना मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. तसा नियम खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी केला असूनही मंदिरात प्रवेश देताना तुषार भोसले यांना वेगळा न्याय देण्यात आल्याचं पाहायला मिळालं.

मंदिरात येताना कुणी अडवलं नाही- भोसले

महत्वाची बाब म्हणजे मंदिरात येताना कुणीच अडवले नसल्याचं तुषार भोसले म्हणाले. मी नियमभंग केला नाही, असे सांगत भोसले यांनी मंदिरातून काढता पाय घेतलाय. दरम्यान, विनापरवानगी मंदिरात प्रवेश करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

तुषार भोसलेंचा विना पास तुळजाभवानी मंदिरात प्रवेश

तुषार भोसलेंवर गुन्हा दाखल होणार

भाजप अध्यात्मिक आघडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांच्यावर गुन्हा नोंद करून कारवाई करण्याचे आदेश उस्मानाबाद जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले आहेत. नियम सर्वांना सारखे आहेत. नियमभंग केला असेल तर कारवाई केली जाईल, असे सांगत कौस्तुभ दिवेगावकर यांनी उपविभागीय अधिकारी डॉ. योगेश खरमाटे यांना कारवाईचे आदेश दिले. भक्तांना सायंकाळी 6 नंतर तुळजाभवानी मंदिरात प्रवेश असताना भोसले यांना मंदिरात नियमबाह्य प्रवेश दिला गेला. भोसले यांनी विना पास प्रवेश करून मंदिर गाभाऱ्यात सहकुटुंब आणि भाजपच्या कार्यकर्त्यांसह फोटोसेशनही केलं आहे. यावेळी त्यांनी मास्क घातला नसल्याचं पाहयला मिळतंय.

‘जुलमी ठाकरे सरकारचे मर्दन करून रामराज्य स्थापन करावं’

भाजप अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांनी सहपरिवार तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. जुलमी ठाकरे सरकारचे देवीने मर्दन करावे व महाराष्ट्रमध्ये राम राज्याची स्थापना करावी असे साकडे त्यांनी घातले.अधर्मी ठाकरे सरकारने गेल्या 6 महिन्यापासून देवी देवतांना कुलूपबंद केले होते आज त्यांची सुटका झाली आहे.आज आनंदच दिवस आहे , लाखो लोकांची चूल पेटणार आहे. अतिवृष्टीमुळे झालेले सावट कमी होऊ दे शेतकरीला बळ दे, असे साकडे त्यांनी घातले.

इतर बातम्या :

जुलैच्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई ऑक्टोबरमध्ये जाहीर, पुणे विभागाला सर्वाधिक मदत

चित्रा वाघ भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत, पक्षाविरोधात रणशिंग फुंकणाऱ्या वरुण गांधींना डच्चू, वाचा नवी कार्यकारिणी

Tushar Bhosle will be charged in the case of entering the Tulja Bhavani temple without a pass