
TV9 मराठी पंढरपूर यात्रेतील भाविकांना थेट विठ्ठल दर्शनासाठी डीजिटल व्हॅनसह सेवा देत आहे. ही निव्वळ व्हॅन नसून वारकऱ्यांसाठीचं उत्तम व्यासपीठ आहे. या व्हॅनमध्ये बसून तुम्हाला गटागटाने भजन म्हणता येऊ शकता. तसेच विठोबावरील प्रेम आणि भक्ती व्यक्त करू शकता.
महाराष्ट्रातील नंबर १ मराठी वृत्तवाहिनी असलेली टीव्ही ९ मराठी या पंढरपूर वारीमध्ये एक अनोखा उपक्रम राबवत आहे. ज्यात 20 जून ते 6 जुलै 2025 या कालावधीत पुणे ते पंढरपूर या मार्गात वारकऱ्यांबरोबर एक लाईव्ह डिजिटल व्हॅन चालवली जाणार आहे. चांगल्या ध्वनी प्रणाली आणि स्पीकर्ससह असलेल्या या एलईडी व्हॅनमध्ये वारकऱ्यांना भगवान विठ्ठलाचे थेट दर्शन घेता येणरा आहे. या गाडीत बसून भजन आणि अभंग म्हणता यावेत, विठोबावरील त्यांचे प्रेम आणि भक्ती व्यक्त करावी, त्यांच्या सुरातालावर गाणे गावे, नृत्य करावे आणि समाधीत लीन व्हावे यासाठी एक उत्कृष्ट व्यासपीठ आहे. भजनादरम्यान , भाविक राज्यातल्या महत्त्वाच्या राजकीय, सांस्कृतिक आणि सामाजिक घडामोडींवरील बातम्या ऐकण्यासाठी विश्रांतीही घेऊ शकतात.
महाराष्ट्रातील मराठी वृत्तवाहिन्यांमध्ये TV9 मराठी आघाडीवर आहे. देशात डेटा आणि डिजिटलचा वेग वाढत असताना, संस्कृती आणि तंत्रज्ञानाची सांगड घालून यात्रेकरूंना हा अनोखा अनुभव देण्याचा आमचा मानस आहे. लाईव्ह डिजिटल व्हॅन हा TV9 मराठीचा एक छोटासा उपक्रम आहे, जो यात्रेकरुंना त्यांच्या २१ दिवसांच्या आव्हानात्मक प्रवासात मदत करतो. ही व्हॅन वारकऱ्यांसाठी आध्यात्मिक मनोरंजन क्षेत्र असेल. कारण प्रत्येक वारकरी विठू माऊलीसमोर प्रार्थना करतो, नाचतो आणि प्रवासाच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेतो. 6 जुलै रोजी म्हणजेच आषाढी एकादशीला ही व्हॅन विठोबाचे लाईव्ह डिजिटल दर्शन आणि भगवंताच्या आरतींसाठी एक उत्कृष्ट व्यासपीठ म्हणून काम करेल , विशेषतः ज्येष्ठ वारकरी, जे गर्दीमुळे मंदिरात जाऊन दर्शन घेऊन प्रार्थना करू शकत नाहीत अशांना विठ्ठलाचे दर्शन याचि देही याची डोळा करण्याची संधी मिळेल.
या मिरवणुकीदरम्यान, यात्रेकरू महाराष्ट्रातील मध्ययुगीन संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या पालख्या घेऊन जातात. पंढरपूर वारी हा महाराष्ट्रातील सर्वात जुना आणि सर्वात मोठा ग्रामीण सांस्कृतिक उत्सव आहे, जो दरवर्षी आषाढ महिन्यात साजरा केला जातो. अभंग म्हणजे भगवान विठ्ठलाच्या स्तुतीसाठी गायल्या जाणाऱ्या भक्तीपर कविता आहेत. ‘विठू माऊली’ ह्या कार्यक्रमाचे प्रसारण 20 जूनपासून दररोज दुपारी 4.40 वाजता फक्त टीव्ही 9 मराठीवर होणार आहे.