
साताऱ्यामधील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी आरोपी प्रशांत बनकरला अटक केली आहे. 24 तासांनी त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. तर या प्रकरणातील आणखी एक आरोपी PSI गोपाळ बदने हा अद्यापही फरार असून त्याच्या शोधासाठी पोलिसांची पथकं पाठवण्यात आली आहेत. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत विविध अभियांत्रिकी आणि देखभाल कामे करण्यात येणार आहेत. प्रवाशांनी रेल्वे प्रशासनास सहकार्य करावे, अशी विनंती रेल्वे प्रशासनाने केलं आहे. तर पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. मात्र पश्चिम रेल्वेवर रविवारी कोणताही ब्लॉक नसेल. यासह देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.