
४ कोटी ४१ लाखांच्या थकबाकीमुळे महापालिकेने पाणीपुरवठा खंडित केला होता. रेल्वे प्रशासना कडून १ कोटी १७ लाख रुपये भरण्याची प्रक्रिया सुरू करत उर्वरित रक्कम भरण्याचे आश्वासन दिल्याने पालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांच्या निर्देशानंतर पाणीपुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला आहे. लवकरच थकबाकी वसुलीसाठी येत्या आठवड्यात पालिका अधिकाऱ्यांची रेल्वे प्राधिकरणासोबत चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. गावी जाण्यासाठी लाल परी सज्ज 15 एप्रिल पासून 37 ज्यादा बस गाड्या सोडण्याचे एसटी विभागाने नियोजन केले आहे. दररोज लांब पल्यांच्या जवळपास 764 फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. सर्व फेऱ्या आगावू आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. येत्या 15 एप्रिल पासून ते 15 जून पर्यंत या कालावधीत उन्हाळी जादा बसेस सोडण्यात येणार आहे. ठाण्यातील खोपट, वंदना डेपोसह कल्याण, विठ्ठलवाडी, मुरबाड शहापूर आणि वाडा या सात एसटी आगारातून नियमित गाड्या व्यतिरिक्त ज्यादा बस गाड्या नियोजन करण्यात आले आहे. चेन्नईत इराणी एन्काऊंटर नंतर कल्याणमध्ये इराणी गँगची दहशत पाहायला मिळत आहे. इराणी वस्तीत पहिले म्हणून शेतकऱ्याला जाळून ठार मारण्याच्या धमक्या… कल्याण तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून. पोलिस तपासात NCP जनसंपर्घ कार्यालयातून मोठ्या प्रमाणात शस्त्र जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे.
बीडे जिल्ह्यातील स्वप्नील देशमुख उर्फ बबलू देशमुख याची जुन्या वादातून निर्घृण हत्या प्रकरणातील आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. संतोष देशमुख, सोनाली देशमुख, रामभाऊ देशमुख या तिन्ही आरोपींना घेऊन शिरसाळा पोलीस धारूरकडे रवाना झाले आहे.
कल्याण पूर्वेत मेट्रो मॉलबाहेर दोन गटांत राडा झाला. भर रस्त्यावर दोन गटात वाद विकोपाला गेल्याने
पट्ट्याने एकमेकांना मारहाण करण्यात आली. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे.
धाराशिवमधील कळंब शहरातील द्वारकानगरी वसाहतीत मनीषा बिडवे या महिलेचा मृतदेह राहत्या घरात सडलेल्या अवस्थेत आढळून आला. शेजाऱ्यांना वास आल्याने सर्व प्रकार समोर आला. संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित ज्योती मंगल जाधव आणि खून झालेल्या महिलेचा संबंध नसल्याचा पोलिसांनी सांगितले.
शिरूर तालुक्यातील पाबळ येथे एका अनोळखी व्यक्तीने शाळेत शिरून विद्यार्थ्याची चौकशी केल्याने खळबळ उडाली आहे. मात्र यावेळी बस चालकाच्या चलाखीने एका विद्यार्थ्यांचे अपहरण होतानाच टळले आहे.
अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यातील सावरपाटी गावात खाऱ्यापाण्यापुळे अनेकांना किडनीचे आजार उद्धभवू लागल्याचं गावकऱ्यांनी म्हटल आहे. खारं पाणी प्यायल्याने अनेकांच्या किडनी फेल झाल्याचं तेथील गावकऱ्यांनी म्हटलं आहे, तर 20 ते 25 पेक्षा अधिक गावात ‘क्षारयुक्त पाणी’ प्यायल्याने ‘किडनीचे’ आजार होऊ लागल्याचं म्हटलं आहे. गावकरी किडनी आजारामूळ त्रस्त झाले आहेत. त्यामुळे गावकऱ्यांचा चांगल्या. शुद्ध पाण्यासाठी संघर्ष सुरु आहे. तर अनेकांना सुद्ध पाण्यासाठी पैसे मोजावे लागत आहेत.
देशात सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावच्या सराफ बाजाराच्या इतिहासात सोन्याच्या आणि चांदीच्या दराने नवा पुन्हा नवा विक्रम नोंदवला आहे. जळगावच्या सराफ बाजारात सोन्यामध्ये 900 रुपये आणि चांदी मध्ये 500 रुपयांची वाढ झाली असून सोन्या चांदीच्या दराने पुन्हा विक्रमी उच्चांकी गाठली आहे.
सोन्याचे प्रति तोळा Gst सह दर हे 93 हजारांवर पोहोचले असून चांदी प्रतिकिलो 1 लाख 5 हजार रुपयांवर पोहोचली आहे. 2024 मध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी सोन्याचे दर हे 66 हजार रुपये होते. एकाच वर्षात सोन्याच्या दरात तब्बल 25 ते 30 हजार रुपयांची वाढ झाली आहे..
आर एस एसचे माजी सरकार्यवाहक भय्याजी जोशी यांनी औरंगजेबाच्या कबरीबद्दल वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, “औरंगजेबाचा कबरीचा विषय अनावश्यक आहे. त्याचा मृत्यू इथे झाला म्हणून त्याची कबर इथे बनली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आदर्श आहेत, त्यांनी अफजल खानाची कबर बनवली होती. भारताच्या उदारतेच आणि सर्व समावेशकतेचे हे प्रतीक आहे. त्यामुळे औरंगजेबाची कबर आहे तिथे राहो आणि ज्याला जायचा आहे तो तिथे जाईल” असं म्हणत त्यांनी औरंगजेबाच्या कबरीवरून जो वाद चालला आहे त्यावरही भाष्य केलं आहे.
जीव दया सेवा ट्रस्टच्या माध्यमातून पक्षी प्राणी मित्र बाळासाहेब ढमाले यांनी कात्रज घाटात पक्षी व प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. ढमाले हे गेल्या १५ वर्षांपासून पुणे शहरात पक्षी व प्राण्यांचे संरक्षण आणि वाचवण्याचे कार्य करत आहेत. या उपक्रमामुळे कात्रज घाटातील पशु-पक्ष्यांना उन्हाळ्यात दिलासा मिळणार आहे.
मालाड पूर्वेतील पिंपरी पाडा येथे कलश यात्रेदरम्यान भगवा झेंडा फडकवल्यामुळे दोन हिंदू तरुणांना एका समुदायाच्या जमावाने मारहाण केली आहे. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कुरार पोलिसांनी दोन्ही हिंदू मुलांच्या तक्रारीवरून एफआयआर नोंदवला आहे आणि तपास सुरु केला आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील अनेक गावात गेल्या दोन महिन्यापासून केस गळतीने नागरिक हैराण झाले. अचानक आलेल्या केस गळती प्रकरणाने आरोग्य प्रशासन हा ढवळून निघाले होते. आयसीएमआरचं पथकही या भागात तपासणीसाठी दाखल झालं होत.. या पथकाने दोन वेळेस या परिसरातील केस गळती रुग्णांचे तसेच परिसरातील इतर वस्तूंचे नमुने तपासणीसाठी नेले.. मात्र अद्यापही दोन महिने उलटूनही आयसीएमआर चा अहवाल उघड न झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
सिंदेवाही – चिमूर मार्गातील पेंढरी ते महादवाडी फाट्याजवळ रेतीचा ट्रक पहाटे ५ वा . सुमारास रस्त्यावर फेल झाल्यामुळे ५ तास वाहतूक खोळंबली. अखेर दुसरा मार्ग काढल्यानंतर रस्ता सुरू
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गायलेल्या गाण्यानंतर स्टँडप कॉमेडियन कुणाल कामरा यांच्यावर खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कामरा याला खार पोलिसांनी दोन समन्स पाठवून, आज 11 वाजता पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगितले आहे.
कुणाल कामरा हा आज खार पोलीस ठाण्यात हजर राहून आपला जवाब देईल की आपल्या वकीलमार्फत पोलिसांना त्यांचे म्हणणे मांडेल हे अद्याप स्पष्ट नाही.
खोटा इतिहास जनतेसमोर ठेवला जात आहे. संघाने गुलामीच्या बेड्या तोडल्या हा शोध मोदींनी कुठून लावला ? भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात, गुलामीच्या बेड्या तोडण्यात संघ कुठेच नव्हता – संजय राऊतांची मोदींवर टीका
बीडमधील सायबर विभागातील निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड फिल्म प्रोड्यूसर होता का? असा दावा केला आहे. याबाबतचे काही फोटोज रणजीत कासले यांनी सोशल माध्यमावर वायरल केले आहेत. यात बीकेसीमधील प्रोडक्शन ऑफिसचे फोटो त्याबरोबरच आय कार्डचा फोटो व्हायरल करण्यात आला आहे. इंडियन मोशन पिक्चर प्रोडूसर असोसिएशनचा वाल्मीक कराड अजीवन सभासद होता. रंजीत कासले यांनी वाल्मीक कराड बाबत अनेक धक्कादायक बाबी समोर आणल्या आहेत.
रमजान ईद निमित्ताने धुळे शहरातील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांकडून सामूहिक नमाज पठण. पांजरा नदी किनारी असलेल्या अंजनशहा बाबा दर्गाच्या परिसरात नमाज पठण. हजारो मुस्लिम बांधवांची नमाज पठनासाठी गर्दी. नमाज पठण झाल्यानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना दिल्या शुभेच्छा. ईद निमित्ताने विविध ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त.
“निवडणुकीच्या वेळेला त्यांच्या घोषणापत्रात लाडकी बहीण, शेतकरी कर्जमाफी आणि इतर काही आश्वासने दिली होती. मात्र बजेटमध्ये महिलांच्या लाडक्या बहिणी योजनेसाठी वाढीव पैसे नाहीत, शेतकऱ्यांविषयी तर काहीच लिहिले नाही. बजेटमध्ये काही दिले नाही, मात्र जखमेवर मीठ लावायचं काम अजित पवार करत आहेत” अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
ईदउलफित्र अर्थात रमजान ईद मालेगावात मोठ्या उत्साहात साजरी. लाखो मुस्लिम बांधवांकडून सामूहिक नमाज पठण. मालेगाव ईदगाह मैदानात लाखो मुस्लिम बांधवांकडून सामूहिक नमाज अदा. मुस्लिम बांधवांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. आमदार मुफ्ती इस्माईल यांनी ईदगाह मैदानात सामूहिक नमाज पठण केले. मालेगावात 14 ठिकाणी नमाज पठण करण्यात आलं, तर 40 पेक्षा जास्त CCTV कॅमेऱ्याद्वारे संपूर्ण लक्ष ठेवण्यात आले असून मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
जिल्ह्यातील शेतकरी कर्ज कसे फेडणार शेतकऱ्यांचा राज्य सरकारला सवाल… महायुतीने कर्जमाफीचे आश्वासन दिले त्यांनी कर्जमाफी करणे गरजेचे… सरकारने कर्जमाफीची घोषणा केली नसती तर शेतकऱ्यांनी आतापर्यंत जमवाजमा करून कर्ज भरले असते…
देवरी येथील मां धुकेश्वरी मंदिरात कलश स्थापना… 157 तुपाच्या तर 297 तेलाच्या ज्योती प्रज्वलित करण्यात आल्या… नऊ दिवस मोठ्या भक्ती भावाने नागरिक हजेरी लावतात… ज्योती कलश विसर्जनाच्या दिवशी मंदिरातर्फे सर्व महिलांना साड्यांचे वाटप….
सोशल मीडिया नेटवर्किंग साइट्सवर वॅच… समाजात तेढ निर्माण करणारे मेसेज टाकल्यावर होणार कारवाई… शांतता कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्या नेटिझन्सवर सायबर पोलिसांचे लक्ष… सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सायबर पोलिसांचे पेट्रोलिंग… दोन गटात अथवा समजत तेढ निर्माण करणाऱ्यांवर पोलिसांकडून कठोर कारवाईचा इशारा…
चौघांकडून वाहन चालकाला शिवीगाळ मारहाण करत दगडफेक केल्याची घडली घटना. नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील घटना इंदिरा नगर पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे सुरू होते. कोयत्याने हल्ला करत शिवीगाळ व मारहाण केल्याचा तक्रारीत उल्लेख… घटनेनंतर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल