
अंबरनाथ पश्चिमेच्या नवीन भेंडीपाडा परिसरात पाऊस सुरू असताना लघवी करायला गेलेल्या तरूणाला नाल्यात असलेल्या वीज प्रवाहाचा झटका लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास घडली. यामध्ये विघ्नेश कचरे या 16 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला. जालना शहरात जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे एका कारवर निलगिरीचे मोठे झाड पडल्याची घटना समोर आली. सुदैवाने कार मधील बसलेले प्रवासी थोडक्यात बचावले आहेत. 1 ते 18 मे दरम्यान पश्चिम विदर्भात तब्बल 276 गावात अवकाळी पावसाचा कहर. सात जणांचा आतापर्यंत मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. पावसामुळे संत्रा, कांदा, पपई, केळी ज्वारी ,भुईमूग सह आदी पिकांचे मोठे नुकसान झालं आहे. पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यात पावसाचा मोठा फटका. यासह राज्यातल्या, देशभरातल्या सामाजिक, राजकीय, क्रीडा व इतर विषयातील महत्वाच्या बातम्या व अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.
इगतपुरीतील मुंढेगावात कंपनीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. मुंढेगाव येथील जिंदाल कंपनीत लागलेल्या आगीने रौद्र रूप धरण केलं आहे. दुपारी आग काहीशी आटोक्यात आली होती. मात्र अर्ध्या तासापूर्वी आगीने पुन्हा रौद्र रूप धारण केलं आहे. आग पसरायला सुरुवात झालीय. त्यामुळे खबरदारी म्हणून परिसर खाली करण्यात येत आहे.
चंद्रपुरकरांना अवकाळी पावसामुळे उकाड्यातून दिलासा मिळाला आहे. मात्र या अवकाळीमुळे शहरातील वाहतूक ठप्प झाली आहे. शहरात आज अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचंड उकाड्यामुळे त्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.मात्र या अचानक कोसळलेल्या सरींमुळे वाहतुकीवर परिणाम झाला. तर काही भागांमध्ये विजांचा कडकडाटसह पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. हवामान विभागाने पुढील काही दिवस हलक्या सरी पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये लष्करी शाळेच्या बसवर झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात पाच मुलांचा मृत्यू झाला आहे. तर 38 लोक जखमी झाले आहेत.
अमेरिकेने पुन्हा एकदा आपली अणुशक्ती दाखवून दिली आहे. अमेरिकेने बुधवारी नि:शस्त्र मिनिटमन-३ क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. ही यशस्वी चाचणी कॅलिफोर्नियातील वँडेनबर्ग स्पेस फोर्स बेसवरून करण्यात आली. या चाचणीचा उद्देश अमेरिकेच्या अण्वस्त्रांची सुरक्षितता, विश्वासार्हता आणि परिणामकारकता दाखवणे हा होता. ही चाचणी अमेरिकेच्या नियमित उपक्रमांचा एक भाग आहे. याआधीही अमेरिकेत या क्षेपणास्त्राच्या अनेक यशस्वी चाचण्या घेण्यात आल्या आहेत.
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा 24 मे रोजी केली जाईल. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी निवृत्ती घेतल्यानंतर संघात कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता आहे. तसेच कर्णधारपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबाबतही उत्सुकता ताणली गेली आहे.
छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनी नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत 26 नक्षलवादी ठार झाल्याची पुष्टी केली आहे. तथापि, या चकमकीत एक सैनिक शहीद झाला तर एक सैनिक जखमी झाला.
फसवणुकीच्या प्रकरणात माजी प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर यांना सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
ठाण्यातील शिवसेना कार्यकर्त्यावर चॉपरने हल्ला झाल्याची घटना घडली आहे. पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या हल्ल्यात माझ्या मुलाचे नाव गोवण्याचा प्रयत्न केल्याचे शिवसेनेचे माजी नगरसेवक सुधीर कोकाटे कोकाटे यांनी म्हटले आहे.
सांगलीतील विटा तालुक्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला आहे. हिमाचल प्रदेशहून सांगलीत आलेल्या एका व्यक्तीची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. ५५ वर्षीय या वृद्धास वर सांगलीतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे.
मानसन्मान मिळाला तर महाविकास आघाडी म्हणून लढू अन्यथा स्वतंत्र लढू असे वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केले आहे.
येरवडा, पुणे स्टेशन, भोसरी भागात बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा फोन आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. धमकीच्या फोननंतर पोलिसांकडून मोठी शोधमोहीम सुरु करण्यात आली आहे. रेल्वे पोलीस आणि पुणे पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे.
पाकमधील आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. तसेच तेथील आंदोलक सरकारच्या नियंत्रणाबाहेर गेले आहेत. तसेच आंदोलनादरम्यान एका आंदोलकाचा मृत्यू झाला त्यामुळे आंदोलक अजून आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले आहेत. तसेच वरीष्ठ अधिकाऱ्यांसोबत मोठ्या संख्येनं पोलीस जखमी झाले आहेत.
पाकमधील सिंधमध्ये गृहमंत्री झिया लंजार यांचं घर पेटवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पाकमध्ये मंत्री असुरक्षित असल्याचं चित्र दिसत आहे. एवढंच नाही तर पाकिस्तानमध्ये बंदुका घेऊन आंदोलक रस्त्यांवर उतरत आहेत आणि गोळीबार करतानाचे भयानक चित्र दिसत आहे.
गेल्या काही दिवसांपासून शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करत आहेत. भारत पाक अघोषित युद्धात चांगले काम केल्याचे सर्टिफिकेटही शरद पवारांनी पंतप्रधान मोदींना दिले आहे. पवार आता भाजपामय होत आहेत, असे दिसत आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
दादरच्या इंदु मिल येथील आंतरराष्ट्रीय आंबेडकर स्मारकाच्या कामाची थोड्याच वेळात विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे पाहणी करणार आहेत. इंदु मिल, दादर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या भव्य स्मारक उभारण्यात येत आहे.
सोलापुरात पावसाळ्यापूर्वीची नालेसफाईची कामे अद्याप रखडलेली आहेत. सोलापुरातील महत्वाच्या नाल्याची सफाई पूर्णपणे झाली नाही. त्यामुळे अवंती नगर, वसंत विहार, गणेश नगर भागातील घरात पाणी जाण्याची शक्यता आहे. मागील अनेक वर्षांपासून नालेसफाई व्यवस्थित न झाल्याने लोकांना पुराचा त्रास सहन करावा लागत आहे. नगरसेवक नसल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ग्राउंडला उतरून पाहणी करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
मुसळधार पावसामुळे पुण्यातील काही भागात वाहतूक खोळंबा झाल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अवकाळी पावसाने पुण्याला दणका दिल्यानंतर काही भागात वाहतूक खोळंबल्याचा दावा या व्हिडिओत करण्यात येत आहे.
नाशिक मुंबई महामार्गावरील जिंदाल कंपनीत लागलेली आग 9 तासानांटरही आटोक्यात नाही. 15 अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल आहेत. आग विझविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. कुठल्याही प्रकारची जीवितहानी नाही. सुरक्षिततेचा उपाय म्हणून कच्चा माल घेऊन येणारी वाहने बाहेरच उभी केली आहेत.
भाजपाची चूक नेहमीच लोकांसाठी जीवघेणी ठरते. कोरोनाची ती लसही अयशस्वी ठरली आहे. ज्यांचे प्रमाणपत्र मोठ्या संख्येने वाटले गेले होते. त्यामुळे आता सतर्क राहण्याची गरज असल्याचे आवाहन समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी केले आहे.
पुणे- खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचं पार्थिव आयुका इथं अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार अंत्यदर्शनासाठी उपस्थित राहणार आहेत. थोड्याच वेळात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अंत्यदर्शनासाठी पोहोचतील.
हवामान विभागाने मान्सूनची आनंदवार्ता दिली आहे. अवकाळी पावसाने दाणादाण उडवलेली असतानाच आता मान्सून अवघ्या चार दिवसावर येऊन ठेपल्याची खुशखबर समोर आली आहे. 25 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होत आहे.
पूजा खेडकर प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. २ मे रोजी सकाळी साडेदहा वाजता पूजा खेडकरला दिल्ली क्राइम ब्रांच समोर हजर राहण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार पूजा खेडकर हिची पाच तास चौकशी झाल्यानंतर आज सुनावणी आहे.
खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज शिष्टमंडळ रवाना होणार आहे. श्रीकांत शिंदे यांना शुभेच्छा देण्यासाठी युवा सेनेकडून पोस्टर्स लावण्यात आले आहेत. दिल्लीतल्या घराबाहेर युवा सेनेचे पोस्टर लावण्यात आले आहे. महाराष्ट्रातील तीन खासदारांचा शिष्टमंडळांमध्ये समावेश आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे खासदार मिलिंद देवरा यांचाही समावेश आहे.
पुणे- बाणेर टेकडीवर फिरायला आलेल्या कोरियातील अभियंता तरुणाला चोरांनी लुटल्याची घटना घडली आहे. चोरांनी अभियंत्याला धमकावून त्याच्याकडील महागडा मोबाइल संच हिसकावून नेला. याप्रकरणी बाणेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तक्रारदार तळेगाव दाभाडे भागातील एका वाहननिर्मिती करणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपनीत अभियंता आहेत.
ऑपरेशन सिंदूर’वरील पोस्टमुळे अटक झालेल्या प्रा. अली खान महमूदाबादला २७ मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अशोका विद्यापीठाचे सहयोगी प्राध्यापक अली खान महमूदाबादने ऑपरेशन सिंदूर या विषयावर सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट केल्याने अटक करण्यात आली होती. त्यांना मंगळवारी सोनीपत न्यायालयाने २७ मेपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिलाय.
जळगाव जिल्ह्यात १ ते २० मे दरम्यान ४१.९ मिमी. पावसाची नोंद झाली आहे. पारोळा, भडगाव, भुसावळ आणि एरंडोल या चार तालुक्यात आतापर्यंत ५० मिमी. वर सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. यावल, रावेर, चोपडा, मुक्ताईनगर तालुक्यात पाऊस कमी झाला असता तरी मात्र वादळामुळे केळी पिकाचे प्रचंड नुकसान झाल्याचे समोर आले आहे.
कर्जत तालुक्यातील आंत्रट नीड गावात विज कोसळून ट्रान्सफॉर्मर जळाल्यानंतर तब्बल 17 तास उलटूनही वीजपुरवठा पूर्ववत झालेला नाही. सायंकाळी सुटलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत असताना वीज कडाडली आणि साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. वीज पडून झालेल्या घटनेनंतर संपूर्ण गाव अंधारात असून ग्रामस्थ त्रासले आहेत.
राजधानी दिल्लीत उष्णतेची झळ कायम असून रियल फील तापमान 50 अंशांवर पोहोचले.
काल सफदरजंग मध्ये 41.6 तापमानाची नोंद झाली मात्र जास्त आर्द्रतेमुळे रियल फील तापमान 50 अंशावर पोहोचले होते.
सोमवारी हीट इंडेक्स 48.5 तर रविवारी 43.6 इतका होता. उच्च आर्द्रता आणि वाढतं तापमान यामुळे उष्णतेसंबंधित आजारांचा धोका वाढण्याची शक्यता आहे. उष्माघाताच्या धोक्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केलं आहे.
कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसरातील पाणी पुरवठा गुरूवार, २२ मे दुपार ते शुक्रवार, २३ मे दुपारपर्यंत २४ तासांसाठी बंद राहणार आहे.
तसेच रुपादेवी पाडा, किसन नगर क्र. २, नेहरू नगर, कोलशेत खालचा गाव येथेही पाणी पुरवठा बंद राहील. एमआयडीसीच्या जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रात आवश्यक देखभाल दुरुस्तीचे काम होणार आहे.
भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष ॲड. आदित्य माने यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यवतमाळच्या पुसद येथे ही धक्कादायक घटना घडली आहे.
कोर्टात माझ्या विरोधात केस का घेतली असा सवाल विचारत, आरोपी आशिष भानुप्रकाश कदम, भूषण मालोदे यांनी माने यांच्या अंगावर कार चढवली.
पुणे शहरासह परिसराला जोरदार पावसाने झोडपलं… मान्यसूनपूर्व पुण्यात अनेक भागात रस्ते जलयम झाले आहेत. पुण्यात अनेक सोसायटी आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना… पुण्याक जोरादार वाऱ्यामुळे 3 ठिकाणी होर्डिंग कोसळल्याची घटना… सणसवाडीमध्ये होर्डिंग कोसळल्यामुळे 5 ते 6 दुचाकींचे नुकसान…
हाफिजचा जवळचा साथीदार आमिर हमजा याच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. तो आता रुग्णालयात शेवटच्या घटका मोजतोय… गेल्या 3 महिन्यात 3 मोठ्या दहशतवाद्यांचा अज्ञातांकडून खात्मा…
अनेक ठिकाणी पाणी भरल्याच्या आणि स्टेशनवर पाणी गळतीच्या घटना समोर… सोशल मीडियावर मुंबईकरांच्या संयमाचाही बांध सुटला , पावसामुळे पोलखोल करणारे अनेक व्हिडीयो व्हायरल
भाऊचा धक्का सागरी मार्गावरील प्रवास 26 मे रोजीपासून वाढणार आहे. ‘मोरा – भाऊचा धक्का’ सागरी प्रवास 25 रुपयांनी महागणार… सागरी प्रवास 80 रुपयांवरुन 104 रुपयांपर्यंत महागणार…
राज्य मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. आता विद्यार्थ्यांना परीक्षेच्या गुणपत्रिकांचे वाटप २६ मे रोजी करण्यात येणार आहे. राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. परीक्षेच्या गुणपत्रिका आणि गुण दर्शवणारे अभिलेखे यांचे वाटप सर्व शाळांना २६ मे रोजी सकाळी ११ वाजता करण्यात येणार आहे. त्याच दिवशी शाळांकडून दुपारी ३ वाजता विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वाटप करण्यात येणार आहे.