Maharashtra Breaking News LIVE :पंतप्रधानांच्या भेटीनंतर शिंदेंची दिल्लीत पत्रकार परिषद

Maharashtra Political News LIVE in Marathi : देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News LIVE :पंतप्रधानांच्या भेटीनंतर शिंदेंची दिल्लीत पत्रकार परिषद
| Edited By: | Updated on: Sep 14, 2025 | 3:49 PM

कोल्हापूरची हत्तीणी महादेवी हिला वनतारामध्ये नेण्यात आल्याने मोठा वाद निर्माण झालाय. कोल्हापूरकर रस्त्यावर उतरले असून हत्तीणीला परत आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्याबद्दलची एक बैठकही पार पडलीये. दुसरीकडे कोर्टाच्या आदेशानंतर कबूर खाने बंद करण्यात आली. मात्र, यानंतर जैन समाज आक्रमक झाला असून आज आंदोलन केले जाणार आहे. यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, महाराष्ट्र, क्रिकेट, मनोरंजन, सामाजिक , राजकारण अशा विषयातील महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 06 Aug 2025 07:42 PM (IST)

    भंडारा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी

    भंडारा जिल्ह्यात सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. दरम्यान मोहाडी तालुक्यातील भोसा टाकळी व वरठी परिसरात या वादळी वाऱ्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विद्युत खांबांसह ठिकठिकाणी लहान मोठी झाड जमीन दोस्त झाली. तर कारले, दोडके, चवढी च्या बागांना याचा मोठा फटका बसला. या परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पंचनामे करून नुकसान भरपाई ची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

  • 06 Aug 2025 07:30 PM (IST)

    तुळजापूर: तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यातील दर्शन 20 ऑगस्टपर्यंत बंद

    तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यातील दर्शन 20 ऑगस्टपर्यंत बंद राहणार आहे. संवर्धनाचे काम अपूर्ण राहिल्याने सुरळीत दर्शन सुरू होऊ शकत नाही अशी माहिती मंदिर संस्थानाने दिली आहे. देवीचे मुखदर्शन, सिंहासन पूजा, अभिषेक पूजा नियमित सुरू राहणार आहे.

  • 06 Aug 2025 07:15 PM (IST)

    नवी मुंबई: मद्यधुंद पोलीस कर्मचाऱ्याची दुचाकीला धडक

    नवी मुंबईच्या ऐरोळी येथे मद्यधुंद पोलीस कर्मचाऱ्याने दुचाकीला धडक दिल्याती घटना घडली आहे. यामध्ये कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. मात्र पोलीस कर्मचारीच अशा प्रकारे मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

  • 06 Aug 2025 06:47 PM (IST)

    पंतप्रधानांच्या भेटीनंतर शिंदेंची दिल्लीत पत्रकार परिषद

    दिल्लीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पंतप्रधान मोदींसोबत अर्धा तास स्वतंत्र्य बैठक झाली. या बैठकित राजकीय चर्चा झाल्याचं म्हटलं जात आहे. तसेच सर्व खासदारांसह अमित शाहांना भेटलो असंही एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. तसेच या भेटीनंतर आता शिंदे दिल्लीत पत्रकार परिषद घेत आहेत.

     

  • 06 Aug 2025 06:30 PM (IST)

    आयुक्तांनी माफी मागावी; मनसेचं पुणे पालिका आयुक्तालयाबाहेर आंदोलन, पालिकेत घुसण्याचा प्रयत्न

    पुणे पालिकाआयुक्तांनी मनसे नेत्यांना धमकी दिल्याचा आरोप करण्यात आलं आहे. त्याचाच विरोध करण्यासाठी मनसे नेत्यांनी पालिका आयुक्तालयाबाहेर आंदोलन केलं आहे.तसेच आयुक्तांनी माफी मागावी अशी मागणी मनसे आंदोलकांनी केली आहे. जोपर्यंत आयुक्त माफी मागणार नाही तोपर्यंत मागे हटणारी नाही असं त्यांनी म्हटलं आहे.

  • 06 Aug 2025 06:17 PM (IST)

    मनसेचं पुणे पालिका आयुक्तालयाबाहेर आंदोलन, आयुक्तांनी मनसे नेत्यांना धमकी दिल्याचा आरोप

    पुणे पालिका आयुक्तांनी मनसे नेत्यांना धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. आणि त्याचाच विरोध करण्यासाठी मनसे नेत्यांनी पालिका आयुक्तालयाबाहेर आंदोलन केलं आहे.

  • 06 Aug 2025 06:05 PM (IST)

    एसटी महामंडळाच्या पालघर विभागाच्या गलथान कारभाराचा प्रवाशांसह पोलिसांना फटका

    एसटी महामंडळाच्या पालघर विभागाच्या गलथान कारभाराचा प्रवाशांसह पोलिसांनाही फटका बसला आहे. बोईसर रेल्वे स्थानकाजवळच गर्दीच्या ठिकाणी अचानक बस बंद पडली. त्यामुळे पोलिसांना बंद बस धक्का मारून ट्राफिकमधून बाहेर काढावी लागली. पोलिसांवर बोईसर शहरात मध्यभागी बंद पडलेल्या एसटी बसला धक्का मारण्याची वेळ आली. पालघर जिल्ह्यात अनेक आगारांमध्ये आजही नादुरुस्त बस प्रवाशांच्या सेवेत आहेत. त्यामुळे बस नादुरुस्त होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

  • 06 Aug 2025 05:50 PM (IST)

    मनसेचं पुणे पालिका आयुक्तालयाबाहेर आंदोलन, कारण काय?

    मनसेकडून पुणे पालिका आयुक्तालयाबाहेर आंदोलन केलं जात आहे. पुणे पालिका आयुक्तांनी मनसे नेते किशोर शिंदे यांना धमकी दिल्याचा आरोप केला आहे. या धमकीच्या निषेधार्थ मनसेकडून पालिका आयुक्तालयाबाहेर आंदोलन केलं जात आहे.

  • 06 Aug 2025 05:24 PM (IST)

    नंदीग्राम एक्सप्रेससमोर तरुणाने स्वत:ला संपवलं

    नांदेडमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. नंदीग्राम एक्सप्रेस समोर उडी घेत तरुणाने स्वत:ला संपवलं आहे. हिमायतनगर रेल्वे स्टेशनवर गाडी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. गणेश पांडुरंग लोलेपवाड असं रेल्वे खाली आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. मृतदेह रेल्वे इंजिनाला लटकून हिमायतनगर पर्यंत पोहोचला. जवळपास तीन ते चार किलोमीटर मृतदेह रेल्वे इंजिनाला लटकून राहिल्याची प्राथमिक माहिती आहे.

  • 06 Aug 2025 05:16 PM (IST)

    उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार बीडमध्ये दाखल

    उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री बीडमध्ये दाखल झाले आहेत. दादा छत्रपती संभाजीनगरवरून कारने बीडमध्ये पोहचले. दादा बीडमध्ये शासकीय कामांचा आढावा घेणार आहेत. बीड जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. बीड जिल्ह्यातील विविध पतसंस्थांमधील ठेवीदारांच्या ठेवी परत करण्याबाबत आढावा बैठक होणार आहे.बीड जिल्हा विद्युत वितरण नियंत्रण समितीची बैठकही पार पडणार आहे.

  • 06 Aug 2025 04:46 PM (IST)

    उत्तराखंड: सीएम धामी यांनी धारालीमधील नुकसानीचा आढावा घेतला

    उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी काल ढगफुटी आणि भूस्खलनामुळे घरे आणि इतर इमारतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या धाराली येथील घटनास्थळी पोहोचले. भारतीय लष्कर, आयटीबीपी, एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि इतर एजन्सींकडून शोध आणि बचाव कार्य सुरू आहे.

  • 06 Aug 2025 04:32 PM (IST)

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर

    शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुटुंबासह दिल्ली दौऱ्यावर आहे. काही तासांपूर्वी त्यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भट घेतली. आता ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला जाणार आहेत.  थोड्याच वेळात शिंदे कुटुंब पंतप्रधानांची भेट घेणार आहेत.

     

  • 06 Aug 2025 04:19 PM (IST)

    राज ठाकरे यांच्या भेटीनंतर बच्चू कडू प्रविण दरेकर यांच्या भेटीसाठी दाखल

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीनंतर बच्चू कडू प्रविण दरेकर यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहे. भाजपा आमदार प्रविण दरेकर यांच्यासोबत ते चर्चा करणार आहेत. शेतकऱ्यांविषयी ही भेट आहे.

  • 06 Aug 2025 04:05 PM (IST)

    वनताराच्या अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्री फडणवीसांची चर्चा

    कोल्हापूरकरांनी महादेवी माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी कंबर कसली आहे. महादेवी हत्तीणीला कोर्टाने दिलेल्या आदेशाप्रमाणे स्थलांतरित केलं असं वनताराकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. दुसरीकडे, वनताराच्या अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्री फडणवीस यांची चर्चा झाली आहे.

  • 06 Aug 2025 03:51 PM (IST)

    सोलापुरातून उत्तराखंडला गेलेले चार ही तरुण सुखरूप

    सोलापुरातून उत्तराखंडला गेलेले चार ही तरुण सुखरूप असून चौघेही तरुण बेस कॅम्पमध्ये सुखरूप असल्याची माहिती आली आहे. विठ्ठल पुजारी, समर्थ दसरे, धनराज बगले, मल्हारी धोटे हे चौघे सोलापुरातील तरुण उत्तराखंड गेले होते.

  • 06 Aug 2025 03:36 PM (IST)

    खालिद का ‘शिवाजी’ चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी,कार्यकर्ते कोर्टात

    खालिद का ‘शिवाजी’ चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करण्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले.

  • 06 Aug 2025 03:13 PM (IST)

    कोथरूड पोलिसांविरोधात महिला न्यायालयात जाणार

    छत्रपती संभाजीनगर आणि पुणे पोलिसांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे, कोथरूड पोलिसांवर अट्रॉसिटी आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल व्हावा म्हणून पीडित महिला न्यायालयात धाव घेणार आहेत.

  • 06 Aug 2025 02:58 PM (IST)

    कोथरूड मुलींना मारहाण प्रकरणाचा अहवाल आज पुणे पोलीस आयुक्तांना करणार सादर

    कोथरूड मुलींना मारहाण प्रकरणाचा अहवाल आज पुणे पोलीस आयुक्तांना सादर करणार आहेत.

    पोलिसांकडून याप्रकरणात हलगर्जीपणा किंवा बेकायदेशीर वर्तन झालेय का? याची चौकशी Acp दर्जाच्या अधिकाऱ्याकडून करण्यात आली  असून, यामध्ये या प्रकरणात पोलिसांनी कोणतेही बेकायदेशीर कृत्य केलेले नसून कसल्याही प्रकारचा हलगर्जीपणा झाल्या नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आलं.

    मिसिंगच्या तक्रारीचा तपास पूर्णपणे कायदेशीर केला असल्याचा अहवाल एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून तयार करण्यात आला आहे.

  • 06 Aug 2025 02:45 PM (IST)

    भास्कर जाधव यांनी रामदास कदमांवर केली टीका

    गुहागर – रामदास कदम नाही, बाब नाथ चम चम अशी टीका भास्कर जाधव यांनी केली.

    बाहेर नुसती डरकाळी फोडतो वाघ,  तो वाघ कसला बिबटया आहे, असे ते म्हणाले.

  • 06 Aug 2025 02:39 PM (IST)

    वनतारा प्रशासनाने मागितली कोल्हापूरकरांची माफी

    वनतारा प्रशासनाने कोल्हापूरकरांची माफी मागितली आहे. कोल्हापूरकर आणि जैन धर्मींयांच्या भावना दुखावण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता. महादेवी हत्तीणीला आम्ही कोर्टाच्या आदेशाप्रमाणे स्थलांतरित केलं होतं.

    कोर्टाने आदेश दिल्यास आणि मठाने सहमती दिल्यास माधुरीसाठी नांदणी परिसरात पुनर्वसन केंद्र सुरू करू, प्रसिद्धीपत्रकातून वनताराने ही माहिती दिली आहे.

  • 06 Aug 2025 02:33 PM (IST)

    उत्तराखंडमधील ढगफुटी; महाराष्ट्रातील 51 पर्यटक सुरक्षित

    उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरात मुसळधार पाऊस व ढगफुटी झाली. या घटनेमुळे खीरगंगा नदीला मोठा पूर आला व अनेक घरांचे नुकसान झाले आहे. दरम्यान उत्तराखंडमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक उत्तरकाशीमध्ये अडकले होते. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील 11 व इतर जिल्ह्यांतील 40 अशा 51 पर्यटकांचा समावेश असून हे सर्व पर्यटक सुखरूप असल्याची माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली.

  • 06 Aug 2025 02:25 PM (IST)

    लाडकी बहिण योजनेत फसवणूक : दोषींवर सरकारची कारवाई ?

    ‘लाडकी बहीण योजना’ अंतर्गत अनधिकृत लाभ घेतल्याच्या प्रकरणात दोषींवर मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे. 15 दिवसांत सर्व जिल्हाधिकारींकडून खात्यांची माहिती मागवली असून दोषी आढळलेल्या लोकांकडून संपूर्ण रक्कम वसूल केली जाणार.

    संबंधितावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. तसेच  “सरकार फसवणूक सहन करणार नाही, कडक पावले उचलली जातील.” असा इशारा दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

  • 06 Aug 2025 02:10 PM (IST)

    नांदणी मठाच्या परिसरातच रेस्क्यू सेंटर तयार करू – मुख्यमंत्री फडणवीस

    नांदणी मठाच्या परिसरातच रेस्क्यू सेंटर तयार करू. हाय पॉवर कमिटीने जे निर्देश दिले, त्यानुसार सोयी तिथेच करू असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं.

  • 06 Aug 2025 02:03 PM (IST)

    जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राजकीय समीकरणं बदलणार ?

    जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी 75पैकी 58 जागा आरक्षित झाल्याने राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

    जळगाव महापालिकेत 20 जागा या ओबीसींसाठी तर 38 जागांवर महिलांना संधी मिळणार आहे. आरक्षणामुळे अनेक तरुण आणि नवे चेहरे राजकारणात येण्याची संधी निर्माण झाली आहे

    महानगरपालिकांच्या निवडणुका नव्या प्रभाग रचनेनुसार घेण्यासह 27टक्के ओबीसी आरक्षण लागू राहणार आहे.. विशेषतः महिलांना 38जागा मिळाल्याने त्यांनाही राजकीय प्रवाहात येण्याची मोठी संधी आहे.

    महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी एकूण 58जागा आरक्षित झाल्याने राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

  • 06 Aug 2025 01:00 PM (IST)

    अजितदादांच्या माजी आमदाराविरोधात भाजप आक्रमक

    अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या माजी आमदार विजय भांबळे यांच्यावर भाजप आक्रमक. भांबळे यांच्या पुतण्याकडून फेक अकाउंटद्वारे मंत्री मेघना बोर्डीकर यांच्यावर अश्लील टीका करण्याचा आरोप. भांबळे यांच्या पुतण्याला पोलिसांनी मुंबई येथून अटक केल्याची माहिती. भाजपकडून जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट.

  • 06 Aug 2025 12:42 PM (IST)

    नांदेडचे 11 पर्यटक उत्तरकाशी येथील खराडी गावात सुरक्षित

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संपर्क कार्यालयाने साधला पर्यटकांशी संवाद. नांदेड जिल्हा प्रशासन 11 प्रवाशांच्या संपर्कात. काल विभक्त झालेले पर्यटक आज आले एकत्र. कोणी काळजी करू नये आम्ही सुखरूप आहोत सचिन पत्तेवार यांची माहिती.

  • 06 Aug 2025 12:28 PM (IST)

    पुण्यातील नवले ब्रीजजवळ पुन्हा अपघात

    कात्रजकडून मुंबईला जाणाऱ्या भरधाव ट्रकचे ब्रेक निकामी होऊन चारचाकी वाहनांना जोरदार धडक. ट्रक ड्रायव्हर दारूच्या नशेत असल्याची माहिती समोर. अपघातात चारचाकी गाड्यांचे नुकसान. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही.

  • 06 Aug 2025 12:14 PM (IST)

    हृदयविकाराच्या झटक्याने शाळेत जाणाऱ्या एका विद्यार्थिनीचा मृत्यू

    हृदयविकाराच्या झटक्याने शाळेत जाणाऱ्या एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. नाशिक शहरातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इयत्ता सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीसोबत ही दुर्देवी घटना घडली. श्रेया किरण कापडी असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. शाळेच्या गेटमधून आत प्रवेश करत असताना तिला चक्कर आली.

  • 06 Aug 2025 12:02 PM (IST)

    वनतारा व्यवस्थापनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांची चर्चा

    वनतारा व्यवस्थापनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची चर्चा झाली. महादेवी हत्तीण पुन्हा सुखरूप नांदणी मठाकडे परत देण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं जी याचिका करण्याचं ठरवलंय, त्यात सहभागी होण्याचा निर्णय वनतारानं घेतला आहे. आम्ही केवळ सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं पालन केलंय, असं वनताराच्या सीईंओंनी सांगितल्याची माहिती फडणवीसांनी दिली.

  • 06 Aug 2025 11:45 AM (IST)

    मुंबईकरांच्या आरोग्याचाही विचार केला पाहिजे- लोढा

    मुंबईकरांच्या आरोग्याचाही विचार केला पाहिजे. कोणीही कायदा हातात घेऊ नका. दादरमधील आंदोलन चुकीचं, अशी प्रतिक्रिया मंगलप्रभात लोढा यांनी दिली आहे.

  • 06 Aug 2025 11:37 AM (IST)

    कबुतरखाना हटवण्याच्या विरोधात जैन समाज आक्रमक

    दादरमधील कबुतरखाना हटवण्याच्या विरोधात जैन समाज आक्रमक झाला आहे. मुंबईकरांनी शांतता राखावी, असं आवाहन मंगलप्रभात लोढा यांनी केलंय.

  • 06 Aug 2025 11:13 AM (IST)

    कोथरूड मुलींना मारहाणप्रकरणी मोठी अपडेट

    कोथरूड मुलींना मारहाणप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. ससून रुग्णालयाचा पीडित मुलींच्या तपासणीचा अहवाल पुणे पोलिसांना प्राप्त झाला आहे. पोलिसांनी पीडित तरुणींना मारहाण केल्याचा आरोप केला आहे. मात्र ससून रुग्णालयाच्या तपासणी अहवालात तरुणींना कोणतीही ताजी दुखापत नसल्याचं समोर आलंय.

  • 06 Aug 2025 11:06 AM (IST)

    पुण्यात ताप, सर्दी-खोकल्याचा प्रकोप; मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आजारी

    पुण्यात गेल्या काही दिवसांपासून ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी आणि थकव्याचे रुग्ण वाढले आहेत. औषध घेतल्यावरही ताप न उतरल्याने नागरिक त्रस्त आहेत. विषाणूजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढला असून, याचा सर्वाधिक फटका लहान मुलांना बसत आहे. बदलत्या हवामानामुळे इन्फ्लुएंझा, आरएसव्ही, स्वाईन फ्लू यांसारख्या व्हायरसचा प्रभाव वाढला आहे.

     

  • 06 Aug 2025 10:45 AM (IST)

    मी याचे समर्थन करत नाही, मंगल प्रभात लोढा यांची प्रतिक्रिया

    सध्या कबुतरखान्याजवळ जी काही घटना सुरु आहे, त्याचे मी समर्थन करत नाही. हे सर्व बरोबर नाही. हे कोण करतंय मला माहिती नाही, अशी मी विनंती करतो, अशी प्रतिक्रिया मंगल प्रभात लोढा यांनी दिली.

  • 06 Aug 2025 10:38 AM (IST)

    दादरमधील कबुतरखान्याजवळ मोठा राडा, परिसरात जोरदार घोषणाबाजी

    दादरमधील कबुतरखान्याजवळ मोठा राडा झाला आहे. सध्या जैन समाज आणि पोलिसांमध्ये झटापट पाहायला मिळत आहे. सध्या या परिसरात मोठ्या प्रमाणात जैन समाजातील नागरिक समजले आहेत. सध्या कबुतरखाना परिसरात जोरदार घोषणाबाजी पाहायला मिळत आहे.

  • 06 Aug 2025 10:28 AM (IST)

    जळगावातील चाळीसगावात आरोग्य व्यवस्थेचा निष्काळजीपणा, वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याने महिलेचा मृत्यू

    जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावात आरोग्य व्यवस्थेचा निष्काळजीपणा समोर आला आहे. ब्राह्मण शेवगे गावात सर्पदंश झालेल्या एक महिला उर्मिला देसले यांचा वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. गेल्या तीन महिन्यांपासून शिरसगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका नादुरुस्त असल्याने चोपडा येथे दुरुस्तीसाठी पाठवण्यात आली होती. त्यामुळे गावात रुग्णवाहिकेची सोय नव्हती. ग्रामस्थांनी याबाबत अनेक वेळा पाठपुरावा करूनही प्रशासनाने कोणतीही ठोस कार्यवाही केली नाही, उलट उडवाउडवीची उत्तरे दिली. या प्रशासकीय दिरंगाईमुळे एका महिलेला आपला जीव गमवावा लागला, ज्यामुळे आता संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

  • 06 Aug 2025 10:20 AM (IST)

    उत्तराखंडमधील उत्तरकाशी भागातील पावसाचा जोर ओसरला

    नांदेड येथील वेगवेगळ्या ठिकाणी असलेले 11 पर्यटक आले एकत्र… नांदेड मधील सर्व पर्यटक यमुनोत्री येथे सुखरूप… जिल्हा प्रशासन पर्यटकांच्या सातत्याने संपर्कात… सचिन पत्तेवार या युवकाने पाठवले यमुनोत्री परिसरातील व्हिडिओ

  • 06 Aug 2025 10:00 AM (IST)

    महादेव मुंडे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी गोट्या गित्तेवर तब्बल 43 गंभीर गुन्हे दाखल

    बीडच्या परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणामध्ये गोट्या गित्ते हा संशयित आरोपी आहे. आरोपी गोट्या गित्तेचा पोलीस शोध घेत आहेत. मात्र त्याच गोट्या गित्तेवर जवळपास 43 गुन्हे दाखल आहेत. तर बीड पोलिसांकडून त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई देखील करण्यात आली आहे. मग या आधीच गोट्या गितेला पोलिसांनी जेरबंद का केले नाही? असा प्रश्न नागरिकांमधुन विचारला जात आहे. आरोपी गोट्या गित्तेच्या विरोधामध्ये दरोडा, दरोड्याचा प्रयत्न, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, अपहरण, खंडणी, शासकीय अधिकाऱ्यांच्या कामात अडथळा आणि इतर जवळपास 43 गुन्हे गोट्याच्या विरोधात आहेत.

  • 06 Aug 2025 09:55 AM (IST)

    नाशिक जिल्ह्यात 15 ऑगस्टपर्यंत शस्त्रबंदी आणि जमावबंदी आदेश लागू

    अपर जिल्हादंडाधिकारी रोहितकुमार राजपूत यांचा आदेश… मुंबई पोलिस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1)(3) अंतर्गत कारवाई… 1 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून ते 15 ऑगस्टच्या रात्री 12 वाजेपर्यंत आदेश प्रभावी… लग्न, आठवडे बाजार, धार्मिक मिरवणुका यांना सूट… अधिकृत परवानगी घेतलेल्या सभा, मिरवणुकांनाही सूट… पोलीस व शासकीय कर्मचाऱ्यांवर आदेशाची अट लागू होणार नाही

  • 06 Aug 2025 09:30 AM (IST)

    सोलापूर शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे महापालिकेच्या उद्यानात पाणीच पाणी

    सोलापूर महापालिकेने भुईकोट किल्ल्याच्या खंडगात उभारलेल्या हुतात्मा उद्यानात पाणीच पाणी… हुतात्मा उद्यानाला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले… विद्यार्थ्यांना पाऊस पडून शाळेला सुट्टी अपेक्षित असते मात्र पावसामुळे मुलांच्या लाडक्या उद्यानालाच आता आठवडाभर सुट्टी पडणार आहे… हुतात्मा उद्यानातील लहान मुलांच्या खेळण्याच्या ठिकाणी गुडघाभर पाणी साचले…

  • 06 Aug 2025 09:30 AM (IST)

    आरती साठेंची नेवणूक हे न्यायव्यवस्थेचं दुर्दैव – संजय राऊत

    आरती साठेंची नेवणूक हे न्यायव्यवस्थेचं दुर्दैव… देशाची न्यायव्यवस्था ताब्यात ठेवण्याचं भाजपचं कारस्थान… न्यायव्यवस्थेत भाजपचे लोक निवडले जातात हे दुर्दैव.. असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.

  • 06 Aug 2025 09:22 AM (IST)

    आरती साठेंचं नाव सरन्यायाधीशांनी वगळावं आशी विनंती – रोहित पवार

    आरती साठेंची न्यायाधीक म्हणून नियुक्ती करु नका… आरती साठे या भाजपच्या प्रवक्त्या होत्या. आमची केस अशा न्यायाधीशांकडे गेल्यास न्याय मिळेल का? आरती साठेंचं नाव सरन्यायाधीशांनी वगळावं आशी विनंती… असं वक्तव्य रोहित पवार यांनी केलं आहे.

  • 06 Aug 2025 09:14 AM (IST)

    रेल्वे स्थानकात रुळावर उभे असलेल्या जुन्या डब्याला आग

    स्थानकातील प्लॅटफॉर्म उभे असलेल्या जुन्या डब्याला आग… काही दिवसांपूर्वी मॉकड्रिल साठी ह्याच डब्याचा करण्यात आला होता वापर… आग कशाने लागली हे अस्पष्ट, कुठली हानी नाही

  • 06 Aug 2025 09:01 AM (IST)

    भोसरी एमआयडीसीमध्ये अशीच वीजचोरीची घटना उघडकीस

    गेल्या 2 वर्षांपासून ही चोरी करतण्यात येत होती, अखेर या कंपनीच्या मालकाकडून तब्बल 19 लाख 19 हजारांचा दंडही वसुल केला आहे.

  • 06 Aug 2025 08:45 AM (IST)

    नाशिक शहरातील काही भागात आज आणि उद्या पाणीबाणी

    शहरातील उंटवाडी, सिडकोत आज पाणीपुरवठा राहणार बंद. तर उद्या गुरुवारी म्हसरूळचा पाणीपुरवठा बंद राहणार

     

  • 06 Aug 2025 08:37 AM (IST)

    वाढत्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे मोठे आव्हान

    मुंबईतील वाढत्या लोकसंखेमुळे कचाऱ्याचे प्रमाणही वाढत आहे.  वाढत्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे मोठे आव्हान महापालिकेपुढे आहे. त्यातच आता मुलुंड डम्पिंग ग्राउंडवरील कचरा विल्हेवाटीसाठी नवीन डेडलाइन देण्यात आली. मुलुंड डम्पिंग ग्राउंडची क्षमता संपुष्टात आल्यामुळे २०१८ मध्ये महापालिकेने येथील कचऱ्याची विल्हेवाट लावून जमीन पुन्हा मिळवण्यासाठी प्रकल्प हाती घेतलाय.