
राज्यात सध्या जोरदार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झालीये. पुण्यात आजही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून धरणातील पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. काही भागांमध्ये ऑरेंज अलर्ट दिलाय. प्रणिती शिंदे यांच्याविरोधात भाजपा आक्रमक होताना दिसत आहे. ऑपरेशन सिंदूरबद्दल त्यांनी लोकसभेत चुकीचे विधान केल्याचा आरोप आहे. मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याबद्दल काही महत्वाच्या घडामोडी घडू शकतात. रेव्ह पार्टीवरून पुणे पोलिसांवर गंभीर आरोप एकनाथ खडसे यांनी केली आहेत. यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, महाराष्ट्र, क्रिकेट, मनोरंजन, सामाजिक , राजकारण अशा विषयातील महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.
मिरा-भाईंदरमध्ये खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू
महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांच्या निर्देशानंतर मोहिमेला वेग
महापालिकेने 4 दिवसांत 627 खड्डे बुजवले
MMRDA कडून 76 , राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून 150 खड्डे बुजवले
जायकवाडी प्रकल्प (नाथसागर जलाशय) 90.13 टक्के क्षमतेने भरला असून, पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसाच्या पाण्याची आवक व उर्ध्व भागातील धरणांमधून येणारी आवक बघता, उद्या दुपारी ठिक तीन ते साडेतीनच्या दरम्यान जायकवाडी धरणाच्या सांडव्याद्वारे गोदावरी नदी पात्रात 9432 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे, या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
हिंगोलीत भर दिवसा एकावर चाकू हल्ला
शहरातील जवाहर रोड परिसरात एकावर चाकू हल्ला
चाकू हल्ल्यात एक जण जखमी, जखमी वरती नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरू
चाकू हल्ला करणारे कोण आणि कुठल्या कारणाने केला हे अद्यापही अस्पष्ट
पोलिसांकडून तापासाला सुरुवात
तुतारी एक्सप्रेस कणकवली स्थानकावर येण्याची वेळ झालेली असतानाच तिकीट रांगेत पुढे जाण्याचा प्रयत्न करण्यामध्ये दोन तरुणांमध्ये चांगलीच हाणामारी झाली. ही घटना मंगळवारी सायंकाळी 6.30 वाजता घडली आहे.
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराड तालुक्यातील तासवडे टोलनाका परिसरात असणाऱ्या श्रावणी हॉटेल येथे कोल्हापूरहून मुंबईला एसटी थांबलेली होती. या ठिकाणी अनोळखी तीन ते चार संशयितांनी एसटीतून प्रवास करणाऱ्या कोल्हापूरमधील प्रशांत कुंडलिक शिंदे यांना मारहाण केली. तसेच त्यांच्या ताब्यातील कृष्णा कुरिअर, कासार गल्ली, कोल्हापूर येथील कुरियर गोल्ड पॅकिंग असलेला माल घेऊन पळून गेले आहेत. या बॅगमध्ये 35 हजार रुपये व सोन्याचे दागिने असलेले लहान वीस डबे ठेवलेले होते, अशी माहिती समोर आली आहे
शनिशिंगणापूर देवस्थानमध्ये 5 बनावट ऍपच्या माध्यमातून देणगीची चोरी झाल्याचा संशय आहे. 5 अनधिकृत अँप मधून 2 कर्मचाऱ्यांनी परस्पर कोट्यवधी रुपयांची देणगी लाटल्याचा संशय आहे. सध्या सायबर पोलिसांकडून 2 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू आहे.
भिवंडी ब्रेकिंग
20 तारखेला झाला होता बाईकस्वराचा अपघात आज उपचारादरम्यान मृत्यू. गावकरी आक्रमक
भिवंडी वाडा रस्त्यावरील खड्ड्याने घेतला युवकाचा बळी.
यश राजेश मोरे, वय 18, रा. कवाड, मडक्याचा पाडा याचा उपचारा दरम्यान मृत्यू.
नातेवाईक ग्रामस्थ मृतदेह रुग्णवाहिका रस्त्यात आडवी उभी करून सुरू केले रस्ता रोको आंदोलन
ठेकेदार संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
सर्वोच्च न्यायालयाने सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात दोषी पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याच्या औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला कायम ठेवलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचं परभणीत आंबेडकरी अनुयायींकडून फटाके फोडून स्वागत करण्यात आलं आहे.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर येथे फटाके फोडून जल्लोश करण्यात आला. तसेच जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या जल्लोषात सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबिय उपस्थित होते
गोंदियात गाईला वाचवण्याच्या प्रयत्नात गुराखा नाल्यात वाहून गेला आहे. आमगावजवळील बणगाव येथील गणेश नाला इथं ही घटना घडली. एनडीआरएफ टीमकडून गुराख्याला शोधण्याचं काम सुरु आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार तसेच विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडे शिंदे गटात प्रवेश करण्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर सिद्धार्थ बनसोडे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीमुळे चर्चांना उधाण आलंय. सिद्धार्थ बनसोडे राष्ट्रवादी अजित पवार गटातुन शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवरती आहेत अशीही चर्चा सुरू आहे.
अमेरिकेने भारतावर 25 टक्के कर लादला आहे. हा नवीन कर 1 ऑगस्टपासून लागू होईल.
काँग्रेस खासदार इम्रान मसूद म्हणाले, “ते (पंतप्रधान मोदी) उघडपणे का म्हणत नाहीत की डोनाल्ड ट्रम्प खोटे आहेत… त्यांच्यात ते धाडस का नाही?”
भारतीय लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आज मणिपूरच्या दौऱ्यावर आले आहेत. यादरम्यान त्यांनी आसाम रायफल्स आणि राज्यात तैनात असलेल्या लष्करी तुकड्यांच्या सुरक्षा तयारीचा आढावा घेतला आणि सैनिकांच्या धाडसाचे कौतुकही केले. लष्करप्रमुख द्विवेदी यांना मणिपूरमधील जमिनीवरील परिस्थिती आणि शांतता राखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती देण्यात आली.
वर्ल्ड चॅम्पियनशिप लीजेंड्सबद्दल सूत्रांकडून मोठी बातमी आहे. पाकिस्तान भारताविरुद्ध सेमीफायनल खेळणार नाही. भारतीय खेळाडूंनी खेळण्यास नकार दिला. सेमीफायनल सामना उद्या एजबॅस्टन येथे होणार होता.
महाड माणगाव मतदार संघातून शिंदे सेनेचे राज्य प्रवक्ते राजीव साबळे तर अलिबाग मधून 2009 ची लोकसभा लढवलेले आणि माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे सुपुत्र महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अँड.प्रवीण ठाकूर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटात प्रवेश होणार असल्याची जोरदार चर्चा आहे
परळी येथील महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे या आज त्यांच्या कुटुंबासह मराठा आंदोलन म्हणून जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आंतरवाली सराटीमध्ये दाखल झाल्या होत्या. ज्ञानेश्वरी मुंडे यांनी दुसऱ्यांदा ही भेट घेतली असून मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची देखील विचारपूस केली.
कल्याण तरुणी मारहाण प्रकरणी आरोपी गोकुळ झा याला न्यायालयाने सुनावली 14 दिवसाची न्यायालीन कोठडी सुनावणी आहे. मानपाडा पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणण्याच्या गुन्ह्यामध्ये आरोपी गोकुळ झा याला जेलमधून ताब्यात घेतले आहे.
शनी शिंगणापूर देवस्थानशी संबंधित बनावट अॅप प्रकरणात तपासाला गती आली आहे.देवस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यांत तब्बल १ कोटींहून अधिक रक्कम जमा झाल्याचे उघडकीस आले आहे. संबंधित कंपन्यांनी वेळोवेळी थोड्या-थोड्या रकमेच्या स्वरूपात कधी १ लाख तर कधी २ लाख अशा प्रकारे ही रक्कम त्यांच्या खात्यांत वळवली जाते.
ठाण्यात मनसेच्या वतीने निशिकांत दुबे यांचं व्यंगचित्र काढत बॅनर लावण्यात आले आहेत. दुबे यांना प्रत्युत्तर म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हे प्रत्यूत्तर दिले आहे.
मनसेचे पदाधिकारी स्वप्नील महिंद्रकर यांनी बॅनरच्या माध्यमातून दुबे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. बॅनरची राजकीय वर्तुळात चर्चा होताना दिसत आहे.
अनुसूचित जमाती कल्याण समितीसमोर आरोग्य सेविकेने आणि आदिवासी बांधवांनी गाऱ्हाणे मांडले आहेत. शासनाच्या अनुसूचित जमाती कल्याण समितीने गोंदियाच्या आदिवासी बहुल भागात दौरा केला. गोंदियात आरोग्य सेविकांचा 8 महिन्यापासून पगारच झालेला नाही.
चिपळूणमध्ये दोघांनी तरुणांनी वाशिष्ठी नदीत उड्या टाकल्याची घटना घडली असती. व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
यात एक तरुणी आणि तरुणाचा समावेश आहे. पाण्यात बुडणारे दोन्ही तरुण धुळे येथील असल्याची माहिती आहे. चिपळूण पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
खेवलकरांच्या वकिलांनी पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे. खेवलकर सराईत गुन्हेगार असं टायपिंग मिस्टेक असल्याचं त्यांनी सांगितलं. ब्लड सॅम्पल लवकर मागवण्याची मागणी केल्याचंही त्यांनी सांगितलं.
गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्याचा संपर्क तिसऱ्यांदा जिल्हा मुख्यालयाचा संपर्काच्या बाहेर. इंद्रावती नदीला पूर आल्यामुळे उप नदी असलेली पर्लाकोटा पुलावरून वाहत असल्यामुळे भामरागड तालुक्याची वाहतूक बंद. एक ते दीड फूट पुलावर पाणी वाहत असून भामरागड तालुक्यातील चाळीसगावाचा संपर्क जिल्हा मुख्यालयाची तुटलेला आहे.
जपानमधील अणूऊर्जा प्रकल्पाजवळ उंच लाटा. जपानमध्ये सलग त्सुनामीचे सायरन. त्सुनामीच्या भितीने फुकुशिमा अणूऊर्जा प्रकल्प बंद. भूकंपामुळे तीन देशांना त्सुनामीचा इशारा. रशियात 8.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप.
सोमनाथ सूर्यवंशी न्यायालयीन कोठडीत मृत्यू प्रकरणात आलेल्या निर्णयाचे सूर्यवंशी कुटुंबियांकडून स्वागत. आम्हाला न्याय मिळाला, जिल्हा न्यायालय उच्च न्यायालय आणि आता सर्वोच्च न्यायालयात आम्हाला न्याय मिळाला. सरकारने न्याय दिला नाही. मात्र न्यायालयाकडून आम्हाला न्याय मिळाला. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई भावूक. प्रकाश आंबेडकर माझ्यासाठी भावासारखे उभे राहिले.
महादेव मुंडेंच हे प्रकरण मी काढलेलं आहे. सर्वात आधी मी बोललो. आधी कोणी बोलत नव्हतं. तुरुंगात एक स्पेशल फोन सापडलाय. हत्या करणारे आरोपी अद्याप सापडलेले नाहीत असं सुरेश धस म्हणाले.
संजय शिरसाट यांनी नुकतंच अजित पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर मंत्री संजय शिरसाट यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजित पवारांसोबत बैठक झाली. या बैठकीला वित्त विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीवेळी अजित पवारांसोबत निधी वाटपावर चर्चा झाली, अशी माहिती संजय शिरसाट यांनी दिली.
धुळे जिल्ह्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. पांझरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यामुळे अक्कलपाडा धरणातून नदीपात्रात ४ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. आज सकाळी ९ वाजल्यापासून हा विसर्ग सुरू झाला आहे. यामुळे पांझरा नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता असल्याने, प्रशासनाने नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहर आणि तालुक्यात मान्सूनने चांगलाच जोर धरला आहे. गेल्या चार दिवसांपासून इथे सतत पाऊस सुरू आहे, ज्यामुळे शेतकरी आनंदित झाले आहेत. तालुक्यात गेल्या २४ तासांत जवळपास ११ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. ढगाळ वातावरण आणि रिमझिम पावसामुळे तापमानात घट झाली आहे. हवामान विभागानुसार, ३० जुलैपासून तापमानात एक ते दोन अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे.
आमदार निलेश राणे यांनी गणेशोत्सवासाठी शिवसेना एक्स्प्रेस या विशेष ट्रेनची घोषणा केली आहे. २५ ऑगस्ट रोजी सकाळी दादरहून सुटणाऱ्या या ट्रेनमधून कुडाळ आणि मालवण तालुक्यातील गणेशभक्तांना मोफत प्रवासाची संधी मिळणार आहे. गणेशोत्सवासाठी मुंबईहून आपल्या गावी जाणाऱ्या भाविकांसाठी ही विशेष रेल्वे सकाळी १० वाजता दादर रेल्वे स्टेशनवरून सुटेल आणि दादर ते कुडाळपर्यंत नॉनस्टॉप धावेल.
धाराशिव जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी २९ जुलै रोजी मध्यरात्री १ वाजेपासून ११ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत जमावबंदी आणि शस्त्रबंदी लागू करण्यात आली आहे. अपर जिल्हा दंडाधिकारी शोभा जाधव यांनी हा आदेश जारी केला आहे. यानुसार, पाच किंवा त्याहून अधिक व्यक्तींना पूर्वपरवानगीशिवाय एकत्र येण्यास, तसेच मोर्चे, मिरवणुका किंवा सभा घेण्यास बंदी घालण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या अहवालानुसार, श्रावण महिना, अण्णाभाऊ साठे जयंती, मराठा आरक्षणाच्या मागण्यांशी संबंधित आंदोलने, तसेच शेतकऱ्यांची आंदोलने अपेक्षित असल्याने खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
“माणिकराव कोकाटे यांना राजीनामा द्यावाच लागेल. माझ्या माहितीप्रमाणे चौकशी झाली आहे, ज्यात कोकाटे अर्धा तास रमी खेळत असल्याचं स्पष्ट झालं आहे. अजून रिपोर्ट आला नाही, मंत्री संवेदनशील पाहिजे. त्यांना माफ केल्यास सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात असल्याचं स्पष्ट होईल, अन्यथा सभागृहात पत्ते घेऊन खेळले पाहिजे, मोबाईलवर खेळायाची काय गरज आहे,” अशी टीका अंबादास दानवेंनी केली.
राज्यातील विविध संघटनांचे प्रमुख मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची आज वर्षा निवासस्थानी भेट घेणार आहेत. निवेदन आणि भेट झाली नाही तर फडणवीस यांच्या वर्षा निवास्थानाबाहेर आंदोलन करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातील मंत्री बेताल वक्तव्ये करत आहेत, त्यांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रशिक्षण द्यावं, त्यांचा राजीनामा देखील घ्यावा, अशी मागणी ते करत आहेत. आणि काही संघटना हल्ले करत आहेत, त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आलेली आहे.
सोलापूर ग्रामीण काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी सातलिंग शटगार यांची निवड झाली आहे. मागील 7 महिन्यांपासून रिक्त असलेल्या जिल्हाध्यक्षपदाची माळ अखेर सातलिंग शटगार यांच्या गळ्यात पडली आहे. यापूर्वी सातलिंग शटगार हे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख म्हणून कार्यरत होते. काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते अशी त्यांची ओळख आहे.
“प्रांजल खेवलकरांवरील खोट्या कारवाईच्या विरोधात उच्च न्यायालयात जाणार आहोत. पोलिसांनी केलेली कारवाई बनावट असून, प्रांजल खेवलकरांना अडकवण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. हे सगळं प्रकरण प्रांजल यांच्यावर ट्रॅप लावून केलं आहे,” असा आरोप खेवलकर यांचे वकील विजयसिंह ठोंबरे पाटील यांनी केला.
बीड- संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच मुख्य सूत्रधार असल्याचं निरीक्षण विशेष मकोका न्यायालयाने नोंदवलं आहे. विशेष मकोका न्यायालयाने नोंदवलेली निरीक्षणं TV9 च्या हाती लागली आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ झाली आहे. वाल्मिक कराड गुन्हेगारी टोळीचा सदस्य असून त्याच्या सांगण्यावरून संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली, असं निरीक्षण नोंदवण्यात आलंय. आरोपी वाल्मिक कराड संदर्भात डिजिटल एव्हिडन्स/फॉरेन्सिक पुरावे, अनेक साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.
श्री स्वामी समर्थांचे भक्त राज्यभरासह देशभरात वाढत असताना आता परदेशातील नागरिकांनाही पडतेय स्वामींची भुरळ… नेदरलँडचे नागरिक वटवृक्ष श्री स्वामी समर्थांच्या दरबारी लीन… परदेशी पाहुण्यांनी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतल्यानंतर अक्कलकोट अन्नछत्र मंडळात जाऊन महाप्रसादाचाही घेतला लाभ… भारतात अभ्यास दौऱ्यासाठी आलेले नेदरलँडचे जॉन ड्युईंग झाले स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक… श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्यावतीने भारतीय पद्धतीने परदेशी पाहुण्यांचे करण्यात आले स्वागत…
धुळे महापालिकेच्या शहरात वीस शाळा… विद्यार्थ्यांच्या सुरक्षेतेसाठी महापालिका शिक्षण मंडळाच्या वतीने लावण्यात येत आहेत सीसीटीव्ही कॅमेरे… प्रत्येक शाळेत विविध भागात लावले गेले आहेत सीसीटीव्ही कॅमेरे… विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी महापालिकेने लावले कॅमेरे..
15 ऑगस्ट पूर्वी नाट्यप्रयोग… येत्या गुरुवारी नाट्यगृहातील सुविधांची प्रशासनाकडून होणार ट्रायल… ठाण्यासारखे सांस्कृतिक नगरीतील मध्यवर्ती भागात असलेले नाट्यगृह दीर्घकाळ बंद असल्यामुळे सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील अनेकांना नाट्यगृहाचे उणीव भासत आहे…
कर्जत बदलापूर लोकल सेवा सुरळीत झाली आहे. वांगणी बदलापूर दरम्यान रेल्वे रुळावर गेले होते तडे… रेल्वे रुळावर तडे गेल्याने लोकल सेवा ठप्प झाली होती…. मात्र आता रेल्वे प्रशासने रेल्वे रूळ दुरुस्त करत लोकल सेवा सुरळीत केली आहे… पहिली लोकल csmt कडे रवाना झाली आहे.
गंगापूर धरण 76 टक्के भरल्याने धरणातून गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग सुरूच… गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यामुळे गोदाघाट परिसरात पुन्हा काही प्रमाणात पाण्याची पातळी वाढली… गंगापूर धरणातून आज पाण्याचा विसर्ग वाढवणार, 1235 क्युसेस पाण्याचा विसर्ग केला जाणार… पावसाने जोर धरल्यास पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता… गोदाघाट परिसरात नागरिकांना सतर्कतेचा इशारा… गंगापूरसह जिल्ह्यातील इतही वेगवेगळ्या धरणातून सुरू आहे पाण्याचा विसर्ग… तर नांदूरमध्यमेश्वर धरणातून जायकवाडीकडे 15775 क्यूसेस पाण्याचा सुरू आहे विसर्ग
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती… 1078 नवीन पदासाठी भरती… मंत्रालयातील समिती कक्षात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या बैठकीत ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बांधकामाचा आढावा घेण्यात आला…
पुण्यातील खराडीच्या स्टे बर्ड मध्ये एप्रिल, मे महिन्यात रंगली पार्टी. एप्रिल महिन्यात ६ लोकांसाठी ३ रुम झाल्या होत्या बुक. मे महिन्यात २ व्यक्तींसाठी २ रुम चे बुकिंग
वसई विरार पालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या नातेवाईकांच्या घरी सापडली एक कोटी २५ लाख रोख रक्कम
अनिलकुमार पवार यांनी नातेवाईकांच्या घरी लपवलेली रोख रक्कम जप्त
ईडीने काल १२ ठिकाणी शोधमोहीम राबवली आहे.