
सध्या महाराष्ट्रात पावसाने थैमान पाहायला मिळत आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. धुळ्यात जिल्हा रुग्णालयाचे आवार जलमय झाले आहे. तर पश्चिम विदर्भात, विशेषतः अमरावतीमध्ये, हजारो हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जालना आणि जळगाव जिल्ह्यांतही मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणी घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. ज्यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याच काळात, मतदार यादीतील चुकांवरून सुरू असलेल्या आरोपांवर निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिले आहे. प्रत्येक टप्प्यावर राजकीय पक्ष आणि मतदारांना चुका दुरुस्त करण्याची संधी दिली जाते. त्यामुळे जर या चुका योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने निदर्शनास आणून दिल्या असत्या, तर त्या वेळीच दुरुस्त केल्या गेल्या असत्या, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. आता याबद्दल निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे.
सरंपच संतोष देशमुख प्रकरणाची सोमवारी 18 ऑगस्टला बीडच्या विशेष मकोका न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. या सुनावणीकडे साऱ्या राज्याचं लक्ष लागून आहे. मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड याने जामीन अर्ज केलेला आहे तर इतर सर्व आरोपींनी दोष मुक्तीसाठी अर्ज केलेले आहेत. या दोन्ही अर्जावर सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.
तसेच वाल्मीक कराड आणि इतर आरोपींची संपत्ती जप्त करण्यात यावी, यासाठी सरकारी पक्षातर्फे करण्यात आलेल्या अर्जावर देखील उद्याच निर्णय येण्याची शक्यता आहे. या अर्जाबाबत युक्तिवाद झाल्यानंतर दोन सुनावण्या पार पडलेल्या आहेत. मात्र उद्या निर्णय येईल अशी अपेक्षा आहे.
भारतात बनलेल्या वस्तू खरेदी करा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केलं आहे. व्होकल फॉर लोकलसाठी साथ द्या. स्वदेशी वस्तू खरेदी करुन आपल्या लोकांना साथ द्या, असंही मोदींनी म्हटलं.
अमरावतीत राणा दांपत्याकडून विदर्भातील सर्वात मोठ्या दहीहंडी स्पर्धेच आयोजन करण्यात आलं आहे. यावर्षीची दहीहंडी ही ऑपरेशन सिंदूरला समर्पित करण्यात आली आहे. शिरजगाव कसबामधील शिवतांडव गोविंदा ग्रुपने राणा दांपत्यांकडून आयोजित 25 फूट वरील दहीहंडी 32. 22 सेकंदांमध्ये फोडली. या दहीहंडी स्पर्धेला महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.
एनडीएकडून उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या नावाची जेपी नड्डा यांच्याकडून घोषणा करण्यात आली आहे. जगदीप धनखड यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर उपराष्ट्रपतीपद रिक्त आहे.
23 जुलै रोजी सकाळी वाशीला कामावर जात असताना दुचाकी खड्ड्यात आदळल्याने एका तरुणाचा अपघात झाला होता. दुचाकीवरून पडल्याने रोहन शिंगरे हा तरूण ट्रकखाली आला होता. 20 दिवस उपचार सुरू असताना 15 तारखेला अखेर तरुणाचा मृत्यू झाला आहे.
पनवेलमध्ये एका बिल्डिंगच्या तिसऱ्या मजल्यावरील एका घरात आग लागली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रनं मिळवलं आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर येथे वाहतूक कोंडी झाली आहे. संगमेश्वर बसस्थानक परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा पहायला मिळत आहेत. मुंबईकडून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या आणि गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांचा खोळंबा झाला आहे.
शरद पवार राष्ट्रवादी गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतीचे दहन केले आहे. अकोल्यात आज शरद पवार गटाची मंडल यात्रा दाखल झाली असून या दरम्यान जितेंद्र आव्हाडांनी मंडल यात्रेच्या स्टेजवर ‘मनुस्मृती’ जाळली आहे. यावेळी मंडल यात्रेचे प्रमुख राजू राजापूरकर आणि माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे देखील उपस्थित होते.
परभणी जिल्ह्यातील येलदरी धरण 97 टक्के भरले
पूर्णा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू
धरणाचे दोन दरवाजे अर्धा मीटरने उघडले
पाणलोट क्षेत्रात सतत पाऊस होत असल्याने पाणीपातळीत वाढ
संगमेश्वरमध्ये पावसाचा जोर वाढला
गड नदीच्या पाणीपातळीत वाढ
नदीचं पाणी बाजारपेठेत घुसलं
पाण्यामुळे दुकानं बंद
पावसाचा जोर आणखी वाढल्यास मोठ्या नुकसानाची शक्यता
भुसावळच्या हतनूर धरणाचे 18 दरवाजे उघडले
विदर्भ आणि मध्य प्रदेशात पावसाचा जोर वाढल्याने पाणलोट क्षेत्रात
पाण्याची आवक वाढली
सकाळपासून हतनूर धरणाचा विसर्ग वाढवण्यात आला
36000 क्युसेक वेगानं तापी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग
पालघर जिल्ह्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. वसई, विरार आणि नालासोपारा परिसरात दुपारनंतर जोरदार पाऊस सुरू झाला आहे. यामुळे नालासोपारा पूर्वमधील सेंट्रल पार्क, आचोळा, तुळींज, शिर्डी नगर, विजय नगर, वसई गास, देवतलाव, सागरशेत, नवजीवन, सातिवली, तसेच विरार पश्चिममधील, विवा कॉलेज, चंदनसार येथील सकल भागांमध्ये पाणी साचलं आहे.
खेड तालुक्यात मुसळधार पाऊस
सगळीकडे मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा
मागील दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत
शासनाकडून तात्काळ पंचनामा होऊन नुकसान भरपाई मिळावी अशी
सातारा – कोरेगाव तालुक्यातील सासुर्वे गावचे सुपुत्र हवालदार प्रवीण अंकुश वायदंडे यांना अरुणाचल प्रदेशातील भारत-चीन सीमेवर कर्तव्य बजावत असताना वीरमरण आलं आहे.
निवडणूक आयोग राजकीय पक्षांमध्ये भेदभाव करत नाही, आमच्यासाठी ना कुणी सत्ताधारी ना कुणी विरोधक आहे, आमच्यासाठी सर्व पक्ष समान आहेत. गेल्या वीस वर्षांपासून सर्व पक्ष निवडणूक यादीत दुरुस्तीची मागणी करत होते. आता बिहारमध्ये नाव दुरुस्तीसाठी अजूनही 15 दिवस बाकी आहेत. राजकीय पक्षांनी या 15 दिवसांमध्ये त्रुटी सांगाव्यात असं आवाहान निवडणूक आयोगाकडून करण्यात आलं आहे.
राहुल गांधी यांनी भाजपा आणि निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली होती. त्यावर उत्तर देत, मतचोरी सारख्या चुकीच्या शब्दाचा वापर केला जात आहे. जनतेला भ्रमित करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला जात आहे. हा भारतीय संविधानाचा अपमान नाही तर काय आहे? असा सवाल निवडणूक आयोगाने केला आहे.
जळगावमधील काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष प्रतिभा शिंदे ह्या आदिवासी कार्यकर्त्यांसह अजित पवार यांच्या हस्ते प्रवेश करत आहेत. प्रतिभा शिंदे यांच्या हातात राष्ट्रवादीचा झेंडा आहे. आमदार अनिल पाटील यांच्या काँग्रेसला मोठा धक्का, प्रतिभा शिंदे राष्ट्रवादीत
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत. तिथे झालेल्या सभेत मंत्री छगन भुजबळही उपस्थित होते. मंत्री छगन भुजबळ यांनी अजित दादांच्या समोर शरद पवारांच्यासोबत जळगाव जिल्ह्यात आल्याच्या आठवणी ताज्या केल्या. तसेच प्रत्येक जिल्हा परिषदा, महापालिका नगरपालिका यावर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला पाहिजे असंही त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना सांगितलं. भुजबळ यांनी एकप्रकारे निवडणुका स्वबळावर लढवण्याचे संकेत दिले आहेत.
गिरीश महाजन यांनी प्रांजल खेवलकर प्रकरणावर वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की “पाच-सहा जणांचे जे साहित्य जप्त करण्यात आलं होतं त्यात एक व्हिडिओ ऑडिओ रेकॉर्डिंग आहे जे पोलिसांनी कोर्टासमोर सादर केलं आहे. यानंतर रूपाली चाकणकरांनी त्यात काय काय वस्तू आहेत हे पत्रकार परिषदेतून सांगितले आहे.” तसेच चौदाशे ते सतराशे व्हिडिओ ऑडिओ रेकॉर्डिंग प्रांजल खेवलकरच्या मोबाईलमध्ये असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
नांदेडमधील आसना नदीला पूर आला असून मालेगाव वसमत महामार्ग बंद करण्यात आला आहे. पुलावरून पाणी जात असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. पोलिसांचा बंदोबस्त देखील ठेवण्यात आला आहे.
कोणाला मंत्री करायचं, कोणाला पालकमंत्री हा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे असं अजित पवार म्हणाले आहेत. तसेच काही ठिकाणी तर पालकमंत्री नसले तरी झेंडावंदन होत आहे असं अजित पवारांनी म्हटलं आहे.
बदनापूर तालुक्यात मध्यरात्री आणि आज सकाळच्या सुमारास झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेली आहेत. बदनापूर तालुक्यातील गेवराई बाजार येथील शेतकऱ्यांची कपाशी यासह इतर पिके पाण्याखाली गेल्याने शेताला तलावाचं स्वरूप प्राप्त झाले आहे. कपाशी, मूग, सोयाबीन, तूर, उडीद यासह अन्य पिके पाण्याखाली गेल्यामुळे उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात कुडावळे नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदीला पूर आल्याने दापोली–मंडणगड राज्यमार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. दादर पुलावरून नदीचं पाणी वाहत असून गेल्या तीन तासांपासून वाहतूक बंद आहे.
मुंबईसह देशभरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. भारत-पाक सीमेवर पूंछमध्येही मोठ्या भक्तीभावाने भारतीय सैन्याच्या उपस्थितीत गणेशोत्सव साजरा केला जातो. काश्मीरच्या पूंछमध्ये भारत-पाक सीमेचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या या गणेशाची मूर्ती आज विद्याविहार इथल्या सिद्धिविनायक चित्रशाळेतून काश्मीरला रवाना होत आहे. तब्बल अडीच हजार किमी आधी ट्रेन आणि मग ट्रकने प्रवास करून ही मूर्ती पूंछला पोहोचणार आहे.
दक्षिण मुंबईत ‘निसर्ग उन्नत मार्ग’ सुरू झाला आहे. कमला नेहरू उद्यान आणि फिरोजशहा मेहता उद्यानात ट्री टॉप वॉकची संधी मिळणार आहे. हा मार्ग दररोज पहाटे ५ ते रात्री ९ पर्यंत खुला राहणार असून भारतीयांसाठी शुल्क २५ रुपये तर परदेशी पर्यटकांसाठी १०० रुपये ठेवण्यात आले आहे.
‘चिंचपोकळीच्या चिंतामणी’च्या आगमन सोहळ्याला सुरुवात झाली असून गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांनी तुफान गर्दी केली आहे.
अमरावती जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने शेकडो हेक्टर शेती खरडून गेली. सोयाबीन,कपाशी,संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे अमरावती जिल्ह्यात मोठे नुकसान झाले. पुराच्या पाण्याने शेती खरडून गेल्याने पिके उभे करण्यासाठी लागलेला खर्च कसा निघणार? असा शेतकऱ्यांपुढे प्रश्न आहे.
गडचिरोली अहेरी नगरपंचायतच्या निषेधार्थ शेतीच्या कामाला जाणारे महिलांनी केली रस्त्यावर रोहनी करत निषेध केला. अहेरी नगरपंचायत अंतर्गत प्रभाग क्रमांक 16 ला जाणारा मार्ग चिखलमय व खड्डे असल्यामुळे या मार्गावरच महिलांनी रोहनी केली. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी माती टाकण्यात आल्यामुळे या मातीमुळे मोठ्या प्रमाणात चिखलाचे साम्राज्य तयार झाले. प्रभाग क्रमांक 16 तून आजूबाजूला असलेल्या खेड्यात महिला वर्ग मजुरीला जात असतात.
धाराशिव मधील मांजरा नदीच्या पुरात वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा दोन दिवसानंतरही शोध नाही. मांजरा नदी काठच्या गावांमध्ये आज शोध मोहीम राबवणार. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि महसूल प्रशासनाकडून तीन दिवसांपासून शोधमोहीम सुरु आहे.
कळंब तालुक्यातील खोंदला येथील सुबराव लांडगे शेतकरी पुराच्या पाण्यात वाहून गेले.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे जातीवादी नेते आहेत, असा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला. अजित पवार हे ठेकेदार, कॉन्ट्रॅक्टर, भांडवलदार,कारखानदार यांचे नेते असल्याचे म्हणत ते जातीयवाद करत असल्याचा आरोप हाकेंनी केला. पवार कुटुंब म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आहे. अजितदादा पवार यांचा महाज्योती संदर्भातील सामाजिक दुजाभाव मी वारंवार महाराष्ट्राला सांगितला आहे.
शरद पवारांची भूमिका ओबीसींना आवडलेली नाही. मंडल यात्रा प्रकरणी लक्ष्मण हाके यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. ओबीसी मतदार दूर गेल्यामुळे शरद पवारांचा हा प्रकार सुरू आहे. शरद पवारांनी ओबीसींचे आरक्षण संपवलं, अशी टीका त्यांनी केली.
छगन भुजबळ गमतीचे आहेत.पोलिस अधिकाऱ्यांचा कपडे घातले.त्यांना विचारलं की कोण आहात होम गार्ड आहेत.त्यांना उचललं आणि तीन महिने तुरुंगात टाकले असा किस्सा शरद पवार यांनी सांगितला.
सांगलीच्या इस्लामपूर मध्ये वनश्री युथ फाऊंडेशन कडून महाडिक युवाशक्ती दहीहंडीचे भव्य आयोजन करण्यात आले होते. 3 लाख 3 हजार 3 रुपयांचे बक्षीस या दहीहंडी मध्ये ठेवण्यात आले होते. ही दहीहंडी तासगाव मधील शिवनेरी मंडळाने फोडली. यावेळी मंत्री जयकुमार गोरे म्हणाले की इस्लामपूरच ईश्वरपूर केलं आहे.
ठाण्यात वर्तक नगर भाजप कार्यालयात आयोजित रक्षाबंधन महाअभियान… ९ ते १२ ऑगस्ट दरम्यान बहिणींनी पाठवलेल्या राख्या सुपूर्द… ९ ऑगस्ट ते १२ ऑगस्ट या कालावधीत ठाणे विभागातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी पाठवलेल्या राख्या वनमंत्री गणेशजी नाईक ह्यांना करणार सुपूर्द… कार्यक्रमात आज ठाणे विभागात निरंजन डावखरे, माजी खासदार संजू नाईक सह ठाणे जिल्ह्यातील सर्वच जिल्हा अध्यक्ष सह महिला पदाधिकारी कार्यक्रमात उपस्थित…
जन्मलेल्या स्त्री जातीचे नवजात अर्भक गोणीत गुंडाळून बारावे गावातील कचराकुंडीत फेकल्याची घटना… पहाटे कचरा टाकण्यासाठी ग्रामस्थांनी रडण्याचा आवाज ऐकल्यानंतर बाळाला वाचण्यासाठी धावले… ग्रामस्थांनी खडकपाडा पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत चिमुकलीला कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचारासाठी केले दाखल … चिमुकलीची प्रकृती स्थिर… स्त्री जातीचा अर्भक असल्याने फेकल्याची प्राथमिक माहिती… निर्दयी पालकांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची तीन विशेष पथके सक्रिय
शहाजीबापू पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर जहरी टीका केली. संजय राऊत भविष्य सांगणारा पोपट आहे, असा चिमटा त्यांनी काढला. पण आत्तापर्यंत राऊतांनी काढलेल्या सगळ्या चिट्ट्या खोट्या ठरल्या आहेत. त्यामुळे असला पोपट उद्धव ठाकरे यांनी लवकरच पिंजऱ्यात बंद करून टाकावा असा टोला माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी लगावला.
चिपळूणमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसामुळे सखल भागात साठल पाणी साठलं आहे. बाजार पुलाला देखील टेकलं वाशिष्टी एक नदीचे पाणी… प्रशासन अलर्ट मोड वरती
ठीक आहे बोलू द्या कोणाला काय झटका आहे आणि संजय राऊत कसे ताट पण उभे आहेत कोणालाही न घाबरता तुमच्यासारखे डरपोक लोक आम्ही नाहीत, असे राऊत यांनी म्हणत एकनाथ शिंदेंना टोमणा लगावला आहे.
कोणी लुटली महानगरपालिका ही मुंबईच्या जनतेला माहिती आहे आणि लुटमार करणाऱ्यांच्या हंड्या तुम्ही फोडत मुंबईपासून ठाण्यापर्यंत फिरत आहात ज्यांनी मुंबई लुटली त्यांच्याच हंड्या आपण फोडत आहात हंडीमध्ये दही लोणी जे आहे जे ज्यांनी ओरखून खाल्ले आहे.
मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकचा पालकमंत्री आपण होणार असल्याचा दावा केल्याने राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या
पैनगंगा नदी धोक्याची पातळी सोडून वाहत असल्याने रुद्ररूप. धबधब्यावर पर्यटकांची गर्दी वाढली, प्रशासनाकडून खबरदारीचा इशारा
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रतेज अटल गृहनिर्माण प्रकल्पातील घराच्या चाव्यांचे वाटप होणार. मुख्य प्रवर्तक असलेल्या भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांनी दहिटणे गावात हा 1348 घरांचा प्रकल्प उभारलाय
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जळगाव दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी आणि त्यांच्या बहिणींनी अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे केले. राष्ट्रवादी कार्यालयाकडे जात असताना, रस्त्यात त्यांचा ताफा अडवून महिलांनी त्यांना राख्या बांधल्या. अजित पवार यांनीही गाडीतून खाली उतरून त्यांना राख्या बांधण्याची संधी दिली. या प्रसंगी अजित पवारांना राखी बांधण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती, ज्यामुळे हा क्षण खूप भावनिक आणि उत्साहाचा ठरला.
जळगावमधील भुसावळ येथे असलेल्या हतनूर धरणाचे १४ दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून विदर्भात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे पाण्याची पातळी वाढली आहे. ९ केंद्रांच्या पाणलोट क्षेत्रात २९२.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, त्यामुळे धरणातून २८ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात होत आहे.
गोंदिया जिल्ह्यातील सिंचनासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला इटियाडोह धरण ओव्हरफ्लो झाला आहे. जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे हे धरण ९८ टक्के भरले होते. आता पूर्ण भरल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांची सिंचनाची चिंता मिटली आहे.
जळगावच्या पारोळा तालुक्यातील शेळावे गावात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने चिखली नदीला मोठा पूर आला. या पुराच्या पाण्यात दोन गुरांचा मृत्यू झाला असून, अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे अनेक कुटुंबे बेघर झाली आहेत. शेळावे खुर्द आणि शेळावे बुद्रुक या दोन्ही गावांमध्ये नदीच्या काठावर असलेल्या वस्त्यांमध्ये अचानक पाणी शिरल्याने नागरिकांना मोठा फटका बसला. या घटनेची दखल घेत ग्राम महसूल अधिकारी आणि मंडल अधिकाऱ्यांनी नुकसानीचे पंचनामे केले आहेत. पुरामुळे व्यापारी संकुलातील दुकानांमध्येही पाणी शिरले. ज्यामुळे किराणा आणि खतांसारख्या वस्तू वाहून गेल्याने व्यापाऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.
धुळे शहरात दीड तासाच्या मुसळधार पावसामुळे जिल्हा रुग्णालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. यामुळे रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, पाऊस थांबल्यानंतर आता पाणी कमी व्हायला सुरुवात झाली असून, परिस्थिती पूर्वपदावर येत आहे.