
गोंदिया पोलिसांची मोठी कारवाई. कुख्यात गुंड शाहरुख पठाण MPDA अंतर्गत बुलढाणा कारागृहात स्थानबद्ध. MPDA अंतर्गत गुन्हेगारीवर गोंदिया पोलिसांचा धडक प्रहार. जिल्हा दंडाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय. सात गंभीर गुन्ह्यांमध्ये अडकलेला सराईत गुंड बुलढाणा कारागृहात. धाराशिव -उमरगा तालुक्यातील कदेर परिसरात पहाटेपासूनच मुसळधार पाऊसाला सुरूवात झालीय. सततच्या मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहे. मागील दोन दिवसापासून या भागात जोरदार पाऊस पडत असल्याने शेती पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे.सरकार विरोधी भूमिका घेतल्याने माझे व्हाट्सअप बंद केल्याचा खासदार ओमराजे निंबाळकर यांचा आरोप. सोशल मीडियावरील व्हाट्सअप अकाउंट बंद झाल्याने जनतेच्या समस्या सोडवायला अडचणी येत असल्याचे खासदार यांनी म्हटलं. गेल्या पाच दिवसापासून खासदार ओमराजे निंबाळकर यांचे व्हाट्सअप बंद असून त्यांनी पोलीस व प्रशासन दरबारी याची तक्रार केली आहे.
जळगावच्या पाचोर्याच्या सातगाव डोंगरी परिसरात धरण फुटल्याची अफवा पसरल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
धरण फुटल्याची अफवा पसरताच गावातील ग्रामस्थ सैरावैरा धावू लागले, काहींनी गावच सोडलं…
सुज्ञ तरुणाने प्रत्यक्ष धरणावर जाऊन चित्रीकरण करत धरण फुटले नसल्याची ग्रामस्थांना माहिती दिल्यानंतर ग्रामस्थांना दिलासा
बीड जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसाने शेती पिकांचं अतोनात नुकसान झालं आहे. गेवराई तालुक्यातील तांदळा गावातील तरुण शेतकऱ्याने आपलं सोयाबीन पाण्यात करपून गेल्याचं पाहून टाहो फोडला. सरकार मायबाप पन्नास हजार रुपये तरी मदत द्या. मेल्यावर आम्हाला दीड लाख रुपये देणाऱ्या मायबाप सरकारला विनंती आहे असं म्हणत टाहो फोडला.
तुमची लेकरं बाळं, लोकांची कुत्री मांजरं आहेत का? असा सवाल मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांना केला आहे. तसेच आमचीही लेकरंबाळं आहेत, असंही भुजबळ यांनी म्हटलं.
धाराशिवमधील तुळजाभवानी नवरात्र महोत्सवात एआय कॅमेरे वापरले जाणार आहेत. नवरात्र उत्सवात होणाऱ्या चोऱ्यांना आळा घालण्यासाठी पहिल्यांदाच एआय कॅमेऱ्याचा वापर केला जाणार आहे.
तुळजापूर आणि आजूबाजूच्या परिसरातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या फोटोसह इतर माहिती एआय सॉफ्टवेअरमध्ये अपलोड करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे चेहऱ्याची ओळख पटवण्यासह, गर्दीच्या नियोजनासाठीही एआय कॅमेऱ्याचा वापर होणार आहे. तसेच नवरात्र महोत्सवात किती भाविकांनी दर्शन घेतले याचीही नोंद होणार आहे.
तृतीयपंथी कल्याणकारी महामंडळाचे अध्यक्ष संजय शिरसाठ यांची अध्यक्षपदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी तृतीयपंथी संघटनांकडून करण्यात आली आहे. ज्याप्रमाणे महिला आयोगच्या अध्यक्ष एक महिला असतात, त्याचप्रमाणे तृतीयपंथी कल्याणकारी महामंडळाचे अध्यक्ष तृतीयपंथी का नाही? असा प्रश्न संघटनांकडून विचारण्यात आला.
एकतर तृतीयपंथी कल्याणकारी महामंडळाच्या अध्यक्षपदी एक तृतीयपंथीच बसवावा किंवा संजय शिरसाठ हे तृतीयपंथी आहेत का याचे प्रमाणपत्र द्यावे, अशी तृतीयपंथी कल्याणकारी महामंडळाचे सदस्य ऍडव्होकेट पवन यादव यांनी मागणी केली आहे. तसेच येत्या मंगळवारी याच मागणीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देणार, अशी माहितीही पवन यादव यांनी दिली.
गोंदियाच्या देवरी तालुक्यातील उच्चेपूर गावकऱ्यांचा बिअर-बार विरोधात जोरदार एल्गार
गावात सुरू होत असलेल्या बियर बारच्या विरोधात एकवटले शेकडो ग्रामस्थ
बिअर बारचा परवाना तात्काळ रद्द करा
राज्य उत्पादन शुल्क अधीक्षकांना ग्रामस्थांनी दिले निवेदन
नांदेडच्या लोहा तालुक्यातील रिसनगाव येथे दोन गटात वाद
वादानंतर दोन गटात तुंबळ हाणामारी
जोरदार हाणामारीमध्ये सहा जण जखमी
जखमींवर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू
वादाचं कारण अद्याप अस्पष्ट
निलंबित प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्या पुण्यातील बाणेर येथील बंगल्यावर आज सकाळपासून पोलिसांची झाडाझडती सुरू आहे. सकाळी साडेअकरा वाजता नवी मुंबईतील रबाळे पोलिस स्टेशन आणि पुण्यातील चतुर्श्रृंगी पोलिस स्टेशन येथील अधिकारी आणि कर्मचारी या बंगल्यात दाखल झाले, तेव्हापासून तपासणी सुरूच आहे.
नांदेडच्या लोहा तालुक्यातील रिसनगाव गाव येथे दोन गटात हाणामारी झाली असून यात सहा जण जखमी झाले असून त्यांच्यावर – नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. वादाचे कारण आतापर्यंत समजलेले नाही.
अतिवृष्टीमुळे अक्कलकोट तालुक्यात झालेल्या नुकसानीची पाहणी मंत्री जयकुमार गोरे यांनी केली असून अक्कलकोटमध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
हैदराबाद गॅझेट विरोधातील जनहित याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली आहे. विनित धोत्रे यांनी हैदराबाद गॅझेट विरोधात याचिका केली होती. ही याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली आहे..
गोंदियाच्या देवरी तालुक्यातील उच्चेपूर येथील गावकऱ्यांचा बिअरबार विरोधात जोरदार आंदोलन केले आहे. बिअर बारचा परवाना तात्काळ रद्द करण्यासाठी गावकऱ्यांनी राज्य उत्पादन शुल्क अधीक्षकांना निवेदन दिले आहे.
म्हाडाने MhadaSathi या अॅप लाँच केले असून याद्वारे घरासाठी तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकतात.ऑनलाइन निविदा पाहू शकतात आणि एनओसी पाहू शकतात. जमीन भाडेपट्ट्याशी संबंधित माहिती देखील यावर उपलब्ध असेल.
कांद्याला पंधराशे रुपये प्रति क्विंटल प्रमाणे अनुदान द्या असा एकमताने टाळ्या वाजवत ठराव मंजूर करण्यात आला. येवला तालुक्यातील सोमठाणा देश ग्रामपंचायतच्या ग्रामसभेत महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने ठराव मांडला होता.ठरावाची प्रत राज्य सरकारला पाठवण्यात येणार आहे.
सततच्या पावसामुळे शेतीचे मोठे आणि न भरून येणारे नुकसान झाले, मुसळधार पाऊस झाल्याने अनेकांची शेत आणि शेतातील पिके वाहून गेली, आणि आज छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी पैठण तालुक्यातील कातपुर येथील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेताची ट्रॅक्टर मध्ये बसून पाहणी केली.
अक्कलकोट तालुक्यातील खैराट गावात एक तरुण पुराच्या पाण्यात वाहून गेला. खैराट गावात मागील आठवडाभरापासून मुसळधार पावसामुळे गावात अनेक भागात पाणी शिरले आहे. शिवराज रोडगे असे या वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे. त्यामुळे शेतीसह घरातील अन्न धान्याचे मोठे नुकसान झालेय. त्यातच ओढ्याला आलेल्या पुरामुळे पाण्यातून वाट काढत जाणारा व्यक्ती पाण्यात वाहून गेला. मात्र असं असलं तरी अद्याप गावात प्रशासन पोहीचलेले नाही. त्यामुळे गावकरी शिवराज रोडगे या व्यक्तीचा शोध घेत आहेत.
शेतकरयांच्या विविध मागण्यांसाठी सांगलीच्या इस्लामपूर मध्ये आमदार सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे.गोवंश हत्या बंदी कायद्यातून संकरित जनावरांना वगळण्यात यावे,तसेच शेतकऱ्यांवर हल्ले करणाऱ्या गोरक्षकांच्यावर कडक कारवाई करावी,तसेच गायीच्या दुधाला प्रति लिटर 40 रुपये याचा विविध मागण्यांसाठी रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सागर खोत यांच्या नेतृत्वाखाली गाईला घेऊन तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.
राहुल गांधी यांच्या नावे डिलीट केल्याच्या आरोपावर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी टीका केली. लोकसभेला तुम्हाला महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात चांगल्या जागा मिळाल्या मग तिथे तुम्ही मत चोरी केली का? असा सवाल त्यांनी केला. तर इतक्या वेळा त्यांनी मांडणी करून ते एकही गोष्ट ते प्रूव्ह करू शकले नाहीत, असे पाटील म्हणाले.
“लोकसभेला तुम्हाला महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात चांगल्या जागा मिळाल्या होत्या, मग तिथे तुम्ही मत चोरी केली का? त्यांना काही कामंधंदा राहिलेला नाही. त्यांना रोज काहीतरी बोलायला पाहिजे. कारण ते लोकसभेचा विरोधी पक्षनेता आहे. काँग्रेसचा चेहरा आहे. मग ते सरळ बोलले की तुम्ही छापणार नाही, दाखवणार नाही. कारण इतक्या वेळा त्यांनी मांडणी करून ते एकही गोष्ट ते प्रूव्ह करू शकले नाहीत,” अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटलांनी राहुल गांधींच्या आरोपांवर दिली आहे.
लासलगाव रेल्वे स्टेशन परिसरात एकतर्फी प्रेमाच्या संशयातून तरुणावर कोयत्याने हल्ला करण्यात आला आहे. गंभीर जखमी झालेल्या कुंदन नरेश पावरीय (वय २०) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी मनमाड लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
थेऊर इथल्या पूरपरिस्थितीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी शिक्षण सम्राट प्रसादराव पाटील यांच्यासह 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महसूल विभागाने मोठा दणका दिला आहे. थेऊर इथं मुसळधार पाऊस पडला होता. या पावसामुळे परिसरात पूरस्थिती निर्माण झाली होती. तर या पुरात शेतमालाचं आणि पशुधनाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. ओढे, नाले, मोऱ्या बुजवून नैसर्गिक स्त्रोत कायमस्वरूपी बंद केल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. या पूरपरिस्थितीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी शिक्षण सम्राट प्रसादराव पाटील यांच्यासह 6 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शिक्षक आमदार किरण सरनाईक यांच्या गाडीचा बुलढाण्यात अपघात झाला आहे. अपघातात जखमी झालेला युवक कोमात गेल्याची माहिती समोर येत आहे. कृष्णा लष्कर असं युवकाचं नाव असून तो 25 वर्षांचा आहे. चिखली शहरातील ही घटना आहे.
परळी तालुक्यातील लोकांसाठी पंकजा मुंडे यांचा जनता दरबार भरला आहे. पंकजा मुंडे सध्या बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. यावेळी पंकजा मुंडे यांना भेटण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली आहे. मतदार संघातील लोक मोठ्या अपेक्षेने त्यांच्याकडे कामं घेऊन येत आहेत.
निवडणुकीत मला पाडण्याचे प्रयत्न झाले. माझ्या मतदारसंघात मतं कमी झाली. मतचोरी पूर्ण देशात झालीये, असे आरोप कर्नाटकच्या आळंदचे आमदार बी. आर. पाटील यांनी केले आहेत.
बुलढाण्यात कारला ट्रेलरची धडक बसून झालेल्या भीषण अपघाता 4 जणांनी जीव गमावला. नागपूर ते धुळे राष्ट्रीय महामार्गावर ही दुर्दैवी घटना घडली असून अपघातात 5 जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
राहुल गांधी मतचोरीचे बादशाह, प्रेझेंटेशन करून मतचोरी झाल्याची आरडाओरड करण्याची त्यांना सवय आहे, अशी टीका भाजपचे केशव उपाध्ये यांनी केली आहे.
आयुष कोमकर हत्याप्रकरणातील आरोपी मुनाफ पठाणला गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे. मुनाफ पठाणला आज कोर्टात हजर केलं जाणार आहे.
मराठा आरक्षणासंदर्भातील याचिकेवर हायकोर्टात आज सुनावणी होणार आहे. मुख्य न्यायाधीश सी. चंद्रशेखर यांच्यासमोर दुपारी 3 वाजता पुन्हा एकदा सुनावणी पार पडणार आहे. याचिकाकर्ते विनित धोत्रे यांच्या याचिकेवर आज सुनावणी होणार असून सरकारकडून महाधिवक्ता बिरेंद्र सराफ युक्तिवाद करणार आहेत. हैदराबाद गॅझेटच्या शासकीय निर्णयाविरोधात हायकोर्टात अनेक याचिका दाखल आहेत.
सीसीएमपी नोंदणीविरोधात डॉक्टराचा राज्यभर बंद! कल्याणमध्ये शंभरहून अधिक रुग्णालये बंद – 500 हून अधिक डॉक्टर रस्त्यावर उतरलेत. आपत्कालीन सेवाही ठप्प झाल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. उग्र आंदोलनाचा देखील इशारा देण्यात आला आहे.
नाशिकच्या मखमलाबाद रोड परिसरात नागरिकांचा रस्ता रोको आंदोलन… अनेक दिवसांपासून पडलेल्या खड्ड्यांविरोधात नाशिककर रस्त्यावर… शहरातील खड्ड्यांमुळे नाशिककर त्रस्त… महापालिके विरोधात घोषणाबाजी आणि फलकबाजी..
“मी असा माणूस आहे जो माझ्या देशावर प्रेम करतो, माझ्या संविधानावर प्रेम करतो, लोकशाही प्रक्रियेवर प्रेम करतो आणि मी त्या प्रक्रियेचे समर्थन करतो. मी येथे असे काहीही बोलणार नाही जे १०० टक्के पुराव्यांवर आधारित नसेल… असं देखील राहुल गांधी म्हणाले…
निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार व्होटचोरांना वाचवत आहे… महाराष्ट्रातल्या राजुरा मतदारसंघात 6850 मतं वाढवण्यात आली… UQ, JJW अशी नावं मतदारयादीत आहेत – राहुल गांधी
भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त भारतीय लोकशाही उद्ध्वस्त करणाऱ्यांना संरक्षण देत आहेत… मी या व्यासपीठावरून फक्त सत्य बोलेल.. असं वक्तव्य देखील राहुल गांधी यांनी केलं आहे…
अलांड हा कर्नाटकातील एक विधानसभा मतदारसंघ आहे. तिथली 6,018 मते कोणीतरी वगळण्याचा प्रयत्न केला. 2023 च्या निवडणुकीत वगळण्यात आलेल्या एकूण मतांची संख्या आम्हाला माहिती नाही, परंतु ही संख्या 6,018 पेक्षा खूपच जास्त असण्याची शक्यता आहे – राहुल गांधी
कर्नाटक सीआयडीनं याविरोधात एफआयआर केली… कर्नाटक सीआयडीनं 18 महिन्यात 18 पत्र निवडणूक आयोगाला लिहिली आहेत… सॉफ्टवेअरद्वारे कर्नाटकातील मतं डिलीट करण्यात आली… असा खुलासा राहुल गंधी यांनी केला आहे.
10 पैकी 8 जागी काँग्रेस जिंकली होती, तिथं मतं डिलीट केली…. मतं डिलीट करण्यासाठी कर्नाटकच्या बाहेरचे मोबाईल नंबर वापरल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे…
माझ्या नावानं मत डिलीट केली पण मी केली नाहीत… राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत आणलेल्या व्यक्तीचा दावा
व्होट कसे बदलले मी दाखवणार… हे मोबाईल नंबर कोणारे आहेत? ओटीपी कुणी दिले? – राहुल गांधी
काँग्रेसची मतं डिलीट करण्यात आली… असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. कर्नाटकच्या बाहेरचे मोबाईल नंबर मतं डिलीट करण्यासाठी वापरले… असं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं आहे.
मालेगाव शहरात पुन्हा एकदा ठेकेदारीच्या निष्काळजीपणामुळे एक दुर्दैवी घटना घडली आहे. भुयारी गटार योजनेच्या अर्धवट आणि असुरक्षित कामामुळे २५ वर्षीय तरुण जिया उर रहमान याचा भीषण अपघातात मृत्यू झाला. मोटारसायकलवरून जात असताना तो उघड्या चेंबरमध्ये कोसळला, ज्यामुळे हा अपघात घडला. या घटनेनंतर मालेगावकरांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. संतप्त नागरिकांनी महानगरपालिका आणि संबंधित ठेकेदारांविरोधात जोरदार निदर्शने केली. संपूर्ण शहरात अशाच प्रकारे पाईपलाईन टाकण्याचे काम बेजबाबदारपणे सुरू असल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. या घटनेला जबाबदार असलेल्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांनी केली असून, जर ही बेफिकिरी थांबवली नाही तर आणखी बळी जातील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. यामुळे, प्रशासनाच्या कामकाजावर आणि संबंधित ठेकेदारांच्या सुरक्षिततेच्या मानकांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मोबाईलवर अश्लिल व्हिडीओ पाठवणाऱ्या खाजगी बस चालकास महिलेने गाठून चोप दिला. ही घटना कणकवली शहरातील तिकीट बुकींग सेंटरनजीक घडली. मात्र या प्रकाराची पोलीस स्थानकात कोणतीही नोंद झालेली नाही. एक महिला जेव्हा मुंबईला जायची, तेव्हा ती नामांकित कंपनीच्या बसने प्रवास करायची. दरम्यान मंगळवारी त्या खाजगी बस चालकाने तिकीट बुकींगच्या आधारे महिलेचा मोबाईल नंबर घेऊन त्यावर अश्लील विडिओ पाठवले. हा प्रकार त्याने दोन वेळा केला. त्यामुळे संतप्त झालेल्या त्या महिलेने कणकवली शहरातील भर रस्त्यावरच सर्वांसमोर त्या चालकाला चांगलाच प्रसाद दिला.
बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे माळेवाडी ते पुरुषोत्तमपुरी या गावांना जोडणारा मुख्य रस्ता पाण्याखाली गेल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. या पावसामुळे माजलगाव तालुक्यातील माळेवाडी, सुलतानपूर, किट्टी आडगाव, वाघोरा, शहाजापूर, माली पारगाव आणि गोविंदवाडी यांसारख्या गावांमध्ये शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या पाच दिवसांतील ही दुसरी वेळ आहे, जेव्हा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. या नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान आणि त्यांना आवश्यक असलेल्या मदतीसाठी प्रशासनाने तात्काळ पावले उचलावीत, अशी मागणी आता जोर धरत आहे.
मुंबईतील नरीमन पॉईंटवरील बहुचर्चित फ्लोटेल व मरीना प्रकल्पाला गती मिळणार आहे. राज्याचे बंदर व मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाला ३० सप्टेंबरपर्यंत सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर हा प्रकल्प पुढे नेण्यात येईल. एनसीपीएलगत सागरी किनाऱ्यावर उभारण्यात येणाऱ्या या फ्लोटेल व मरीनासाठी आढावा बैठक घेण्यात आली. “मुंबईसाठी हा महत्त्वाचा प्रकल्प असल्याने सर्व संबंधित विभागांना यावर लवकरात लवकर काम सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.” असे नितेश राणे म्हणाले.
गोदावरी नदी पात्रात 1 लाख 45 हजार 528 विसर्ग क्यूसेक वेगाने विसर्ग सुरू. गोदावरी नदीने ओलांडली धोक्याची पातळी. वसरणी परिसरातील नाव घाट पूल पाण्याखाली वाहतूक बंद. गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा.
दक्षिण सोलापुरातील शेतांना तळ्याचे स्वरूप प्राप्त झालेय. हातातोंडांशी आलेले खरीप पिक पूर्णतः पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान. सततच्या पावसामुळे उडीद, तूर, सोयाबीन, मूगात गुडघाभर पाण्याखाली असल्याने पिक लागले सडायला
नुकताच शरद पवार यांनी मोठे आरोप केले असून निवडणूक आयोगाबद्दल सर्व गोष्टी राहुल गांधींनी स्पष्ट दाखवल्याचे त्यांनी म्हटले.
“पंचाहत्तरीनंतर मी थांबलो नाही.मोदींनाही सांगू शकत नाही. माझ्या 75 व्या वाढदिवसाला मोदी स्वत: आले होते. राजकारणात संस्कृतपणाच दर्शन दाखवलं पाहिजे. सरकारीपेक्षा खासगी जाहीराती जास्त दिसतात” असं शरद पवार म्हणाले.
दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या रावण टोळीला बेड्या. गुंडा विरोधी पथकाची कारवाई. ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या रावण टोळीला गुंडा विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. यात धक्कादायक म्हणजे तीन अल्पवयीन मुलांचा देखील यात समावेश आहे. रावण टोळीकडून पिस्तुल, जिवंत काडतुसे, लोखंडी कोयता, गुप्ती, मिर्ची पूड, बांबू, रस्सी असा दरोडा टाकण्यासाठी लागण्यात येणार साहित्य जप्त केलं आहे.
मुंबई बेंगलोर हायवेवर आज पहाटे ५:३० वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या भरधाव स्विफ्ट डिझायर कारने पुढे जाणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिली. वाहनाचा वेग जास्त असल्याने वाहनाचा चक्काचुर झाला तर वाहनामधील चार जणापैकी दोघांचा अपघात दुर्देवी मृत्यु झाला आहे. निहाल तांबोळी,हर्षवर्धन मिश्रा हे दोघे किरकोळ जखमी झाले आहेत तर सिद्धांत आनंद,दिव्यराज सिंग राठोड यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा अपघातात मृत्यू झाला आहे.
रस्ता नसल्याने मृतदेह झोळीतून नेण्याची वेळ. जव्हार तालुक्यातील चांभारशेत पैकी नारनोली गावातील धक्कादायक घटना. रुग्णवाहिका भुसार पाडा गावापुढे जाऊ न शकल्याने महेंद्र यांचा मृतदेह डोलीतून सुमारे तीन किलोमीटर नेण्यात आला.
रेल्वे स्थानकातून प्रवास करणारे अनेक प्रवासी आणि व्यापारी कडून कबुतरांना खाद्य आणि दाणे टाकण्याचा प्रकार. खाद्य टाकत असल्याने कबुतरांची संख्या वाढू लागली. आज सकाळी स्थानकालगतच्या दुकानांवरील छतावर सर्रासपणे कबुतरांना टाकले खाद्य. महापालिका या खाद्य टाकणाऱ्यांवर काय कारवाई करणार?.
निवडणुकीत मला पाडण्याचे प्रयत्न झाले. माझ्या मतदारसंघात मतं कमी झाली. मतचोरी पूर्ण देशात झालीये, असे आरोप कर्नाटकच्या आळंदचे आमदार बी. आर. पाटील यांनी केले आहेत.