
राज्यात मराठवाड्यासह काही भागात मोठी अतिवृष्टी झाली. सरकारने मदत जाहीर केली. मात्र, ही मदत पुरेशी नसल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर काही महत्वाचे निर्णय घेण्यात आली. शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही स्पष्ट केले की, बॅंका लगेचच शेतकऱ्यांच्या मागे कर्जाच्या हप्तासाठी तगादा लावणार नाहीत, तशा सूचना आम्ही केल्या आहेत. राज्यात सध्या दसरा मेळाव्यांची जोरदार तयारी बघायला मिळत आहे. मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांचा मेळावा होईल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही मेळावा असणार आहे. बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे पाटील यांच्याकडूनही मेळाव्याचे आयोजन करण्यात आलंय, ज्याची तयारी सध्या सुरू आहे. यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, महाराष्ट्र, क्रिकेट, मनोरंजन, सामाजिक , राजकारण अशा विषयातील महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.
आंदेकर टोळीचा पाय खोलात व्यावसायिकाकडून उकळली ५.४ कोटी रुपयांची खंडणी
सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर आणि त्याच्या साथीदारावर खंडणीचा गुन्हा दाखल
गेल्या ८ वर्षांपासून उकळली जात होती खंडणी
पैसे दिले नाही तर व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी
व्यवसायासाठी “प्रोटेक्शन मनी” च्या नावाखाली उकळली करोडो रुपयांची खंडणी
ठाणे महापालिकेच्या मुख्यालयात मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचा छापा
ठाणे महापालीका अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांच्या कार्यालयात छापा
गेल्या अर्ध्यातासापासून एसीबीच्या अधिकाऱ्यांकडून शंकर पाटोळे यांची चौकशी सुरू
अतिक्रमण हटविण्यासाठी 25 लाखांची मागणी केल्याचा आरोप
सीना नदी काठच्या शेतकऱ्यांना सरकारी मदत मिळायला सुरुवात
पुराच्या पाण्यात घराचे नुकसान झालेल्या नागरिकांच्या खात्यावर दहा हजार रुपये
५ गावातील ६०९ लाभार्थ्यांच्या खात्यावर ६० लाख ९० हजार रुपये जमा
माढा तालुक्यातील एकूण ४०९२ नागरिकांच्या घरांचे नुकसान
धनगर आरक्षण आंदोलनाची पुढची दिशा ठरणार
उद्या जालन्यात महत्त्वाची बैठक
बैठकीला मोठ्या संख्येनं धनगर बांधव उपस्थित राहणार
उद्या दुपारी 1 वाजता बैठकीचे आयोजन, उपोषणकर्ते दीपक बोऱ्हाडे यांची माहिती
शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर सुद्धा दीपक बोऱ्हाडे आपल्या मागण्यांवर ठाम
मोठी बातमी समोर आली आहे. अजित पवारांनी शरद पवारांची मुंबईत भेट घेतल्याचं असल्याचं समोर आलं आहे. दोन्ही नेत्यांमध्ये वाय बी सेंटरमध्ये जवळपास तासभर चर्चा झाल्याचं म्हटलं जात आहे. या भेटीत राज्यातील पूरस्थितीवर चर्चा झाल्याचं म्हटलं जात आहे.
सरकार आणि सरकारमधील पक्षाचे नेते निरढावल्यासारखे वागायला लागलेत, अशी प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी दिली आहे. नांदेडच्या कोंढा येथील शेतकरी निवृत्त कदम यांनी आत्महत्या करुन जीवन संपवलं. त्यानंतर राजू शेट्टी यांनी ही प्रतिक्रिया दिली.
नागपूर-चंद्रपूर या 204 किमी लांबीच्या चौपदरी सिमेंट काँक्रीट महामार्गाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. वर्षा निवासस्थानी ही बैठक पार पडली. यावेळेस मुख्यमंत्र्यांनी चंद्रपूर ते मूल दरम्यान महामार्ग निर्मितीचा प्रस्ताव सादर करावा, अशा सूचनाही दिल्या.
कुर्ल्यातील बोगस दवाखान्यांबाबत भाजपचे अल्पसंख्यांक नेते हाजी अराफत यांनी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेतली आहे. अराफत यांनी या भेटीदरम्यान कुर्लामध्ये सुरू असलेल्या बोगस डॉक्टरांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली. तर आरोग्यमंत्र्यांनी दसऱ्यानंतर कुर्ल्यातील बोगस दवाखान्यांवर कारवाई करणार, असं आश्वासन अराफत यांना दिलं.
लखनौहून मुंबईला जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसच्या स्लीपर कोचला भुसावळ आणि जळगाव दरम्यान भादली स्थानकाजवळ आग लागली, ज्यामुळे सर्वत्र घबराट पसरली.
उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या विचारसरणीचा विश्वासघात केल्याचा आरोप संजय निरूपम यांनी केला आहे. गद्दार उद्धव ठाकरे आहेत, एकनाथ शिंदे नाहीत, असंही त्यांनी सांगितलं. तुम्ही मानू किंवा नका मानू नका, उपमुख्यमंत्री हे एक संवैधानिक पद आहे असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
अशा प्रकारचे वादग्रस्त वक्तव्य भिवंडीत करू नका भिवंडी खूप शांत आहे आम्ही सगळेजण चांगल्या प्रकारे एकोप्याने राहतो असा कुठला मिठाचा खडा त्यांनी टाकू नये हे त्यांनाच नाही सर्व पक्षाच्या नेत्यांना विनंती आहे असं कुठल्याही प्रकारचे वक्तव्य त्यांनी करू नका जेणेकरून भिवंडीची शांतता भंग होईल. असं खासदार सुरेश मात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी अबू आझमींना सुनावलं.
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केले आहे की मंत्रिमंडळाने केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3% वाढ करण्यास मान्यता दिली आहे. मंत्रिमंडळाने रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किंमत (MSP) वाढवण्यासही मान्यता दिली आहे. 57 नवीन केंद्रीय विद्यालये उघडली जातील.
मुंबईतील शिवतीर्थावर होणाऱ्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी उद्या पुण्यातून मोठ्या संख्येने शिवसैनिक रवाना होणार आहेत. शिवसेनेची परंपरा असलेल्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने विचारांचं सोनं लुटण्यासाठी अनेक शिवसैनिक उत्सुक असतात उद्या मेळाव्याच्या निमित्ताने मोठ्या संख्येने आम्ही मुंबईमध्ये जाणार आहोत, असे यावेळी शिवसैनिकांनी सांगितले आहे. या मेळाव्यातच्या माध्यमातून निवडणूकीमध्ये ठाकरे बंधू एकत्रित येण्याची मोठी घोषणा तथा राज ठाकरे ही मेळाव्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
तुळजाभवानी मंदिरासमोर सुरक्षारक्षक आणि लहुजी शक्ती सेनेच्या कार्यकर्त्यात धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला आहे.मातंग समाजाच्या आरक्षण मागणीसाठी लहुजी शक्ती सेनेची तुळजापुरात साकडं यात्रा आहे. तुळजाभवानीला आरती करून आरक्षणाच्या मागणीचं साकडं घालण्यासाठी लहुजी शक्ती सेनेचे कार्यकर्ते तुळजापुरात आले होते तेव्हा सुरक्षा रक्षकांशी वाद झाला आहे.
चंद्रपूर : शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांना स्पीड पोस्टने अतिवृष्टीमुळे खराब झालेलं सोयाबीन पाठवले आहे. वरोरा तालुक्यातील आसाळा गावातील शेतकऱ्यांचा सरकारचे लक्ष वेधण्याचा हा अनोखा प्रयत्न आहे. स्पीड पोस्टमध्ये सोयाबीन सोबत एक चिठ्ठी देखील टाकण्यात आली आहे. यामध्ये पालकमंत्र्यांनी गावात येऊन सोयाबीनची अवस्था पाहण्याची विनंती शेतकऱ्यांनी केली आहे.ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे या भागातील सोयाबीन पीक संपूर्णपणे नष्ट झाले आहे.
सोलापुर शहरातील मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेतले असल्याचे सरकारने जाहीर केले आहे.सोलापूर शहरातील 7 पैकी 7 गुन्हे मागे तर ग्रामीणमधील 60 पैकी 49 गुन्हे मागे घेतले तर सोलापूर ग्रामीण मधील उर्वरित 11 गुन्हे मागे घेण्याची देखील प्रक्रिया सुरू आहे. सरकारच्या या निर्णयाचे मराठा समाजाकडून स्वागत केले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्यास सुरुवात झाली आहे.
एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना जामीन मिळाला असून ते बाहेर आले आहेत आणि आता त्यांचा ड्रग्स सेवन केल्याचा अहवाल ही समोर येत आहे . पोलिसांनी प्रांजल खेवलकर संदर्भात रेव्ह पार्टी आणि ड्रग्स पार्टी केल्याचे वातावरण निर्माण केलंय ते चुकीचं असून आता अहवालही समोर येतोय त्यामुळे या प्रकरणात कुठलेही तथ्य नाही हे फक्त बदनामीचा प्रकार होता असे दिसतंय असे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.
कोल्हापूर गॅझेट लागू करण्याच्या मागणीसाठी आजपासून आंदोलन होणार आहे. कोल्हापूरातील भवानी मंडपात आंदोलनाची सुरुवात झाली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा लढा पुन्हा तीव्र होणार असं दिसतंय.
निलेश घायावळच्या पुण्याबाहेरील संपत्ती आणि जमिनीची तपासणी होणार आहे. घायावळची धाराशिव, जामखेड आणि पाटण परिसरात मोठी मालमत्ता असल्याचं म्हटलं जातं.घायावळ दहशत करत असल्याने राजकीय पाठिंबा मिळाल्याची माहिती.
खेवलकर प्रकरणात फॉरेन्सिकचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला असून खेवलकर आणि इतर आरोपींनी ड्रग्सचं सेवन केलं नसल्याची माहिती समोर आली आहे.
अमरावतीच्या तिवसा शहरात काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा. तिवसा तालुकासह अमरावती जिल्ह्यामध्ये संपूर्ण ओला दुष्काळ जाहीर करावा.शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी या मागणीसाठी काँग्रेसचा मोर्चा. शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी.
OBC नेते लक्ष्मण हाके काढणार OBC सामाजाची संघर्ष यात्रा. दिवाळीपुर्वी संघर्ष यात्रा काढणार असून, या संघर्ष यात्रेची सुरुवात नांदेडमधून सुरु होणार आहे. नांदेड, सिंदखेड राजा, चौंडी, गोपीनाथ गड या ऊर्जा स्थळांना या यात्रेच्या माध्यमातून भेटी देणार. लक्ष्मण हाके करणार यात्रेचे नेतृत्व.
ST प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक. नांदेड ते हिंगोली महामार्गावरील वसमत फाटा येथे जोरदार घोषणाबाजी. धनगर समाज बांधवाने केले रस्ता रोको आंदोलन. जालना येथे सुरु असलेल्या दीपक बोराडे यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देत धनगर समाज रस्त्यावर.
गोळीबार करणाऱ्या गँगला आर्थिक रसद आणि शस्त्र निलेश घायवळने पुरवल्याचे निष्पन्न. निलेश घायवळची बँक खाती फ्रिज केली आहेत. दुचाकीला खोटी नंबर प्लेट बसवलीय, त्याबाबत निलेश घायवळवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. निलेश घायवळने खोटा पत्ता देऊन त्याने पासपोर्ट काढलाय. निलेश घायवळला भारतात आणण्यासाठी लूक आउट नोटीस काढलेली आहे.
“आपल्या जिल्ह्यातील टपोरी लोक आहेत, त्यांच्या संपत्तीची पूर्ण यादी आमच्या जवळ आहे. जे स्वतःला शेतकरी नेते म्हणतात, महाराष्ट्रमध्ये फिरत आहेत, आमच्या जिल्ह्यातला माजी आमदार आहे. आपल्या संपत्तीमधील दहा टक्के जरी शेतकऱ्यांसाठी वाटप केली तर थोडी माणुसकी शेतकऱ्यासाठी राहील. राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या नावानं आपली दुकानदारी चालू करायची हे त्यांचं काम आहे,” अशी टीका रवी राणांनी केली
सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील वडीगोद्री इथं धनगर समाज बांधवांनी रास्ता रोको केला आहे. वडीगोद्री इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर आंदोलकांनी रास्ता रोको करत चक्काजाम आंदोलन सुरू केलं. सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समावेश करावा आणि तात्काळ प्रमाणपत्राची वाटप करावी या मागणीसाठी दीपक बोराडे हे गेल्या पंधरा दिवसापासून जालन्यात आमरण उपोषणाला बसले आहेत.
आमदार रवी राणा आणि भाजपा नेत्या, माजी खासदार नवनीत राणा यांच्या पदयात्रेला सुरुवात झाली आहे. त्यांच्या गंगा सावित्री निवास्थानापासून ते अंबा देवी एकविरा देवी मंदिरपर्यंत अनवाणी पायाने ही पदयात्रा करणार आहेत. राणा दाम्पत्य दरवर्षी दसऱ्याच्या आदल्या दिवशी नवमीला विदर्भाचे कुलदैवत असलेल्या अंबा देवीला साकडं घालण्यासाठी पदयात्रा करत असतात.
विजयादशमी म्हणजे असत्यावर सत्याचा विजय. विजयादशमीला संघाची स्थापना हा योगायोग नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी सोहळ्यात म्हणाले.
कल्याण श्रीमती कांताबेन शांतीलाल गांधी स्कूलमधील फतव्याप्रकरणी शाळेत पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे. शाळेत उद्धव गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित आहेत. कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला आहे. सध्या शाळा प्रशासनाचे संचालक मुख्याध्यापक आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू आहे.
पुण्यातल्या कोथरूडमध्ये घरफोडीच्या उद्देशाने दोन आरोपींनी सोसायटीत घुसखोरी केली. कोथरूड परिसरात वाढत्या गुन्हेगारी प्रकारांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. याचदरम्यान, कोथरूडमधील एका नामांकित सोसायटीत दोन आरोपी हातात हत्यारे घेऊन घरफोडीच्या उद्देशाने घुसल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.
कल्याणच्या शाळेचा अजब फतवा, शाळेत विद्यार्थ्यांना टिळा, टिकली आणि हातात धागे बांधण्यास बंदी घालण्याचे प्रकरण चांगलेच तापले आहे.
मात्र आम्ही कुठला फतवा काढला नाही , शाळेत धार्मिक तेढ निर्माण होऊ नये यासाठी फक्त सूचना दिल्या असे सांगत शाळा प्रशासनाने आपली भूमिका मांडली आहे. कडा व बांगडीने इजा होऊ नये यासाठी आम्ही ते बंद केलेले आहे. त्याचबरोबर टिळा, धागे यामुळे शाळेत धार्मिक वाद होत असल्याने त्यादेखील काढाव्या अशा सूचना आम्ही पालकांना दिल्या , असे शाळेतर्फे सांगण्यात आलं.
याच पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी शाळेत पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे.
जळगावातील विदगावच्या तापी नदी पुलावर भरधाव वाळूने भरलेल्या डंपरने कारला धडक दिल्याने भीषण अपघातात आईसह मुलाचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. डंपरची धडक एवढी जोरदार होती की धडकेनंतर पुलावरून कार थेट 70 ते 80 फूट खोल पुलाखाली जाऊन कोसळली. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
भिवंडी महाराष्ट्रात येतं याचा अबू आझमींना विसर पडलाय का ? हे भिवंडी आहे, इथे मराठीची गरज काय ? असा सवाल आझमींनी केला होता. त्यांच्या याच भूमिकेमुळे भिवंडीत मराठी-हिंदी असा वाद पेटला. आझमींना मराठीची लाज वाटत असेल तर मनसे स्टाइनलने उत्तर देणार असा इशारा मनसे विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष परेश चौधरी यांनी दिला.
नांदेड – अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या, नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील कोंढा येथील दुखद घटना. निवृत्ती कदम यांनी चिठ्ठी लिहून केली आत्महत्या. – माझे सर्व पीक पाण्याखाली गेले आहे माझ्या मुलाला कोणताही रोजगार नाही, आमच्या आरक्षणाच्या नोंदी सापडत नाहीत. पूर परिस्थिती व आरक्षण नसल्याचा चिठ्ठीत उल्लेख करत टोकाचं पाऊल उचललं. पोलिसांकडून चिठी जप्त करण्यात आली आहे.
मोकाट गायीच्या हल्ल्यातून आईने वाचवले आपल्या मुलीला… उधळलेल्या गायीच्या पायाखाली आलेल्या मुलीला जीवाची बाजी लावून ओढले बाजूला… कळवण तालुक्यातील गांधी चौकात घडली घटना… दोन मुलींना घेऊन आई वडील गाडीवरून जात असताना उधळलेल्या गायीने दिली गाडीला धडक… खाली पडलेल्या मुलीच्या अंगावर गाय हल्ला करण्याच्या तयारीत असताना आईने ओढले आपल्या बाळाला..
गुरुवारी होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शहरात लागले बॅनर.. शिवसेना कार्यकर्त्यांकडून शहरात बॅनरबाजी.. दसरा मेळाव्याला दोन्ही बंधू एका व्यासपीठावर येणार का याची उत्सुकता?
शेतांमध्ये जाणाऱ्या पांदण रस्त्याची दुरावस्था असल्याने ट्रॅक्टर ट्रॉलीसह उलटला… ट्रॅक्टरमध्ये असलेले मजूर किरकोळ जखमी झाले आहेत… अनेक वर्षापासून या रस्त्याची दुरुस्ती करण्यात न आल्याने रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडलेत… शेतमाल शेतातून आणण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी तारेवरची कसरत करावी लागते… त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी रस्ता दुरुस्तीची मागणी केली आहे…
महाराष्ट्र सरकारच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. सरकारने सर्व पात्र महिलांसाठी ई-केवायसी (e-KYC) अनिवार्य करत दोन महिन्यांची मुदत निश्चित केली आहे. जर ही प्रक्रिया ठरावीक वेळेत पूर्ण झाली नाही, तर दरमहा मिळणारी 1500 रुपयांची आर्थिक मदत थांबू शकते. जुलै 2024 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती. 21 ते 65 वयोगटातील गरजू महिलांना दरमहा 1500 रुपयांची थेट मदत देणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे.
शहरात एमडी ड्रग्स विकणाऱ्या टोळीला पोलिसांनी सापळा रचून केली अटक. एमडी ड्रग्स आणि इतर साहित्य असे एकूण 17 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त. मुख्य संशयित मुजफ्फार उर्फ मुज्जू शेख हा शहरातील एका हॉटेलमध्ये ड्रग्स विक्री करण्यासाठी येणार असल्याची पोलिसांना मिळाली होती माहिती.
वगळण्यात आलेल्या १८ गावांचा पुन्हा प्रभाग रचनेत समावेशावरून वाद पेटला,…आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चुकीच्या रचनेविरुद्ध मनसे नेते प्रकाश भोईर यांनी या प्रभाग रचनेवर थेट राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदवला आक्षेप
देवयानी फरांदे,सीमा हिरे आणि राहुल ढिकले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. शहरात गेल्या काही दिवसांपासून हत्या, चैन स्नॅचिंग, टोळी युद्ध हाणामाऱ्या सारख्या घटना वारंवार घडत आहेत. याच संदर्भात कठोर पाऊल उचलण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी
माहुरगड संस्थांच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधी दिली जाणार रक्कम.पूरग्रस्तांच्या मदतीसाठी माहूरगड देवस्थानचा पुढाकार
रस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राटदारकडून दहा लाखाची खंडणी ची मागणी केल्या केली अशी तक्रार दिल्या प्रकारणी गुन्हा दाखल. योगेश जयंत मामीडवार असे तक्रार कर्त्या कंत्राटदाराचे नाव
भाविकांची संख्या घटल्याने व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान. गेल्या वर्षी यात्रेत साडेसहाशे क्विंटल कुंकवाची विक्री, यावर्षी मात्र सव्वाशे क्विंटलच कुंकू विकलं गेलं. यात्रेसाठी व्यापाऱ्यांनी आणलेला माल तसाच पडून, तुळजापुरातील अकराशे व्यापारी कुटुंबाला याचा फटका
चार महिन्यात 134 शेतकरी आतमहत्या तर नऊ महिन्यात 274 शेतकऱ्यांनी सततच्या नापिकीला कंटाळून संपविले जीवन. 13 पात्र तर 107 प्रकरणे चौकाशीसाठी प्रलंबित,अतिवृष्टी आणि कर्जबाजारीपणाचा फटका