
पुणे महापालिकेला २०२४-२५ या आर्थिक वर्षात ८ हजार २७२ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविण्यात यश आले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १२ कोटी रुपयांनी उत्पन्न वाढले असून, आतापर्यंतच्या महापालिकेच्या इतिहासामध्ये मिळालेले हे सर्वाधिक उत्पन्न असल्याचा दावा महापालिकेकडून केला जात आहे. अक्कलकोट तालुक्यात हन्नूर केसरी बैलगाडा स्पर्धेत बुलढाण्याचा झिंगाट बाब्या ठरला हन्नूर केसरी. भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी हन्नूर गावातील रानमाथ्यावर हन्नूर केसरी बैलगाडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. हन्नूर केसरी बैलगाडा स्पर्धेचे उद्घाटन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आलं. हन्नूर केसरी बैलगाडा स्पर्धेत जवळपास 129 बैल जोडी मालकांनी सहभाग घेतला होता. जालना जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून ढगाळ वातावरण असून हवामान विभागाकडून येलो अलर्ट देण्यात आला होता. घनसावंगी बदनापूर आणि अंबड तालुक्यातील विविध ठिकाणी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांच्या ज्वारी गहू आणि उन्हाळी मक्का या पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले.
उल्हासनगरात गादीच्या कारखान्याला भीषण आग
आगीत कारखाना जळून खाक
कॅम्प ३ च्या शांतीनगर रस्त्यावरील घटना
मोठी बातमी समोर येत आहे, नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील नवजात कक्षात शॉर्ट सर्किट झाल्याची घटना घडली आहे. या कक्षामध्ये 69 नवजात बालक होते, सुदैवाने कोणतीही अनुचित घटना घडलेली नाहीये, सर्व बालकं सुरक्षित आहेत. या बालकांना दुसऱ्या कक्षात हलवण्यात आलं आहे.
पुण्यात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी
विजाच्या कडकडाट आणि वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू
अवकाळी पावसामुळे हवेत गारवा
उकड्यापासून त्रस्त नागरिकांना दिलासा.
मात्र अचानक आलेल्या पावसामुळे कामावरून घरी निघालेल्या नागरिकांची तारांबळ
अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी
ससून रुग्णालयातील दोन अधिकाऱ्यांना लाच घेताना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांच्या घरावर छापेमारी सुरु झाली. त्यात कोट्यवधी रुपयांचे घबाड मिळाले आहे. सविस्तर वाचा
सोलापूर जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याची माहिती प्रशासनाने दिली. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे भूकंपाचे केंद्रबिंदू होता. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने याबाबतचे ट्विट करत माहिती दिली आहे. पंढरपूर, सांगोला आणि मंगळवेढा येथे 2.6 रजिस्टर स्केल तीव्रतेचे धक्के जाणवले.
पंढरपूरात 7 ते 9 एप्रिल दरम्यान मास व मद्या विक्रीस बंदी करण्यात आली आहे. चैत्र यात्रेच्या पाश्वभूमीवर मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. तसेच यात्रा कालावधी दरम्यान मंदिर परिसरात नारळ फोडण्यास बंदी केली आहे.
महाराष्ट्र वैद्यक परिषदेच्या (महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल-एमएमसी) नियामक मंडळाच्या आजच्या मतदान प्रक्रियेला सुप्रीम कोर्टाने बुधवारीच स्थगिती दिलेली असतानाही आदेशाचा चुकीचा अन्वयार्थ लावून आज, गुरुवारीच मतदान प्रक्रिया राबवण्याचा निर्णय राज्य सरकारच्या अंगलट आला आहे. सुप्रीम कोर्टाने सरकारी प्रशासनाच्या या वर्तणुकीची गुरुवारी अत्यंत गंभीर दखल घेतली आणि आज गुरुवारी सुरू असलेली मतदानप्रक्रिया तात्काळ थांबवण्याचा आदेशही दिला.
वक्फ बिलाबाबत उद्धव ठाकरे यांनी आक्षेप घेत भाजपावर टीका केली आहे. वक्फ बिलं मुस्लिमांच्या हिताचं आहे मग हिंदूत्व सोडलं का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी भाजपाला विचारला आहे. देशातील इतिहासात मुस्लिमांचा कळवळा घेणारी भाषण भाजपने केली. अमित शाहपासून सर्वांनी केली. जिनांनाही लाजवेल अशी ही भाषणे होती. हे मुस्लिमांच्या बाजूने आहेत का? मग हिंदुत्वाचं काय झालं. हिंदूत्व सोडलं का? बाळासाहेबांनी मुस्लिमांना इज्तेमा करण्याची परवानगी दिली होती. तीच जागा व्यापाऱ्यांसाठी उद्योगपतीच्या खिशात घातली.” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपावर टीका केली आहे.
बीड आरोपी सतीश भोसले याची चौकशी होणार आहे. वन्यप्राण्यांचा मांस आढळल्याप्रकरणी चौकशी होणार आहे. वनविभाग हा सतीश भोसलेचा ताबा घेणार आहे. सतीश भोसले सध्या जिल्हा कारागृहात आहे. वन विभागाच्या चौकशीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्हा कारागृहातून सतीश भोसलेला ताब्यात घेणार आहेत
पुणे- हरवलेल्या चिमुकलीला कडेवर घेऊन आरपीएफ जवानांनी धावपळ केली. तीन वर्षाच्या ग्यानवीला अर्ध्या तासात आई-वडिलांकडे सुपूर्द केलं. उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे पुणे रेल्वे स्थानकावर गर्दी झाली होती. या गर्दीत तीन वर्षाची ग्यानवी हरवली होती. आरपीएफ जवानांच्या लक्षात येताच त्यांनी तीन वर्षाच्या चिमुकलीला कडेवर घेऊन तिच्या आई-वडिलांना शोधण्यासाठी धावपळ केली.
महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेत कामकाज झालं पाहिजे, या राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसैनिक आक्रमक झाले आहेत. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या परळच्या ऑफिसमध्ये मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी निवेदन दिलं. पंधरा दिवसांमध्ये मराठीमध्ये कामकाज झालं पाहिजे, नाहीतर मनसे स्टाईल दाखवू, अशा इशारा त्यांनी दिला आहे.
माजी आमदार राजन साळवी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला पोहोचले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी राजन साळवी हे मुलगा आणि मुलगीसोबत भेटीला आले आहेत. शिंदे गटात प्रवेशानंतर एकनाथ शिंदे आणि राजन साळवी यांची पहिली भेट असून
भेटीमागचे कारण गुलदस्त्यात आहे.
विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी तुळजाभवानीचं दर्शन घेतलं. यावेळी त्या म्हणाल्या, “तुळजाभवानीचा विकास आराखडा हा सगळ्यांना विश्वासात घेऊन होईल. अतिशय महत्त्वाचा असणारा हा विकास आराखडा आहे. नक्कीच तुळजाभवानी तीर्थक्षेत्र साठी हा विकास आराखडा महत्त्वाचा असून याबाबत स्थानिक आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि जिल्हाधिकारी यांच्यासोबत माझं बोलणं झालं आहे.”
उन्हापासून बचाव करण्यासाठी ठाण्यात चौकाचौकात ठाणे महापालिकेकडून ग्रीन शेड उभारण्यात आले आहेत. नितीन कंपनी जंक्शन सिग्नल यंत्रणा ठिकाणी शंभर फुट लांब आणि पंचवीस फूट उभे ग्रीन शेड उभारले आहेत. या ग्रीन शेडमुळे नागरिकांना आणि वाहनधारकांना उन्हापासून दिलासा मिळत आहे.
लोणावळ्यातील कार्ला एकविरा गडावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबीयांकडून एकविरा आईला साडी चोळीसह ओटी अर्पण करण्यात आली. शिवसेना तालुका प्रमुख राजू खांडभोर यांनी कार्ला देवस्थान मार्फत ओटी अर्पण केली. आजपासून एकविरा देवीची यात्रा सुरू होत आहे.
रायगड पोलादपूर – छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा रायगडातील मोरसडे येथील मूळगावी घोसाडवाडी येथे सत्कार करण्यात आला आहे. मोरसडे या मूळगावी उतेकर भावकी, कांगोरीगड माध्यमिक विद्यालय आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांच्यावतीने दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांची पायी चालत भव्य सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
मिरा-भाईंदर मनपाने २४१ कोटींची मालमत्ता करवसुली केली आहे. एकूण मागणीपैकी सुमारे ८६ टक्क्यांची पहिल्यांदाच विक्रमी वसुली झाली आहे. मिरा-भाईंदर महापालिकेने २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या तुलनेत २०२४-२५ या आर्थिक वर्षात तब्बल ४८ कोटींची अधिक मालमत्ता कर वसुली केली आहे.
कर्जत स्थानकावरील वडापावमध्ये साबणाचा तुकडा आढळल्याने रेल्वे प्रशासनाने कठोर कारवाई केली आहे. प्रवाशाच्या तोंडातून फेस आला होता. तक्रारीनंतर स्टॉल सील करण्यात आला असून त्याची विक्री परवाना रद्द करण्याची मागणी केली जात आहे.
बीडच्या परळी शहरातील माणिक नगर भागात सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटामध्ये घरातील संसार आणि उपयोगी साहित्य जळून खाक झालं आहे. सत्यभामा कुंभार आणि राणी किसन कुंभार या दोघीजणी या स्फोटात बचावल्या आहेत. मात्र याठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या घरालाच आग लागल्याने या दोघीही उघड्यावर पडल्या आहेत.
नाशिकमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने द्राक्ष बागांना फटका बसला आहे. काढणीसाठी आलेल्या द्राक्षांवर गारपिटीमुळे परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी द्राक्षमळी गळून पडले आहेत तर द्राक्षांवर काळे डाग पडले आहेत.
दोन महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर अखेर सिंधुदुर्ग चिपी विमानतळावरून प्रवाशी वाहतूक सुरू. काही तांत्रिक कारणामुळे विमानसेवा बंद होती. सिंधुदुर्ग ते पुणे प्रवासी वाहतूक सुरू. सोमवार व शुक्रवार वगळता आठवड्याचे पाच दिवस विमानसेवा सुरू रहाणार. विमान सेवा बंद झाल्यानंतर खासदार नारायण राणे यांनी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्र्यांची भेट घेतली होती.
मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरील कुंडमळा बंधाऱ्यावर पिंपरी-चिंचवड येथील पाच तरुण पोहण्यासाठी या बंधाऱ्यात उतरले असता त्यातील तीन तरुण पाण्यात बुडत असताना स्थानिक जीव रक्षकांनी दोन तरुणांना बाहेर काढले मात्र एक तरुण पाण्यात बुडाला.
वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर. विधेयकाच्या बाजूने 288 इतकी मतं पडली तर विधेयकाच्या विरोधात 232 इतकी मतं पडली आहेत. आज हे विधेयक राज्यसभेत सादर केलं जाणार आहे.
आज मुंबईत कोसळणार तुरळत पावसाच्या सरी, हवामान विभागाचा अंदाज. मुंबईत मागच्या चार-पाच दिवसापासून ढगाळ वातावरण. ढगाळ वातावरणामुळे नागरिक उकाड्याने हैराण. ठाणे, पालघर, रायगडलाही पावसाचा इशारा.