
नाताळच्या सुट्टीच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने भाविकांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 21 डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत श्री विठ्ठलाचे व्हीआयपी (VIP), ऑनलाईन आणि टोकन दर्शन पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. सुट्टीच्या या कालावधीत जवळपास चार ते पाच लाख भाविक पंढरपूरमध्ये येण्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. भाविकांना सुलभ आणि त्वरित दर्शन मिळावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे नायलॉन मांजामुळे तीन वर्षांच्या चिमुकलीचा गळा कापून जखमी झाली होती. पोलीस आयुक्तांनी मांजा विक्रेत्यांविरोधात कठोर कारवाईचा इशारा दिला होता. त्यानुसार, शहर पोलिसांनी जीवघेण्या नायलॉन मांजा विक्रेत्यांविरोधात कंबर कसली आहे. पोलिसांनी आतापर्यंत 5 मांजा विक्रेत्यांना अटक केली असून त्यांच्याकडून 206 नायलॉन मांजाचे गट्टू जप्त केले आहेत. या अटक करण्यात आलेल्यांमध्ये काफिलउल्ला खान फजलउल्ला खान, शेख मुशीर अहमद अश्फाक अहमद, शेख फरदीन अब्दुल रज्जाक, तालेबखान शेरखान, मुद्दशीर उर्फ मुजीब अहमद नजीर अहमद यांचा समावेश आहे. नायलॉन मांजा शहराबाहेरही विकला गेला आहे का, याचाही शोध पोलीस घेत आहेत.
पुणे शहरात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत मोठी घट झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पावसाळा संपल्यामुळे शहरातील डेंग्यूची स्थिती हळूहळू नियंत्रणात येत आहे. महापालिकेच्या आरोग्य खात्याकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या दोन महिन्यांत डेंगीच्या संशयित आणि निश्चित निदान झालेल्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. चिकनगुनिया आणि मलेरियाचे रुग्णही कमी झाले आहेत. सर्वेक्षण, धूर फवारणी आणि जनजागृती या उपाययोजनांचा फायदा झाल्यामुळे ही संख्या घटल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान शहरातील अवैध राजकीय होर्डिंग्ज त्वरित हटवण्याचे स्पष्ट आदेश हायकोर्टाने दिले आहेत. नेत्यांच्या मनमानी वागणुकीवर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नागपूर शहरात ठिकठिकाणी नेत्यांच्या स्वागताचे जे पोस्टर्स, बॅनर्स आणि फ्लेक्स लागले आहेत, ते तातडीने हटवण्याचे निर्देश महापालिकेला देण्यात आले आहेत. मोठ्या प्रमाणात लावलेल्या या होर्डिंग्जमुळे वाहतूक व्यवस्थेत अडथळे येत आहेत. आता नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे.
नागपुरातील पारडी शिवारात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे, ज्यामुळे नागरिकांमध्ये मोठे भीतीचे वातावरण आहे. दोन दिवसांपूर्वी कापसी भागात दिसलेल्या याच बिबट्याने आज पहाटे दोन किंवा अधिक लोकांवर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरामध्ये पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.
मका खरेदीच्या मागणीसाठी पायी निघालेल्या शेतकऱ्यांना मंत्र्यांनी बोलावले. मका पिकाला प्रतिक्विंटल 2400 रुपये प्रतिक्विंटल आधारभूत किंमत मिळावी यासाठी परतवाडा ते नागपूर असा 180 किलोमीटर होता पायदळ प्रवास. 8 तारखेला अमरावतीच्या परतवाडा येथून शेकडो आदिवासी बांधव आणि शेतकरी नागपूर हिवाळी अधिवेशनावर पायदळ निघाले होते.
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर रद्द होणारे विमानांचे परिस्थितीमध्ये सुधारणा होत असून. मंगळवारी पुण्यात येणारी पाच आणि पुण्यातून जाणारे सात अशी बारा विमाने रद्द झाली. रद्द होणाऱ्या विमानांची माहिती काही तास अगोदर दिल्यामुळे प्रवाशांना नियोजन करण्यास वेळ मिळाला
मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरसह २९ महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा पुढील आठवड्यात करण्यासाठी राज्य निवडणूक आयोग सज्ज. महापालिकांच्या मतदार याद्यांमधील दुबार मतदारांचा घोळ संपता संपेना अशी परिस्थिती. प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या जाहीर करण्यास पाच दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने दिला. मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध करण्याची मुदत ही २२ डिसेंबर होती. ही मुदत आता २७ डिसेंबर केली आहे.
सुरक्षा नियमांचे नियोजन करण्यात अपयशी ठरल्याने देशभरातील हजारो उड्डाणे रद्द. इंडिगोच्या उड्डाणांमध्ये १० टक्के कपात करण्याचे आदेश केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी दिले. मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर एल्बर्स यांना विमान कंपनीच्या व्यवस्थापनाची माहिती देण्यासाठी मंत्रालयात बोलावण्यात आले
आंबेशीव गावातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाची धावाधाव. बिबट्यामुळे नागरिकांमध्ये मोठे भीतीचे वातावरण बघायला मिळत आहे.
परिस्थिती हलकीची असल्याने 14 मुलांपैकी सहा जण विकल्याचा संशय. यासंदर्भातील बातम्या प्रसारित झाल्यानंतर पोलीस प्रशासन आणि तहसील कार्यालयाचे सर्कल महिलेच्या घरी. संशयित दाम्पत्य पोलिसांच्या ताब्यात असल्याची प्राथमिक माहिती. भरड्याची वाडी या ठिकाणी एका वस्तीत राहणाऱ्या 45 वर्षीय महिलेने पोटच्या मुलांना विकल्याचा घडला होता धक्कादायक प्रकार.
नागपूरात हिवाळी अधिवेशन सुरू असून विरोधक चांगलेच आक्रमक होताना दिसत आहेत. फलटण येथील महिला डॉक्टर प्रकरणात विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. याबद्दलची माहिती सभागृहात सांगताना देवेंद्र फडणवीस दिसले. यादरम्यान विविध मुद्द्यांवरून सरकारवर अनेक आरोप विरोधकांनी केली. नगरपरिषद आणि नगरपंचायतीचे निकाल 21 डिसेंबर 2025 रोजी लागणार आहेत. प्रशासनाकडून तयारी सुरू आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये बिबट्यांचा धुमाकूळ बघायला मिळत आहे, लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नाशिकमधील तपोवन आंदोलन अधिक तीव्र होताना दिसत आहे. वृक्षतोडीविरोधात लोक आक्रमक आहेत. सयाजी शिंदे यांनी वृक्षतोडीला थेट विरोध केला. त्यांनी राज ठाकरेंची देखील या संदर्भात भेट घेतली. इंडिगोची विमानसेवा विस्कळीत झाली असून प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. सरकारने इंडिगोवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे, त्याबद्दल काही अपडेट येऊ शकतात.