
पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणातील आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलण्याचा आरोप असलेले डॉ. अजय तावरे, डॉ श्रीहरी हलनोर आणि घटकांबळे तिघांची पोलीस कोठडी आज संपणार आहे. आज दुपारी पुणे पोलीस त्या तिघांना कोर्टात हजर करणार. आमदार जितेंद्र आव्हाड यांना शरद पवार साहेबांनी तात्काळ पक्षातून हकालपट्टी करावी, आणि राज्य सरकारने कायदेशीर कारवाई करून महाड राज्यातून तडीपार करावे अशी मागणी सचिन खरात यांनी केली आहे. भुसावळ मध्ये अज्ञात हल्लेखोरांनी चालत्या कारवर केलेल्या गोळीबारात माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सुनील राखुंडे यांचा मृत्यू झाला. भुसावळमध्ये तणावपूर्ण शांतता असून पोलीस आणि शीघ्र कृती दलाच्या जवानांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मध्य रेल्वेवर 1 आणि 2 जून रोजी 36 तासांचा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. सीएसएमटी फलाट क्रमांक १० आणि ११ ची लांबी वाढविण्यासाठी ब्लॉक घेतला जाईल. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.